लुधियाना स्फोट प्रकरण; बडतर्फ पोलीस कर्मचाऱ्यानेच ठेवला बॉम्ब
पंजाबच्या लुधियानामध्ये दोन दिवसांपूर्वी न्यायालयाच्या परिसरात स्फोट झाला होता. या स्फोटामध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीची ओळख आता समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार गगनदीप असे या व्यक्तीचे नाव आहे. न्यायालयात बॉम्ब लावताना स्फोटामध्ये त्याचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे.
लुधियाना : पंजाबच्या लुधियानामध्ये दोन दिवसांपूर्वी न्यायालयाच्या परिसरात स्फोट झाला होता. या स्फोटामध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीची ओळख आता समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार गगनदीप असे या व्यक्तीचे नाव आहे. न्यायालयात बॉम्ब लावताना स्फोटामध्ये त्याचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. गगनदीप हा पंजाब पोलीस दरलाचा कर्मचारी होता. त्याला बडतर्फ करण्यात आले होते. तो दोन वर्षांची शिक्षा पूर्ण करून जेलमधून नुकताच सुटला होता. गगनदीप यानेच बॉम्ब लावल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून समोर येत आहे.
गुरुवारी झाला होता स्फोट
पंजाबच्या लुधियानामध्ये न्यायालयात गुरुवारी स्फोट झाला होता. या घटनेमध्ये एकाचा मृत्यू तर पाच जण जखमी झाले होते. न्यायालयाच्या इमारतीचे देखील मोठे नुकसान झाले होते. तसेच काचांना देखील तडे गेले होते. हा स्फोट नेमका कसा झाला? कोणी कोला याचा पोलिसांकडून शोध सुरू होता. तपासादरम्यान पोलिसांच्या हाती महत्त्वपूर्ण माहिती लागली असून, गगनदीप यानेच हा स्फोट केला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. बॉम्ब लावतानाच त्याचा स्फोट झाला. या स्फोटात गगनदीप याचा देखील मृत्यू झाला आहे.
इटंरनेवर माहिती घेऊन बॉम्ब अॅक्टिव्ह करण्याचा प्रयत्न
दरम्यान गगनदीप यांच्याकडे इंटरनेट डोंगल आणि मोबाईल देखील असल्याची माहिती सूत्रांनी दिली. कोणीतरी इंटरनेटवर माहिती घेऊन, बॉम्ब लावण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्याचदरम्यान बॉम्बचा स्फोट झाला, अशी शंका यापूर्वीच पोलिसांनी व्यक्त केली होती. आता या प्रकरणात गगनदीप याचे नाव समोर येत आहे. गगनदीप याला पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते.
संबंधित बातम्या
Nagpur Crime| दहा दुचाक्या चोरल्या, एक पेटविली; कारण विचारताच पोलीसही चक्रावले
अडीच लाखांत घाटी रुग्णालयात वॉर्ड बॉयची नोकरी लावतो म्हणत 80 हजारांचा गंडा, औरंगाबादच्या एकाला अटक