Lift Accident | लिफ्ट कोसळून 9 डॉक्टर जखमी, पनवेलच्या हॉस्पिटलमध्ये अपघात

रायगड जिल्ह्यात नवीन पनवेल शहरातील आमले हॉस्पिटलमध्ये लिफ्ट कोसळून 9 डॉक्टर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. फायर ब्रिगेड जवानांनी डॉक्टरांची सुटका करत त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Lift Accident | लिफ्ट कोसळून 9 डॉक्टर जखमी, पनवेलच्या हॉस्पिटलमध्ये अपघात
लिफ्ट कोसळून डॉक्टर जखमीImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Apr 01, 2022 | 11:46 AM

रायगड : लिफ्ट कोसळून 9 डॉक्टर (Doctor) जखमी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. रायगड जिल्ह्यात नवीन पनवेल शहरातील आमले हॉस्पिटलमध्ये ही धक्कादायक घटना घडल्याचं उघडकीस आलं आहे. रुग्णालयातील लिफ्टमध्ये बिघाड (Life Accident) होऊन एकाच वेळी 9 डॉक्टरांना दुखापत झाली. दुसऱ्या मजल्यावर पोहोचताच लिफ्टमध्ये बिघाड झाला आणि ती काही सेकंदातच तळ मजल्यावर येऊन आदळली. या अपघातानंतर तात्काळ अग्निशमन दलातील जवानांना पाचारण करण्यात आलं. फायर ब्रिगेड जवानांनी डॉक्टरांची सुटका करत त्यांना हॉस्पिटलमध्ये (Raigad) दाखल केलं. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झालेली नाही.

नेमकं काय घडलं?

रायगड जिल्ह्यात नवीन पनवेल शहरातील आमले हॉस्पिटलमध्ये लिफ्ट कोसळून 9 डॉक्टर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. काही महिन्यांपूर्वीच सुरु करण्यात आलेल्या आमले रुग्णालयात डॉक्टरांसाठी गेट टूगेदरचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रुग्णालयाची पाहणी झाल्यावर तिसऱ्या मजल्यावरून 9 डॉक्टर तळ मजल्यावर जेवणासाठी निघाले. मात्र दुसऱ्या मजल्यावर पोहोचताच लिफ्टमध्ये बिघाड झाला आणि लिफ्ट काही सेकंदातच तळ मजल्यावर येऊन आदळली.

लिफ्टमधील सर्व 9 डॉक्टर जखमी

उर्वरित डॉक्टरांनी अग्निशमन दलास पाचारण केले असता अग्निशमन दलातील जवानांनी तात्काळ या सर्व 9 डॉक्टरांना लिफ्टमधून बाहेर काढले. या दुर्घटनेत लिफ्टमधील सर्व 9 डॉक्टर जखमी झाले आहेत. या सर्व डॉक्टरांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून या घटनेची नोंद खांदेश्वर पोलिस ठाण्यात करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या :

पाचव्या मजल्यावरुन लिफ्टच्या खड्ड्यात पडला, नाशकात 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू

खेळायला गेला अन् अक्रित घडलं, एकुलत्या एक मुलाचा खड्ड्यात आढळला मृतदेह, ठाण्यात काय घडलं ?

धक्कादायक, लिफ्टमध्ये चिरडून 9 वर्षीय मुलीचा मृत्यू

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.