चार राज्यांचे पोलीस मागावर, 32 गुन्हे दाखल, देवदर्शनाला आला आणि सराईत दरोडेखोर जाळ्यात

आरोपी सराईत गुन्हेगार असून तो पळून जाण्यात पटाईत असल्याने पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली. अत्यंत नाट्यमयरित्या या आरोपीला अखेर पोलिसांनी जाळ्यात घेतलं. आरोपी सुखदेव पवार याच्यासह त्याचा साथीदार अंबादास शंकर गायकवाड याला सोलापूर शहरातील सलगर वस्ती परिसरातून पोलिसांनी अटक केली

चार राज्यांचे पोलीस मागावर, 32 गुन्हे दाखल, देवदर्शनाला आला आणि सराईत दरोडेखोर जाळ्यात
सोलापुरात सराईत दरोडेखोराला बेड्या
Follow us
| Updated on: Feb 16, 2022 | 7:22 AM

सोलापूर : केवळ महाराष्ट्रच नाही तर कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा यासारख्या विविध राज्यातील पोलिसांना हव्या असलेल्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात सोलापूर ग्रामीण पोलिसांना (Solapur Crime) यश आलं आहे. सुखदेव धर्मा पवार असे या 55 वर्षीय आरोपीचे नाव आहे. आरोपी सुखदेव विरोधात विविध राज्यात तब्बल 32 गुन्हे (Robbery) दाखल आहेत. सुखदेव पवार वागदरी येथे देवदर्शनाला येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या आधारे पोलिसांनी सापळा रचला आणि आरोपी जाळ्यात सापडला. अत्यंत नाट्यमयरित्या पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. . आपल्या मित्रांना, नातेवाईकांना घेऊन तो चोरी करत होता. महाराष्ट्रात त्याच्यावर आतापर्यंत 13 गुन्हे दाखल आहेत. तर 2017 पासून एकूण 12 गुन्ह्यांमध्ये तो कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या पोलिसांना देखील हवा होता.

काय आहे प्रकरण?

6 फेब्रुवारी रोजी मंद्रुप पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नांदणी गावातील एका परमिट बारवर दरोडा पडलेला होता. बारचे मॅनेजर गंगाराम वाघमोडे यांचे हातपाय बांधून त्यांना मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर दरोडेखोरांनी महागडी दारु, 20 हजार रुपये रोख आणि मोबाईल लुटला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना मुख्य संशयित सुखदेव पवार हा वागदरी येथे देवदर्शनाला येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

नाट्यमयरित्या आरोपीला अटक

या माहितीच्या आधारे पोलिसांनी वागदरी रस्त्याच्या पुलाजवळ सापळा रचला होता. आरोपी सराईत गुन्हेगार असून तो पळून जाण्यात पटाईत असल्याने पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली. अत्यंत नाट्यमयरित्या या आरोपीला अखेर पोलिसांनी जाळ्यात घेतलं. आरोपी सुखदेव पवार याच्यासह त्याचा साथीदार अंबादास शंकर गायकवाड याला सोलापूर शहरातील सलगर वस्ती परिसरातून पोलिसांनी अटक केली. आरोपींच्या चौकशीतून आणखी 8 आरोपींचे नाव निष्पन्न झाले असून त्यांचा शोध सुरु असल्याची माहिती पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली.

आरोपी सुखदेव पवार हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर आतापर्यंत एकूण 32 गुन्हे दाखल आहेत. यामध्ये विशेषत: चोरी आणि दरोड्याच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. आपल्या मित्रांना, नातेवाईकांना घेऊन तो चोरी करत होता. महाराष्ट्रात त्याच्यावर आतापर्यंत 13 गुन्हे दाखल आहेत. तर 2017 पासून एकूण 12 गुन्ह्यांमध्ये तो कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या पोलिसांना देखील हवा होता.

जवळपास 5 वर्षांनंतर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याला नांदणीच्या गुन्ह्यात पोलिस कोठडी मिळाली असून एकानंतर एक अशा वेगवेगळ्या गुन्ह्यात आरोपीला वर्ग करण्यात येईल, अशी माहिती पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली.

दरोड्यात 10 जणांचा समावेश

दरम्यान नांदणी येथील बारवरील दरोड्याच्या गुन्ह्यात एकूण 10 जणांचा समावेश निष्पन्न झाला आहे. त्यापैकी दोन आरोपी अटकेत असून उर्वरित 8 आरोपी अद्यापही फरार आहेत. अटकेत असलेल्या आरोपींकडून 28 बॉक्स दारु आणि गुन्ह्यात वापरलेली गाडी जप्त करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलिस अधीक्षक हिंमत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील, सपोनि रविंद्र मांजरे, सहाय्यक फौजदार ख्वाजा मुजावर यांच्या पथकाने ही कारवाई केलीय.

संबंधित बातम्या :

आगे दंगा चालू है…म्हणत भामट्यानं वृद्धेला थांबवून अंगावरचं सोनं पळवलं, औरंगाबादेत कुठे घडला प्रकार?

 सूर्या लॉन्सवरील हळदीच्या कार्यक्रमात चोरलेले 42 तोळे दागिने मिळाले, औरंगाबाद पोलिसांची कारवाई

ATM कार्डला जन्म तारखेचा पिन ठेवणं महागात, रेल्वे अधिकाऱ्याचे 75 हजार टीव्ही अभिनेत्याने उडवले

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.