AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दारुच्या नशेत भल्या पहाटे नंगानाच, पत्नीला मारहाण, पोटच्या मुलाचं डोकं भींतीवर आपटलं, कुटुंबाचा दोष नेमका काय?

एका नराधमाने पत्नीसोबत वाद सुरु असताना त्याच्या मुलाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला म्हणून त्याला जीवे मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे (Man Killed his son)

दारुच्या नशेत भल्या पहाटे नंगानाच, पत्नीला मारहाण, पोटच्या मुलाचं डोकं भींतीवर आपटलं, कुटुंबाचा दोष नेमका काय?
प्रातिनिधिक फोटो
| Updated on: May 26, 2021 | 2:31 PM
Share

भोपाल : आई-वडील आपल्या मुलांवर प्रचंड प्रेम करतात. ‘मुलं ही देवाघरची फुलं’ अशी म्हण देखील प्रचलित आहे. मात्र, काही विकृत लोकांना आपल्या मुलांप्रती कोणतीच सहानुभूती किंवा प्रेम नसतं. त्यामुळे ते रागात आपल्या पोटच्या मुलाचा जीव घेण्यासही मागेपुढे बघत नाहीत. अशीच काहिशी घटना मध्य प्रदेशच्या शिवपूरी भागात घडली आहे. एका विकृताचे पत्नीसोबत वाद झाल्यानंतर 10 वर्षीय मुलाने दोघांमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला म्हणून त्याने पोटच्या मुलाला जीवे मारलं. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त केली जात आहे (Man Killed his son).

आरोपीकडून आधी पत्नीला मारहाण

शिवपूरी येथे वास्तव्यास असलेल्या शौकीन आदिवासी याला दारुचं व्यसन आहे. तो काल (25 मे) सकाळी देखील दारुच्या नशेत होता. त्याने भर पहाटे दारुच्या नशेत घरात आरडाओरड करायला सुरुवात केली. त्याने आपल्या पत्नीला शिविगाळ केली. त्यावरुन दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. या वादातून आरोपी शौकीन याने पत्नीला अमानुषपणे मारहाण करण्यास सुरुवात केली (Man Killed his son).

भांडणाचा आवाज ऐकून मुलगा झौपेतून उठला

शौकीनची पत्नीवरील दादागिरी सुरु असताना त्याच्या भांडणाचा आवाज परिसरातील आजूबाजूच्या घरांमध्येही गेला. भल्या पहाटे शौकिन घरात वाद घालत असल्याने अनेकांना वाईट वाटलं. दरम्यान, या भांडणाचा आवाज ऐकून शौकिनचा दहा वर्षीय मुलगा झोपेतून उठला. झोपेतून उठल्याच क्षणी त्याच्या कानावर वडिलांच्या शिविगाळचा आणि आईच्या रडण्याचा आवाज ऐकू आला.

मुलाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करताच बापाने जीवे मारलं

वडील आपल्या आईला मारहाण करत असल्याचं बघून तो घाबरला. आपल्या आईला वाचवण्यासाठी तो मध्ये पडला. त्याने आपल्या वडिलांना मारहाण करण्यासापासून रोखण्याचा प्रयत्न केला. त्याच्या हैवान बापाने दारुच्या नशेत त्यालाही मारहाण केली. शौकीनने आपल्या मुलाचा माथा भींतीवर आदळला. त्यामुळे मुलाचा जागेवरच मृत्यू झाला.

पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु

आपल्याकडून मुलाची हत्या झाली हे शौकीनच्या लक्षात आल्यानंतर तो तातडीने घरातून पळून गेला. त्याच्या पत्नीने आपल्या मुलाला आवाज दिला. पण तो उठला नाही. त्यानंतर तिने हंबरडा फोडला. तिने या घटनेची माहिती शेजारच्यांना दिली. त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सर्व घटना समजून घेतली. त्यांनी याप्रकरणी शौकीन विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरु केला आहे. पोलीस सध्या शौकीनच्या मागावर आहेत.

हेही वाचा :

आधी कोयत्याच्या धाकाने बेदम मारहाण, नंतर तरुणाला गाडीवर बसवून चौघे पसार

नवी मुंबईत शिवसेना नेत्याचे भररस्त्यात बर्थडे सेलिब्रेशन, गर्दी जमवून आतषबाजी

हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.