पत्नी छातीवर बसली, प्रियकराने गळा दाबला, रात्रभर पतीच्या मृतदेहासोबत झोपली, अंगावर काटा आणणारा हत्येचा घटनाक्रम

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर जिल्ह्यातील चिनोर पोलिसांना चिनोरजवळील जुन्या कालव्यात एक मृतदेह तरंगत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह पाण्यातून बाहेर काढला आणि पोस्टमार्टम केल्यानंतर या व्यक्तीचा मृत्यू पाण्यात बुडून नसून गळा दाबून झाल्याचे उघड झाले.

पत्नी छातीवर बसली, प्रियकराने गळा दाबला, रात्रभर पतीच्या मृतदेहासोबत झोपली, अंगावर काटा आणणारा हत्येचा घटनाक्रम
मालमत्तेच्या वादातून बंगालमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
Follow us
| Updated on: Oct 26, 2021 | 11:17 AM

ग्वाल्हेर : मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये करवा चौथच्या दिवशीच महिलेने पतीची हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. महिलेचे सूत तिच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या तरुणासोबत जुळले, तिने प्रियकराला करवा चौथच्या दिवशी आपल्या पतीसाठी उपवास ठेवणार नसल्याचं वचन दिलं होतं. त्यानंतर तिने प्रियकरासोबत आपल्याच पतीच्या हत्येचा कट रचला आणि त्याची निर्घृण हत्या केली.

काय आहे प्रकरण?

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर जिल्ह्यातील चिनोर पोलिसांना चिनोरजवळील जुन्या कालव्यात एक मृतदेह तरंगत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह पाण्यातून बाहेर काढला आणि पोस्टमार्टम केल्यानंतर या व्यक्तीचा मृत्यू पाण्यात बुडून नसून गळा दाबून झाल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला.

6 सप्टेंबर रोजी ही घटना घडली होती. हत्येनंतर सुमारे 20 दिवसांनंतर मृताची ओळख पटली होती. त्याचे नाव पोषण सिंह रावत असून तो देवरी कला गावात राहत असल्याची माहिती मिळाली. त्याची पत्नी बसंती देवी रावतने पती हरवल्याची तक्रार नोंदवली होती. तपासादरम्यान पोलिसांना पत्नीवरच संशय आल्याने पोलिसांनी तिची कसून चौकशी केली असता संपूर्ण प्रकरण उघड झाले.

प्रियकरासोबत पतीच्या हत्येचा कट

या प्रकरणाचा खुलासा करताना पोलिसांनी सांगितले की, पोषण सिंह रावत आणि बसंती यांचे 11 वर्षांपूर्वी लग्न झाले होते, दोघांना एक मुलगा आणि एक मुलगीही आहे. पोषण हा मजूर म्हणून काम करायचा. बसंतीने दिलेल्या जबाबानुसार, पतीला दारुचे व्यसन असल्यामुळे तो तिला रोज मारहाण करत असे. दरम्यान, बसंती स्वतःहून 11 वर्षांनी लहान असलेल्या मनीष रावतच्या प्रेमात पडली. दोघेही एकमेकांच्या प्रेमात इतके आकंठ बुडाले होते की त्यांनी पोषण सिंहच्या हत्येचा कट रचला.

पत्नी छातीवर बसली, प्रियकराने गळा दाबला

बॉयफ्रेंड मनीष रावतने प्रेयसी बसंतीला पतीसाठी करवा चौथचा उपवास न ठेवण्यास सांगितले. यावेळी पतीसाठी उपवास ठेवण्याची आपलीही इच्छा नसल्याचं बसंतीने त्याला सांगितलं. अशा स्थितीत दोघांनी पोषणचा काटा कायमचा काढण्याचा बेत आखला. 4 सप्टेंबर रोजी प्रियकर मनीष बसंतीच्या घरी पोहोचला. बसंतीने तिच्या दोन्ही मुलांना काही कामात गुंतवले आणि दोघांनी मिळून पतीची हत्या केली. पत्नी पतीच्या छातीवर बसली आणि प्रियकराने त्याचा गळा दाबला, त्यानंतर पत्नीनेही त्याचा गळा दाबला, त्यामुळे पोषणचा जागीच मृत्यू झाला.

बसंतीने 5 सप्टेंबरचा दिवस अशा प्रकारे घालवला की सर्वांना वाटले की पोषण सिंह जिवंतच आहे आणि विश्रांती घेत आहे. 5 तारखेच्या रात्री मनिष, त्याचा मित्र रवींद्रसोबत आला आणि पोषण सिंहचा मृतदेह दुचाकीवरुन घेऊन गेला. त्यांनी पोषणला दुचाकीवर अशा प्रकारे बसवले की, तीन तरुण दुचाकीवरून जात आहेत, असे लोकांना वाटले, दोघांनी सुमारे चार किलोमीटर दूर जाऊन पोषण सिंगचा मृतदेह कालव्यात फेकून दिला.

52 दिवसांनी प्रकरण उघडकीस

विशेष बाब म्हणजे 4 सप्टेंबर रोजी पत्नी बसंती हिने करवा चौथचा उपवास न ठेवण्याची शपथ घेऊन पतीची हत्या केली हा योगायोग म्हणता येईल, पण या घटनेच्या तब्बल 52 दिवसांनी करवा चौथच्या दुसऱ्याच दिवशी ही हत्या उघडकीस आली. या घटनेनंतर पोलिसांनी बसंती, तिचा प्रियकर मनीष रावत आणि रवींद्र रावत या तिघांनाही अटक केली आहे.

संबंधित बातम्या :

निर्जन स्थळी चाकूच्या धाकाने प्रेमी युगुलांची लूट, CCTV मुळे अखेर दोन गुंड जाळ्यात

पिंपरी चिंचवडमध्ये बाल गुन्हेगारीत प्रचंड वाढ, 110 गंभीर गुन्ह्यात तब्बल 135 अल्पवयीन मुलं

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.