भयंकर… ऑफिसमध्ये खुर्चीवर बसण्यावरून वाद; एकाने दुसऱ्याला थेट गोळ्याच घातल्या

गुरुग्राममध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. ऑफिसात काम करणाऱ्या दोन तरुणांमध्ये खुर्चीवर बसण्यावरून वाद झाला. त्यामुळे एकाने दुसऱ्यावर गोळी घातली आहे.

भयंकर... ऑफिसमध्ये खुर्चीवर बसण्यावरून वाद; एकाने दुसऱ्याला थेट गोळ्याच घातल्या
gurugramImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 30, 2023 | 7:01 AM

नवी दिल्ली : गुरुग्रामच्या एका कार्यालयात दोन कर्मचाऱ्यांमध्ये ऑफिसात बसण्यावरून वाद झाला. त्यामुळे एका कर्मचाऱ्याचा राग अनावर झाल्याने त्याने थेट आपल्या सहकाऱ्यावरच गोळी झाडली. या गोळीबारात सहकारी कर्माचारी गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जातं. एका फायनान्शियल फर्ममध्ये हा प्रकार घडला. पोलिसांनी संबंधित तरुण फरार झाला असून त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी अनेक ठिकाणी छापेमारी सुरू केली आहे. त्याला लवकरच अटक केली जाईल असं पोलिसांनी म्हटलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑफिसात दोन कर्मचाऱ्यांमध्ये खुर्चीवर बसण्यावरून वाद झाला होता. त्यामुळे दुसरा कर्मचारी प्रचंड संतापला होता. आपला अपमान झाल्याची भावना निर्माण झाल्याने त्याने सहकाऱ्याला रमाडा हॉटेलजवळ गोळ्या घातल्या. त्यामुळे गोळी लागल्याने हा सहकारी गंभीर जखमी झाला आहे. त्याला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. तर आरोपीवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आरोपी अमन जांगडा हरियाणाच्या हिसार जिल्ह्यातील रहिवासी आहे. तर पीडित तरुणाचे नाव विशाल (वय 23) असे असून तो ग्रुरुग्राम सेक्टर 9 मधील फिरोज गांधी कॉलोनीतील रहिवाशी आहे.

हे सुद्धा वाचा

एफआयआर दाखल

या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी विशालच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती दिली आहे. पीडित व्यक्तीच्या भावाच्या तक्रारीनंतर आरोपीविरोधात भादंवि कलम 307 अन्वये आणि शस्त्र अधिनियमाच्या कलम 25-54-59 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

ऑफिसातून बाहेर पडल्यावर हल्ला

विशाल आणि आरोपी अमन जांगडा यांच्यात मंगळवारी खुर्चीवर बसण्यावरून वाद झाला होता. दोघांनीही एकमेकांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली होती. त्यानंतर बुधवारी पुन्हा या दोघांमध्ये खुर्चीवर बसण्यावरून वाद झाला होता. त्यानंतर संध्याकाळी दोघेही ऑफिस सुटल्यावर बाहेर पडले. रस्त्यावरून जात असताना अमन पाठिमागून आला.

त्याने पिस्तुल काढली आणि अंगावर गोळी झाडली, असं विशालने सांगितलं. गोळ्या झाडल्यांतर अमन घटनास्थळावरून फरार झाला आहे. अमन अजूनही पोलिसांच्या ताब्यात आलेला नाही. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी दिल्लीपासून हरयाणापर्यंत अनेक ठिकाणी छापेमारी सुरू केली आहे. अमनला लवकरच अटक केली जाईल, असं डीसीपी वीरेंद्र विज यांनी सांगितलं.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.