30 वर्षीय महिलेचा डोकं उडवलेला नग्न मृतदेह, माथेरानच्या लॉजमधील हत्याकांडाचे धागे गोरेगावपर्यंत कसे पोहोचले?

पूनम पाल हिची धारदार शस्त्राने वार करुन हत्या करण्यात आल्याचं समोर आलं आहे. धक्कादायक म्हणजे हत्येनंतर तिचं मुंडकं घेऊन मित्र पळून गेला. संशयित आरोपी असलेला मित्र आणि तिचं डोकं अद्याप सापडलेलं नाही.

30 वर्षीय महिलेचा डोकं उडवलेला नग्न मृतदेह, माथेरानच्या लॉजमधील हत्याकांडाचे धागे गोरेगावपर्यंत कसे पोहोचले?
माथेरानमध्ये महिलेची डोकं उडवून हत्या
Follow us
| Updated on: Dec 13, 2021 | 12:03 PM

रायगड : माथेरानमधील लॉजमध्ये मुंबईकर महिलेचा शिर नसलेला मृतदेह नग्नावस्थेत आढळल्याने रविवारी एकच खळबळ उडाली होती. गोरेगावमध्ये राहणारी 30 वर्षीय महिला मित्रासोबत तिथे गेली होती. मात्र मित्राने दोघांचीही खोटी नावं लॉजच्या रजिस्टरमध्ये लिहिल्याचं समोर आलं आहे.

काय आहे प्रकरण?

पूनम पाल हिची धारदार शस्त्राने वार करुन हत्या करण्यात आल्याचं समोर आलं आहे. धक्कादायक म्हणजे हत्येनंतर तिचं मुंडकं घेऊन मित्र पळून गेला. संशयित आरोपी असलेला मित्र आणि तिचं डोकं अद्याप सापडलेलं नाही. तिची ओळख पटू नये, यासाठी तिचे कपडे आणि वस्तू घेऊन मारेकरी पळून गेल्याची माहिती आहे.

चेहऱ्यावर मास्क, खोटी नावं

माथेरानमधील लॉजवर आलेलं संबंधित युगुल सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालं. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोघांनी फेसमास्क लावलेले असल्यामुळे, तसेच लॉज मालकांनी आधारकार्डसारखे कुठलेही पुरावे न मागता त्यांची नावं (जी खोटी निघाली) रजिस्टरमध्ये नोंदवून घेतल्याने तपासास दिरंगाई झाली होती.

मेडिकल प्रिस्क्रिप्शनवरुन धागेदोरे गोरेगावपर्यंत

पोलिसांना लॉजपासून काही मीटर अंतरावर एक हँडबॅग सापडली. त्यामधील मेडिकल प्रिस्क्रिप्शनवरुन तपासाचे धागेदोरे गोरेगावपर्यंत पोहोचले. गोरेगाव पोलिसांशी संपर्क साधला असता, पूनम पाल नावाची महिला हरवल्याची तक्रार तिच्या कुटुंबीयांनी पोलिसात दिल्याचं समोर आलं.

लॉज मॅनेजर केतन रमाणे रुम सर्व्हिससाठी गेला असताना त्याला महिलेचा मृतदेह त्यांच्या खोलीत सापडला. शनिवारी संध्याकाळी माथेरानमध्ये प्रवेश करताना दस्तुरी नाका एन्ट्री पॉईंटवरील सीसीटीव्हीमध्ये दोघं कैद झाले होते. मात्र तो परत जाताना सीसीटीव्हीत दिसला नाही, याचा अर्थ पळून जाण्यासाठी त्याने दुसरा रस्ता वापरला असावा, असा अंदाज आहे.

आरोपीची ओळख पटलेली नाही

आरोपीची ओळख अद्याप निश्चित झालेली नाही. माथेरान पोलिसांनी आरोपी आणि महिलेचं डोकं यांचा शोध घेण्यासाठी पाच पथकं तयार केली आहेत. तीन टीम्स मुंबई पोलिसांसोबत, तर दोन टीम्स रायगड पोलिसांसोबत तपास करत आहेत. महिलेचे धड पनवेलमधील रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहे.

माथेरान पर्यटन स्थळ म्हणून विकसित झाल्याने तिथे लॉजची संख्या वाढत चालली आहे. सोबतच अनेक जणांनी अनधिकृतपणे तिथे लॉज किंवा होम स्टे थाटले आहेत. पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने यावर अंकुश ठेवावा, अशी मागणी जोर धरत आहे.

संबंधित बातम्या

माथेरानमध्ये आढळला शिर कापलेला महिलेचा मृतदेह, आरोपीला पकडण्याचे पोलिसांसमोर आव्हान

Pune crime| सिंहगड कॉलेजमधला २२ वर्षीय विद्यार्थी करायचा हाय टेक चोरी ; चोरीची पद्धत वाचून तुम्ही व्हाल हैराण

VIDEO | कल्याणमध्ये पक्षाचा प्रचार करणाऱ्या भाजप युवा मोर्चा अध्यक्षाला मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.