AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उस्मानाबादेत ट्रक उलटला, 70 लाखांचे एलईडी, मोबाईल गावकऱ्यांनी पळवल्याचा दावा

सोमवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास सोलापूर-औरंगाबाद हायवेवर उस्मानाबादजवळ हा अपघात झाला होता.

उस्मानाबादेत ट्रक उलटला, 70 लाखांचे एलईडी, मोबाईल गावकऱ्यांनी पळवल्याचा दावा
प्रातिनिधीक फोटो
| Edited By: | Updated on: Jun 16, 2021 | 12:47 PM
Share

उस्मानाबाद : ‘फुकट तिथे चिकट’ ही प्रवृत्ती सर्रासपणे पाहायला मिळते. अपघातानंतर मदतीला धावून जाणारे हात कमी, आणि त्यांना लुबाडणारे हात जास्त असल्याचं चित्र हल्ली अनेक वेळा पाहायला मिळतं. माल वाहतूक करणाऱ्या ट्रकला अपघात झाला, तर मदतीऐवजी लूट होण्याच्या घटना समोर आल्या आहेत. नुकताच उस्मानाबादमध्ये ट्रक उलटून अपघात झाला. या ट्रकमधील मोबाईल फोन, एलईडी टीव्ही अशा 70 लाख रुपये किमतीच्या इलेक्ट्रिक उपकरणांची लूट झाल्याचा दावा केला जात आहे. (Truck Overturns Villagers Loot Mobile Phones LED TVs Worth Rs 70 Lakh In Osmanabad)

70 लाखांची विद्युत उपकरणं चोरीला

कोंबड्यांपासून मद्यापर्यंत खाण्या-पिण्याच्या वस्तूंची वाहतूक करणाऱ्या ट्रकचे अपघात झाल्यानंतर त्यांची पळवापळवी होत असल्याचं आधीही अनेकदा दिसलं आहे. मात्र उस्मानाबाद ट्रक उलटल्यानंतर त्यातील इलेक्ट्रिक उपकरणांची लूट झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पादचारी आणि गावकऱ्यांनी तब्बल 70 लाख रुपये किमतीचा ऐवज चोरुन नेल्याचा दावा केला जात आहे. ही उपकरणं परत मिळवण्यासाठी पोलिसांची पथकं रवाना करण्यात आली.

सोलापूर-औरंगाबाद हायवेवर ट्रक उलटला

सोमवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास सोलापूर-औरंगाबाद हायवेवर उस्मानाबादजवळ हा अपघात झाला होता. “ट्रकमध्ये मोबाईल फोन, कॉम्प्युटर, एलईडी टीव्ही, खेळणी अशी विद्युत उपकरणे होती. अपघातानंतर ती रस्त्यावर पडली, तेव्हा गावकऱ्यांची त्या वस्तू उचलण्यासाठी झुंबड उडाली. काही जणांनी कंटेनरचा दरवाजा उघडून वस्तू लांबवल्या. स्थानिक पोलीस आणि दंगल नियंत्रण पथकाला बोलवावं लागलं.” अशी माहिती ट्रक चालकाने दिली.

40 टक्के वस्तू परत मिळाल्या

पोलिसांच्या आवाहनानंतर काही जणांनी वस्तू परत केल्या. त्यानंतर उर्वरित वस्तू शोधण्यासाठी पोलीस गावात हिंडू लागले. 70 लाखांच्या वस्तू लुबाडल्याचा दावा केला जात असून त्यापैकी 40 टक्के वस्तू परत मिळाल्याची माहिती आहे. सर्च ऑपरेशन अजूनही सुरु असल्याचं वरिष्ठ पोलीस अधिकारी मोतीचंद राठोड यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

कोंबड्यांचा ट्रक उलटला, पळवापळवीसाठी नागरिकांची झुंबड, 300 कोंबड्यांची लूट

साताऱ्यात कोंबड्यांना घेऊन जाणाऱ्या टेम्पोचा अपघात, तब्बल 600 कोबड्यांचा मृत्यू

(Truck Overturns Villagers Loot Mobile Phones LED TVs Worth Rs 70 Lakh In Osmanabad)

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.