पोलीस असल्याची बतावणी, इगतपुरीत वृद्ध महिलेचे 1 लाख 70 हजारांचे दागिने घेऊन पोबारा

इगतपुरी शहरातील एका वृद्ध महिलेला भर रस्त्यात दोन इसमांनी पोलीस असल्याचे सांगत तिच्याकडील एक लाख 70 हजार रुपयांचे दागिने सकाळच्या सुमारास चोरुन नेल्याने शहरात खळबळ उडाली आहे. | Igatpuri Fake Police

पोलीस असल्याची बतावणी, इगतपुरीत वृद्ध महिलेचे 1 लाख 70 हजारांचे दागिने घेऊन पोबारा
इघतपुरीत एका वृद्ध महिलेला भर रस्त्यात दोन इसमांनी पोलीस असल्याचे सांगत तिच्याकडील एक लाख 70 हजार रुपयांचे दागिने घेऊन पोबारा केला.
Follow us
| Updated on: Jun 08, 2021 | 12:35 PM

नाशिक : इगतपुरी शहरातील एका वृद्ध महिलेला भर रस्त्यात दोन इसमांनी पोलीस असल्याचे सांगत तिच्याकडील एक लाख 70 हजार रुपयांचे दागिने सकाळच्या सुमारास चोरुन नेल्याने शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी इगतपुरी पोलिस ठाण्यात दोन अज्ञात इसमानवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Lying to be a policeman in Igatpuri ran away jewelery worth Rs 1 lakh 70 thousand)

वृद्ध महिलेला नकली पोलिसांनी भीती दाखवली अन्…

पार्वती रमेश कांबळे वय 65 रा. श्रीराम अपार्टमेंट, गांधी चौक ही महिला गिरजा माता मंदिरा समोरील रस्त्याने सकाळच्या सुमारास पायी चालत दवाखान्यात जात होत्या. त्यावेळी त्यांच्या जवळ मोटारसायकलवरून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी आम्ही पोलीस आहोत. तुम्ही अशा एकट्याने पायी चालत का जात आहे ? त्यातच तुमच्या अंगावर सोन्याचे दागिने आहेत, तुम्हाला माहित आहे का, रात्रीच कोणी तरी एका बाईला चाकू मारला आहे. तुम्ही असे एकटेच फिरू नका. तुम्हाला पाच हजार रुपये दंड भरावा लागेल. तुमचे दागिने काढून पिशवीत ठेवा, असं त्या दोन इसमांनी वृद्ध महिलेला सांगितलं.

तेव्हा लागलीच या वयोवृध्द महिलेने घाबरून हातातील ६ तोळे वजनाच्या सोन्याच्या चार बांगड्या, (किंमत अंदाजे 1 लाख 20 हजार) आणि गळ्यातील गंठण त्यात सोन्याचे मणी (किंमत अंदाजे 50 हजार) असा एकूण 1 लाख 70 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने वृद्धेने काढून पिशवीत ठेवले.

दागिने घेऊन मोटरसायकलवरुन पसार

या अज्ञात चोरांनी लगेच ते दागिने हिसकावून मोटरसायकलवरुन पळून गेले. या प्रकरणी इगतपुरी पोलिस ठाण्यात दोन अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात चोरांनी वृध्द महिलेला फसवून दागिने हिसकावून पोबारा केल्याने इगतपुरीत महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

(Lying to be a policeman in Igatpuri ran away jewelery worth Rs 1 lakh 70 thousand)

हे ही वाचा :

मोठी बातमी: दम्याच्या त्रासाला कंटाळून चांदी व्यापाऱ्याची आत्महत्या

फेसबुकवर चाईल्ड पोर्नोग्राफीचा व्हीडिओ टाकणाऱ्या इंजीनिअरिंगच्या विद्यार्थ्याला अटक

धक्कादायक! सावत्र आईकडून मूकबधीर मुलाचा छळ; रागाच्या भरात गुप्तांगावर चटके

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.