बायकोचा दुसऱ्या नवऱ्यासोबत घरोबा, पहिला पती पोलिसात, म्हणतो ‘तिला नांदायला आणा म्हणजे आणाच…’

धर्मेंद्र आपल्या पत्नीला उदरनिर्वाहासाठी पैसे देत होता, पण अचानक एके दिवशी धर्मेंद्रला समजले की त्याच्या पत्नीने दुसरे लग्न केले आहे. एवढेच नाही, तर त्याची पत्नी तिच्या दुसऱ्या पतीपासून गर्भवती झाल्याचंही समजल्याने धर्मेंद्रच्या पायाखालची जमीनच सरकली.

बायकोचा दुसऱ्या नवऱ्यासोबत घरोबा, पहिला पती पोलिसात, म्हणतो 'तिला नांदायला आणा म्हणजे आणाच...'
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Nov 20, 2021 | 12:37 PM

भोपाळ : घटस्फोट न घेताच आपल्या पत्नीने दुसरं लग्न केलं. विभक्त राहायला लागल्यापासून ती आपल्याकडून दर महिन्याला खर्च घेत होती, मात्र त्यानंतर ती दुसऱ्या पुरुषासोबत राहू लागली, अशी फिर्याद घेऊन नवरा पोलीस स्टेशनला पोहोचला आणि पत्नीला परत नांदायला आणण्याची मागणी पोलिसांकडे करु लागला. मध्य प्रदेशातील भिंडमध्ये ही विचित्र घटना समोर आली आहे. मात्र आपल्याला पहिला नवरा आवडत नाही, म्हणून आपण दुसरे लग्न केले, असे विवाहित महिलेचे म्हणणे आहे.

काय आहे प्रकरण?

हे संपूर्ण प्रकरण मध्य प्रदेशातील भिंडमधील मेहगाव भागातील आहे. मेहगाव येथील रहिवासी धर्मेंद्र जाटव यांचा विवाह चार वर्षांपूर्वी राखी नावाच्या महिलेशी झाला होता. 4 मार्च 2017 रोजी दोघांनी लग्नगाठ बांधली होती. लग्नाच्या काही महिन्यांनंतर घटस्फोट न घेता राखी आणि धर्मेंद्र जाटव वेगळे झाले.

या काळात धर्मेंद्र आपल्या पत्नीला उदरनिर्वाहासाठी पैसे देत होता, पण अचानक एके दिवशी धर्मेंद्रला समजले की त्याच्या पत्नीने दुसरे लग्न केले आहे. एवढेच नाही, तर त्याची पत्नी तिच्या दुसऱ्या पतीपासून गर्भवती झाल्याचंही समजल्याने धर्मेंद्रच्या पायाखालची जमीनच सरकली.

पहिल्या पतीची पोलिसात धाव

पती धर्मेंद्रने थेट भिंडच्या डीएसपी पूनम थापा यांना गाठले आणि पत्नीला परत मिळवून देण्याची विनंती करु लागला. डीएसपी पूनम थापा यांनी धर्मेंद्र यांच्या पत्नी आणि त्यांच्या दुसऱ्या पतीला फोन केला. राखीने पहिला पती धर्मेंद्रसोबत जाण्यास नकार दिला. त्यानंतर तिच्या दुसऱ्या पतीने सांगितले की, त्याला त्याच्या पत्नीच्या पहिल्या लग्नाची कोणतीही माहिती नाही.

“घटस्फोट नाही, मग दुसरे लग्न कसे?”

मंदिराव्यतिरिक्त कोर्टातही राखीने दुसरे लग्न केले. त्याच वेळी तिचा पहिला पती धर्मेंद्र म्हणतो की, त्याला त्याची पत्नी परत हवी आहे, तो तिला सांभाळत आहे. पण तिने दुसरं लग्न कधी केलं ते कळलंच नाही. जेव्हा घटस्फोटच झाला नाही, तर दुसरे लग्न कसे होईल, असा सवालही धर्मेंद्रने विचारला आहे. या प्रकरणी डीएसपी पूनम थापा सांगतात की, जी काही कायदेशीर कारवाई करता येईल, ती केली जाईल.

संबंधित बातम्या :

“हॅलो पोलीस स्टेशन? माझा बॉयफ्रेण्ड माझ्याशी बोलत नाहीये” व्याकुळ प्रेयसीला पोलिसांचं उत्तर काय?

24 वर्षीय पुतण्या नवविवाहित काकीच्या प्रेमात, दोघं घरातून रफूचक्कर, काका म्हणतो मी तिला एकदाच…

बहिणीकडून ओवाळणीनंतर निघालेल्या दादाला अपघात, रात्रभर नाल्यात पडून, सकाळी मृत्यू

शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.