सात जणांची नावं, सुसाईड नोट सेफ्टी पिनने गाठोड्याला अडकवली, कोल्हापुरात महिलेची नदीत आत्महत्या
शनिवारी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास एका महिलेने भडगाव पुलाजवळ हिरण्यकेशी नदीत उडी घेतल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी घटनास्थळावरुन एका सुसाईड नोटसह तिचं काही सामान जप्त केलं आहे.
कोल्हापूर : कोल्हापुरातील हिरण्यकेशी नदीत उडी घेत महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गाठोड्याला सेफ्टी पिनने सुसाईड नोट अडकवून तिने नदीत उडी घेतली होती. गावातील पाच महिला आणि दोन पुरुष अशा सात जणांची नावं तिने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत असल्याची माहिती आहे. आत्महत्येचा प्रकार समोर आल्यानंतर भडगाव पुलावर बघ्यांनी गर्दी केली होती.
सुसाईड नोटमध्ये काय
शनिवारी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास एका महिलेने भडगाव पुलाजवळ हिरण्यकेशी नदीत उडी घेतल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी घटनास्थळावरुन एका सुसाईड नोटसह तिचं काही सामान जप्त केलं आहे. मात्र महिलेची ओळख पटलेली नाही. या सुसाईड नोटमधून महिलेने आत्महत्येचे कारण आणि त्याला जबाबदार असलेल्या व्यक्तींचा उल्लेख केला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं?
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार शनिवारी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास एक महिला पोत्यात बांधलेलं गाठोडं डोक्यावर घेऊन आली होती. भडगाव पुलाच्या पश्चिम बाजूने ती हिरण्यकेशी नदीत उतरली. डोक्यावरील गाठोडं जमिनीवर ठेवत सेफ्टी पिनने त्याला सुसाईड नोट अडकवली. तसंच चिठ्ठीवर दगडही ठेवत गाठोड्यावर तिने ओढणी टाकली. पायातील चप्पल काढून ठेवल्या आणि अनवाणी नदीपात्रात उडी घेत आत्महत्या केली.
सुसाईड नोटमध्ये कोणाची नावं?
पोलिसांनी घटनास्थळी आढळलेलं गाठोडं, चप्पल, ओढणी आणि सुसाईड नोट ताब्यात घेतली आहे. चिठ्ठीत महिलेने आत्महत्येचे कारण आणि जबाबदार व्यक्तींची नावं लिहिल्याची माहिती आहे, मात्र पोलिसांकडून याविषयी माहिती देण्यात आलेली नाही. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास केला जात आहे.
संबंधित बातम्या :
दोन चिमुरड्यांना खाडीत सोडून आई गेली कुठे? डोंबिवलीतील मन हेलावून टाकणारी घटना
ठाण्यात महिलेचा गळफास, आत्महत्येपूर्वी मैत्रिणींना व्हिडीओ पाठवून पतीवर धक्कादायक आरोप