बहिणीच्या लग्नाच्या दिवशीच वकील भावाची अंत्ययात्रा, असे काय घडले ज्याने आनंदाच्या दिवशी कुटुंबीय शोकात बुडाले

समीनाथन हे जवळच्या हॉटेलमध्ये गेल्याचे सांगण्यात येत आहे. तिथे ते कुणाशी तरी फोनवर बोलत होते. यावेळी तेथे सहा जणांची टोळी आली आणि त्यांनी समीनाथन यांच्यावर हल्ला केला.

बहिणीच्या लग्नाच्या दिवशीच वकील भावाची अंत्ययात्रा, असे काय घडले ज्याने आनंदाच्या दिवशी कुटुंबीय शोकात बुडाले
अंधेरी परिसरात भावोजीने मेव्हण्याला संपवलेImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Sep 08, 2022 | 6:58 PM

तामिळनाडू : तामिळनाडूच्या अरियालूरमधील जयंगाकोंडाजवळ मद्रास उच्च न्यायालयाच्या वकिलाची दिवसाढवळ्या सहा जणांनी हत्या (Murder) केल्याची घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तिरुवरूर जिल्ह्यातील रहिवासी असलेले समीनाथन हे मद्रास उच्च न्यायालयात वकील (Lawyer) म्हणून काम करत होते. समीनाथन हे त्यांच्या लहान बहिणीच्या लग्ना (Sisters Wedding)साठी अरियालूरमध्ये आले होते. दोन्ही कुटुंबीयांत उत्साहाचे वातावरण होते.

मयत समीनाथन मद्रास उच्च न्यायालयात वकील होते

समीनाथन मद्रास उच्च न्यायालयात वकील म्हणून कार्यरत होते. समीनाथन हे जवळच्या हॉटेलमध्ये गेल्याचे सांगण्यात येत आहे. तिथे ते कुणाशी तरी फोनवर बोलत होते. यावेळी तेथे सहा जणांची टोळी आली आणि त्यांनी समीनाथन यांच्यावर हल्ला केला.

हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन फरार

हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरुन फरार झाले. आरोपी दोन मोटारसायकवरुन आले होते. घटनेची माहिती मिळताच जयंगकोंडमचे डीएसपी आणि पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. सध्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे.

हे सुद्धा वाचा

परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. वकिलाच्या हत्येनंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे. खबरदारी म्हणून तेथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत पोलीस

दरम्यान, हत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. आरोपींनी ही हत्या का केली आणि कुणाच्या सांगण्यावरुन केली ? आरोपींच्या शोधासाठी पोलीस परिसरातील सीसीटीव्ही तपासत आहेत.

मयत समीनाथन यांचे वडिल सुब्रमण्यम हे तंजावर जिल्ह्यातील नचियार मंदिरचे रहिवासी आहेत. त्यांना समीनाथन आणि मरियप्पन नावाची दोन मुले आणि थायल नायकी नावाची मुलगी आहे. थायल यांचा विवाह अरियालूर येथे होता. यासाठी सर्व कुटुंबीय अरियालुर येथे आले होते.

भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....