VIDEO : नेमकं असं काय घडलं ज्यामुळे पतीने स्वत:च्या गर्भवती पत्नीवर गोळ्या झाडल्या? थरार सीसीटीव्हीत कैद

दिल्लीच्या निजामुद्दीन (Nizamuddin) परिसरात मंगळवारी (27 एप्रिल) सकाळी दहा वाजेच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली (Man firring on his pregnant wife in Delhi nizamuddin).

VIDEO : नेमकं असं काय घडलं ज्यामुळे पतीने स्वत:च्या गर्भवती पत्नीवर गोळ्या झाडल्या? थरार सीसीटीव्हीत कैद
पतीने स्वत:च्या गर्भवती पत्नीवर गोळ्या झाडल्या
Follow us
| Updated on: Apr 28, 2021 | 4:10 PM

नवी दिल्ली : दिल्लीच्या निजामुद्दीन (Nizamuddin) परिसरात मंगळवारी (27 एप्रिल) सकाळी दहा वाजेच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. एका नराधमाने स्वत:च्या गर्भवती पत्नीवर गोळ्या झाडल्या. यावेळी त्याला अडवण्यासाठी पुढे आलेल्या एका युवकालाही त्याने गोळी मारली. या हल्ल्यात आरोपीच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर तिला वाचवण्यासाठी पुढे आलेला तरुण गंभीर जखमी झाला. विशेष म्हणजे पत्नीला मारुन तो कुठेही पळाला नाही. घटनास्थळी पोलीस दाखल होताच त्याने स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केलं (Man firring on his pregnant wife in Delhi nizamuddin).

पत्नी दोन दिवसांपूर्वीच जेलमधून आलेली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक महिलेचं नाव शायना असं होतं. ती आठ महिन्यांची गर्भवती होती. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीच ती तिहार जेलमधून बाहेर आली होती. ती गर्भवती असल्याने तिला जामीन मिळाला होता. शायना एनडीपीएस अॅक्ट (नार्कोटिक्स ड्रग्ज अॅण्ड सायकोट्रॉफीक सबस्टन्स अॅक्ट) अंतर्गत जेलमध्ये होती (Man firring on his pregnant wife in Delhi nizamuddin).

वर्षभरापूर्वी लग्न

शायना हिचं आरोपी वसीमसोबत एक वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. मात्र, लग्नानंतर ती एनडीपीएस अॅक्ट अंतर्गत पकडली गेली. त्यामुळे तिला अटक करण्यात आली होती. ती जेलमध्ये असताना वसीम याची तिच्या बहिणीशी ओळख झाली. दोघांमध्ये मैत्री झाली. त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात बदललं. त्यानंतर ते दोघं एकत्रच राहू लागले.

पती-पत्नीमध्ये जोरदार वाद

दरम्यान, शायना दोन दिवसांपूर्वी जेलमधून सुटली. तिला भेटण्यासाठी वसीम गेला नाही. तिला तिची बहीण आणि वसीम यांच्या संबंधांविषयी देखील माहिती मिळाली. याच विषयावरुन वसीम आणि शायना यांच्यात वाद सुरु झाला. दोघांमध्ये मंगळवारी सकाळी निजामुद्दीन परिसरात वाद सुरु होता. यावेळी रागाच्या भरात वसीमने पिस्तूल बाहेर काढून शायनावर चार गोळ्या झाडल्या.

संपूर्ण थरार सीसीटीव्ही कैद

वसीमने त्याच्या शेजारी असलेल्या एका तरुणावर देखील गोळी झाडली. याशिवाय शायनाला वाचवण्यासाठी पुढे आलेल्या तरुणावरही त्याने गोळी झाडली. त्याचबरोबर जर कुणी गल्लीत दिसला तर त्याच्यावर गोळी झाडेल, अशी धमकी त्याने इतरांना दिली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय.

पोलीस घटनास्थळी दाखल

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी वसीमने स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केलं. वसीमची पत्नी शायनाचा जागेवरच मृत्यू झाला. तर तरुणावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलीस सध्या प्रकरणावरुन वसीमची चौकशी करत आहेत.

घटनेचा व्हिडीओ बघा : 

हेही वाचा : तांदूळ व्यापाऱ्यावर कार्यालयात गोळीबार, छातीत गोळी लागून रमेश अग्रवाल गंभीर जखमी

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.