Palghar Boy Murder | विवाहितेने अनैतिक संबंध तोडले, 24 वर्षीय शेजाऱ्याने तिच्या चिमुकल्याला बालदीत बुडवून मारलं

पाच वर्षीय बेपत्ता चिमुकल्याच्या हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात पालघर जिल्ह्यातील बोईसर पोलिसांना मोठं यश आलं आहे. 24 वर्षीय आरोपी महेंद्र सोमर सिंह या नराधमाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

Palghar Boy Murder | विवाहितेने अनैतिक संबंध तोडले, 24 वर्षीय शेजाऱ्याने तिच्या चिमुकल्याला बालदीत बुडवून मारलं
पालघरमध्ये चिमुकल्याची हत्या
Follow us
| Updated on: Dec 09, 2021 | 12:59 PM

मोहम्मद हुसेन खान, पालघर : पालघरमधून बेपत्ता असलेल्या 5 वर्षीय चिमुकल्याचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या चिमुरड्याची बालदीतील पाण्यात बुडवून हत्या करण्यात आल्याचं उघडकीस आलं आहे. चिमुकल्याच्या आईने अनैतिक संबंध तोडल्याने शेजाऱ्यानेच त्याचा जीव घेतल्याची धक्कादायक माहिती आहे. मुंबईजवळच्या बोईसरमध्ये दोन दिवसांपूर्वी ही अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली.

काय आहे प्रकरण?

पाच वर्षीय बेपत्ता चिमुकल्याच्या हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात पालघर जिल्ह्यातील बोईसर पोलिसांना मोठं यश आलं आहे. 24 वर्षीय आरोपी महेंद्र सोमर सिंह या नराधमाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या बोईसर टीमने आरोपीचा शोध लावला. आरोपीच्या विरोधात बोईसर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चिमुकल्याच्या शोधासाठी जागोजागी पोस्टर तसेच सोशल मीडियावर मेसेज पाठवण्यात आले होते. मात्र अशातच त्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. विवाहित महिलेने अनैतिक संबंध तोडल्याने आरोपीने धडा शिकवण्यासाठी हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती आहे.

हत्येचं कारण काय?

24 वर्षीय आरोपी महेंद्र सोमर सिंह आणि चिमुकल्याची आई एकमेकांच्या शेजारीच राहत होते. दरम्यानच्या काळात आरोपीचे विवाहितेशी प्रेमसंबंध जुळले होते. मात्र अचानक महिलेने विवाहबाह्य संबंधांना सुरु ठेवण्यास नकार दिल्याने शेजाऱ्याने धडा शिकवण्याच्या उद्देशाने तिच्या मुलाचा जीव घेतल्याचा आरोप आहे.

बालदीत बुडवून बालकाचा जीव घेतला

चिमुकल्याला पाणी भरलेल्या बालदीमध्ये बुडवून आरोपीने त्याची हत्या केल्याचे उघड झाले आहे. तीन दिवसांपूर्वी बोईसर पोलीस ठाण्यात चिमुकला बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर गुन्हा नोंदवण्यात आला होता. मात्र बेपत्ता चिमुकल्याचा मृतदेह काल आढळून आला होता.

संबंधित बातम्या :

Nagpur Murder | रिलेशनशीपनंतर लग्नाला नकार, प्रियकराने मॉलमध्ये भेटायला बोलवून प्रेयसीचा गळा आवळला

Nashik Wedding Theft | लग्नाला आला, जेवणावर ताव मारला आणि नववधूचे सहा लाखांचे दागिने उचलून पळाला

मुझफ्फरनगरमध्ये 17 शालेय विद्यार्थिनींचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.