सावधान ! रेमडेसिवीरचा भयानक काळाबाजार, खोटं लेबल लाऊन 700 लोकांची फसवणूक, अनेकांचा जीव धोक्यात

कोरोनाच्या महाभयंकर संकटात ऑक्सिजन बरोबरच रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा जाणवत आहे (Lucknow police arrested five accused who selling fake Remdesivir Injections).

सावधान ! रेमडेसिवीरचा भयानक काळाबाजार, खोटं लेबल लाऊन 700 लोकांची फसवणूक, अनेकांचा जीव धोक्यात
Remdesivir injection
Follow us
| Updated on: Apr 27, 2021 | 3:03 PM

लखनऊ : कोरोनाच्या महाभयंकर संकटात ऑक्सिजन बरोबरच रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांची मोठी फरफट होत आहे. रुग्णाला वाचवण्यासाठी नातेवाईक कितीही रुपयांमध्येही रेमडेसिवीर इंजेक्शन घेण्यास तयार आहेत. याच गोष्टीचा फायदा घेऊन काही नराधमांनी रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार सुरु केलाय. हेही असे की थोडके, उत्तर प्रदेशच्या लखनऊ शहरात त्याहीपेक्षा भयानक प्रकार समोर आला आहे. काही नराधमांनी 98 रुपयांच्या PPT 4.5 GM इंजेक्शनवर रेमडेसिवीरचं लेबल लाऊन 700 पेक्षा जास्त लोकांना 15 ते 20 हजार रुपयात विकल्याचं समोर आलं आहे (Lucknow police arrested five accused who selling fake Remdesivir Injections).

दुसऱ्या इंजेक्शनला लेबल लावून विक्री

महाराष्ट्रात रेमडेसिवीर इंजेक्शनची किंमज जर हजार ते बाराशे रुपये केली असली तरी उत्तर प्रदेशात या इंजेक्शनची किंमत जवळपास 4800 रुपये इतकी आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने या इंजेक्शनची मागणी वाढली आहे. मात्र, या संकटात मदत करण्याऐवजी काही लोक या संकटात संधी साधून लोकांना प्रचंड लुबाडत आहेत. हे लुबाडणं इतक्या खालच्या थरावर गेलं आहे की रुग्णांचा कोणताही विचार न करताना दुसऱ्या इंजेक्शनला लेबल लावून ते हजारो रुपयांना विकून अनेकांचा जीव धोक्यात टाकला जात आहे.

पोलिसांकडून मोठा साठा जप्त

अखेर या प्रकरणी काळाबाजार करणाऱ्या काही लोकांना पकडण्यात लखनऊ पोलिसांना यश आलं आहे. पोलिसांनी आरोपींकडून इंजेक्शनच्या 59 बाटल्या, PPT 4.5 GM चे 240 पॅकेट इंजेक्शन आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचे 4,224 लेबल तसेच 85,840 रोख रक्कम जप्त केली आहे. तसेच पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.

मोठं रॅकेट असल्याचा पोलिसांना संशय

आरोपींना कोर्टात सादर केल्यानंतर त्यांना कारावासात पाठवलं जात आहे. पोलीस आयुक्त डी. के. ठाकूर यांनी आरोपींसोबत बातचित केली तेव्हा काही महत्त्वपूर्ण माहिती देखील समोर आल्याचं सांगितलं जात आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनच्या काळाबाजारचं मोठं रॅकेटज असल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांचा सध्या याप्रकरणी तपास सुरु आहे (Lucknow police arrested five accused who selling fake Remdesivir Injections).

हेही वाचा : महाभयंकर! बीडमध्ये एकाच रुग्णवाहिकेत 22 मृतदेह कोंबले; ‘या’ अमानवीय कृत्याने महाराष्ट्र हादरला

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.