रस्त्यात बाईक अडवली, सासऱ्याला खाली पाडून सून पायावर बसली, निवृत्त पोलिसाला जीवे मारण्याचा प्रयत्न

पोलीस दलातून सेवानिवृत्त झालेल्या सासर्‍याला त्याच्या सुनेसह अन्य दोघा जणांनी विष पाजून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. अहमदनगरमध्ये वडगाव गुप्ता शिवारात शेंडी बायपास जवळ शनिवारी ही घटना घडली

रस्त्यात बाईक अडवली, सासऱ्याला खाली पाडून सून पायावर बसली, निवृत्त पोलिसाला जीवे मारण्याचा प्रयत्न
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Jan 12, 2022 | 12:48 PM

अहमदनगर : निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याला त्याच्याच सुनेने जीवे ठार मारण्याचा प्रयत्न (Attempt to Murder) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महिलेच्या मदतीने अन्य दोघा जणांनी सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. वृद्धाला खाली पाडून त्याच्या तोंडात जबरदस्ती विष ओतण्याचा प्रयत्न तिघा आरोपींनी केला. या घटनेत सेवानिवृत्त पोलिसाची प्रकृती बिघडल्यामुळे त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पेन्शनर पोलीस असल्याने तुला पोलिसांनी अटक केली नाही, आता तुला कोण वाचवणार, असे म्हणत सुनेने त्याला शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. अहमदनगरमध्ये (Ahmednagar) घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण?

पोलीस दलातून सेवानिवृत्त झालेल्या सासर्‍याला त्याच्या सुनेसह अन्य दोघा जणांनी विष पाजून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. अहमदनगरमध्ये वडगाव गुप्ता शिवारात शेंडी बायपास जवळ शनिवारी ही घटना घडली. ग्यानदेव नामदेव जाधव (वय 60 वर्ष, रा. गांधीनगर, बोल्हेगाव) हे या घटनेत जखमी झाले आहेत. त्यांच्यावर अहमदनगर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अहमदनगरलाईव्ह24 या वेबसाईटने यासंदर्भात बातमी दिली आहे.

ग्यानदेव जाधव यांनी उपचारादरम्यान एमआयडीसी पोलिसांना दिलेल्या जबाबावरुन तिघा जणांच्या विरोधात हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सून सोनाली संतोष जाधव, वैभव ऊर्फ महेश बाळासाहेब सातपुते, बाळासाहेब सातपुते (सर्व रा. शेंडी बायपास, वडगाव गुप्ता, ता. नगर) अशी तिघा आरोपींची नावे आहेत.

सासऱ्याला खाली पाडून सून पायावर बसली

निवृत्त पोलीस ग्यानदेव जाधव शनिवारी दुपारी आपल्या दुचाकीने मोहोज (ता. पाथर्डी) येथून त्यांच्या मुलाकडे जाण्यासाठी निघाले होते. कोल्हार घाटमार्गे शेंडी बायपासने वडगाव गुप्ता शिवारात नदीजवळून येत असताना सून सोनाली आणि इतर दोघांनी त्यांची बाईक अडवली. सासऱ्यांना खाली पाडून सून त्यांच्या पायावर बसली, तर आरोपी बाळासाहेब सातपुतेने वृद्धाचे हात धरले. त्यानंतर वैभव सातपुतेने जाधव यांचे नाक दाबून आपल्या हातातील विषाची बाटली त्यांच्या तोंडात ओतली.

सुनेसह तिघांची धमकी

तू पेन्शनर पोलीस असल्याने मी तुझ्यावर दाखल केलेल्या गुन्ह्यात पोलिसांनी तुला अटक केली नाही, आता तुला इथे कोण वाचवणार, तुला पाहणारं कोणी नाही, असं धमकवत सुनेने सासऱ्याला शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.

सासऱ्यांना अहमदनगर शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. एमआयडीसी पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी जाधव यांचा जबाब नोंदवून गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक पाठक करत आहेत.

संबंधित बातम्या :

लैंगिक शोषण करुन पीडितेचा गर्भपात, अल्पवयीन मुलाच्या आई वडिलांसह महिला डॉक्टरला अटक

VIDEO | ड्रायव्हरचा ताबा सुटला, गाडी उलटून महिलेचा जागीच मृत्यू, चिमुरड्यांसह 11 प्रवासी गंभीर

Farhan Azmi | आयेशा टाकियाच्या नवऱ्याला अटकपूर्व जामीन, फसवणूक प्रकरणात तूर्तास दिलासा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.