Nanded Accident : नांदेड-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात, सोमनाथ हंटेच्या शरीराचे अक्षरश: दोन तुकडे!

नांदेड-हैदराबाद महामार्गावर (Nanded-Hyderabad highway) रात्री एक भीषण अपघात (Accident) झाला. यात एका व्यक्तीचा जागीच जीव (Death) गेला असून पोलिसांनी ट्रकचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. देगलूरपासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या खानापूर इथं भरधाव ट्रकने एका पादचाऱ्याला चिरडले.

Nanded Accident : नांदेड-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात, सोमनाथ हंटेच्या शरीराचे अक्षरश: दोन तुकडे!
सोमनाथ हंटे अपघातामध्ये मृत पावलेला तरूण
Follow us
| Updated on: Feb 04, 2022 | 8:55 AM

नांदेड : नांदेड-हैदराबाद महामार्गावर (Nanded-Hyderabad highway) रात्री एक भीषण अपघात (Accident) झाला. यात एका व्यक्तीचा जागीच जीव (Death) गेला असून पोलिसांनी ट्रकचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. देगलूरपासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या खानापूर इथं भरधाव ट्रकने एका पादचाऱ्याला चिरडले. अपघात इतका जास्त भीषण होता की, ट्रकचालकाने पादचाऱ्याला 100 फुटओढत नेले. यात पादचाऱ्याच्या शरीराचे अक्षरशः दोन तुकडे झाले.

तरूणाचा जागीच मृत्यू, ट्रकचालक फरार

सोमनाथ हंटे अस मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. अपघात होताच ट्रकचालकाने ट्रकसह पलायन केले. मात्र गावकऱ्यांनी पाठलाग करत तेलंगणातून ट्रक ताब्यात घेतला आहे. अपघात झालेल्या ठिकाणी बघ्यांनी मोठी गर्दी झाली होती. अपघातामुळे दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती आणि वाहनांच्या मोठं-मोठ्या रांगाचा लागल्या होत्या. दरम्यान, या प्रकरणी देगलूर पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रक चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

खानापूर फाटा ठरलाय मृत्यूचा सापळा

नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील खानापूर फाटा हे ठिकाण सध्या मृत्यूचा सापळा झाले आहे. नांदेडहून हैद्राबादकडे भरधाव वेगाने जाणारी हजारो वाहने याच फाट्यावरून जातात. तसेच खानापूर फाट्यावर असलेल्या चौकातून मुखेड आणि बिलोलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर देखील वाहनांची मोठी वर्दळ असते. त्याचबरोबर खानापूर फाटा इथे देशी आणि विदेशी मद्य विक्रीची दुकाने भर चौकातच आहेत. या दुकानातुन दारू घेऊन रस्त्यावर येणाऱ्यांचे अनेक बळी आजवर या ठिकाणी गेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील मृत्यूचा सापळा म्हणून खानापूर फाटा या ठिकाणची ओळख झालीय.

संबंधित बातम्या : 

Pune Building Slab Collapse Live : पुणे स्लॅब कोसळून दुर्घटनेबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

Yavatmal : यवतमाळमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याची गोळ्या झाडून निर्घृण हत्या, व्यावसायिक वादातून हत्या झाल्याचा संशय

एकापेक्षा एक भारीतले ब्रॅन्ड गोव्यातून सोलापुरात आणले खरे! पण दारु रिचवण्याआधीच मोठी कारवाई

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.