पहिल्या पत्नीपासून एक मुलगा, दुसऱ्या पत्नीसोबतही वाद, मध्यरात्री हत्या करुन पोलीस ठाण्यात दाखल, आरोपी पतीने असं का केलं?

एका इसमाने आपल्या पत्नीची तलवारीने गळा चिरुन हत्या केली आहे (man murder his second wife in jodhpur).

पहिल्या पत्नीपासून एक मुलगा, दुसऱ्या पत्नीसोबतही वाद, मध्यरात्री हत्या करुन पोलीस ठाण्यात दाखल, आरोपी पतीने असं का केलं?
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: May 11, 2021 | 3:04 PM

जयपूर : राजस्थानच्या जोधपूर शहरात धक्कादायक घटना समोर आली आहे. एका इसमाने आपल्या पत्नीची तलवारीने गळा चिरुन हत्या केली आहे. विशेष म्हणजे आरोपीने पत्नीची हत्या केल्यानंतर तो पोलीस ठाण्यात गेला. तिथे त्याने आपला गुन्हा कबूल केला आणि स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केलं. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु आहे (man murder his second wife in jodhpur).

आधी कडाक्याचं भांडण, मग हत्या

संबंधित घटना ही रविवारी (9 मे) रात्री उशिरा घडली. जोधपूरच्या पीपरली गावात ही घटना घडली. आरोपी पती आणि त्याच्या पत्नीमध्ये कडाक्याचं भांडण झालं. या भांडणात ते एकमेकांवर तुटून पडले. या भांडणावेळी पतीने रागात पत्नीवर तलवारीने हल्ला केला. त्याने पत्नीची गळा चिरून हत्या केली. त्यानंतर तो पोलीस ठाण्यात गेला. तिथे त्याने आपला गुन्हा कबूल केला (man murder his second wife in jodhpur).

हत्येमागील कारण काय?

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला. तो मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. मृतक महिला ही आरोपीची दुसरी पत्नी होती. त्याला पहिल्या पत्नीपासून एक मुलगा देखील आहे. आरोपीचं दुसऱ्या पत्नीसोबतही जमत नव्हतं. त्याला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. यावरुन त्यांच्यात वाद सुरु होता. याच विषयावरुन दोघांमध्ये रविवारी रात्री कडाक्याचं भांडण झालं. त्यात त्याने पत्नीची हत्या केली.

पोलिसांनी कारवाई कशी केली?

हे प्रकरण अवैध संबंधांविषयी सांगितलं जात आहे. पोलीस आरोपीच्या जेव्हा घरी गेले तेव्हा पलंगावर रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह मिळाला होता. तिथली परिस्थिती बघितल्यावर तातडीने एफएसएल पथकाला तिथे पाचरण करण्यात आलं होतं. त्यानंतर पोलिसांनी मृतदेहाला मथुरादास माथूर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवलं होतं.

पोलिसांना घटनास्थळी आरोपीची तलवार मिळाली आहे. ही तलवार रक्ताने भरलेली होती. पोलिसांनी ही तलवार जप्त केली आहे. तसेच आरोपीलाही बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांकडून अजूनही तपास सुरु आहे. महिलेच्या माहेरच्यांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे.

हेही वाचा : निर्लज्जपणाचा कळस! अखेरच्या घटका मोजणाऱ्या नवऱ्यासमोरच महिलेचा कम्पाऊण्डरकडून विनयभंग

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.