VIDEO : हजार नाही, इथे दोन हजाराचाच रेट, तेवढे पैसे दे, तुझी गाडी सोडतो, पोलिसाची ट्रक ड्रायव्हरकडून लाच, व्हिडीओ व्हायरल
ट्रक ड्रायव्हरकडून दोन हजार रुपयांची लाच मागणं एका पोलीस कर्मचाऱ्याला महागात पडलं आहे (viral video of police demanding money from truck driver).
लखनऊ : ट्रक ड्रायव्हरकडून दोन हजार रुपयांची लाच मागणं एका पोलीस कर्मचाऱ्याला महागात पडलं आहे. कारण ट्रक ड्रायव्हरसोबत बोलताना, पैशांची सेटलमेंट करत असताना कुणीतरी त्याचा व्हिडीओ बनवला आहे. नंतर तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. त्यामुळे पोलीस कर्मचारी निलंबित झाला आहे. संबंधित व्हिडीओ हा उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनऊ शहरातील काकोरी पोलीस ठाण्यातील आहे (viral video of police demanding money from truck driver).
व्हिडीओत नेमकं काय?
संबंधित व्हिडीओत पोलीस कर्मचारी ट्रक ड्रायव्हरकडून दोन हजार रुपयांची मागणी करत आहे. चालक एक हजार रुपयांसाठी तयार होतो. तो पोलीस कर्मचाऱ्याला त्यासाठी विनंती करतो. त्याचा आवाज व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत स्पष्टपणे ऐकू येत आहे. मात्र, त्याच्या विनंतीनंतरही पोलीस ऐकत नाही. है पैसे वरपर्यंत जातात, असं पोलीस ट्रक ड्रायव्हरला सांगतो. त्यानंतर ट्रक ड्रायव्हर दोन हजार रुपये काढतो.
माजी आयपीएस अधिकाऱ्याकडून कारवाईची मागणी
संबंधित व्हिडीओ माजी आयपीएस अधिकारी अमिताभ ठाकूर यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरही शेअर केला आहे. त्यांनी व्हिडीओतील लाचखोर पोलीस कर्मचाऱ्याविरोधात कारवाईची मागणी केली आहे. तसेच हा व्हिडीओ 13 मे 2021 चा असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.
व्हिडीओ बघा :
UP की राजधानी
दिनांक 13/05/2021
स्थान- “बिस्मिल” का थाना काकोरी- ट्रक छोड़ने का रु० 2000 ही रेट है !@LkoCp @dhrubathakur @lkopolice @Uppolice pic.twitter.com/mdkIPkzzRY
— AmitabhThakur (@Amitabhthakur) May 18, 2021
लाच घेणारा पोलीस कर्मचारी निलंबित
दरम्यान, संबंधित व्हिडीओवर डीसीपी ख्याती गर्ग यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मिळाला आहे, ज्यामध्ये एक पोलीस कर्मचारी ठाण्यात बसून काही पैसे घेताना दिसत आहे. या व्हिडीओचा तपास केला गेला आहे. तसेच संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्याला निलंबित करण्यात आलं आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
हेही वाचा : तीन आत्महत्यांपाठोपाठ पुण्यात दगडाने ठेचून तरुणाची हत्या, भारती विद्यापीठ परिसर पुन्हा हादरला