संतापजनक ! लग्नाआधी महिलेचं सात वर्ष लैंगिक शोषण, लग्नानंतरही ब्लॅकमेल करत चार वर्ष छळलं, विरोध करताच आक्षेपार्ह फोटो व्हायरल

उत्तर प्रदेशच्या आंबेडकरनगर येथील अलीगंज पोलीस ठाण्यात विचित्र आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे (married woman accused her ex boyfriend of blackmailing and sexual exploitation).

संतापजनक ! लग्नाआधी महिलेचं सात वर्ष लैंगिक शोषण, लग्नानंतरही ब्लॅकमेल करत चार वर्ष छळलं, विरोध करताच आक्षेपार्ह फोटो व्हायरल
हा धर्मगुरू मूळचा गुजरातमधील आहे.
Follow us
| Updated on: Mar 21, 2021 | 7:43 PM

लखनऊ : उत्तर प्रदेशच्या आंबेडकरनगर येथील अलीगंज पोलीस ठाण्यात विचित्र आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. या भागातील एका विवाहित महिलेचा आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. संबंधित महिलेने आरोपीच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पीडितेने आरोपीवर गंभीर आरोप केले आहेत. आरोपीने लग्नाआधी सात वर्ष लैंगिक शोषण केलं. त्याने लग्नानंतरही ब्लॅकमेल करत चार वर्ष वारंवार बलात्कार केला, असे गंभीर आरोप पीडितेने केले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला आहे (married woman accused her ex boyfriend of blackmailing and sexual exploitation).

नेमकं प्रकरण काय?

या प्रकरणावर पोलीस अधीक्षक आलोक प्रियदर्शी यांनी प्रतिक्रिया दिली. महिलेने मुस्तकीम नावाच्या व्यक्तीवर गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुस्तकीमने लग्नाचं आमीष दाखवून सलग सात वर्ष महिलेचं लैंगिक शोषण केलं. या काळात त्याने महिलेसोबत काही व्हिडीओ आणि फोटो देखील तयार केले. मात्र, पुढे त्याने महिलेला लग्नास नकार दिला. त्यानंतर महिलेच्या कुटुंबियांनी तिचं लग्न दुसऱ्या व्यक्तीसोबत लावून दिलं.

प्रतिकार करताच फोटो व्हायरल

मात्र, लग्नानंतर मुस्तकीम महिलेला त्रास देऊ लागला. तिच्यासोबतचे खाजगी फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊ लागला. महिलेला धमकी देऊन त्याने महिलेच्या लग्नानंतर तिला चार वर्ष छळले. तो महिलेचे लैंगिक शोषण करायचा. अखेर एकेदिवशी महिलेने या गोष्टीस प्रतिकार केला. त्यानंतर मुस्कीमने पीडितीचा आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर शेअर केले.

पीडितेचा आत्महत्येचा इशारा

याप्रकरणी पोलिसांनी तातडीने आरोपीला बेड्या ठोकाव्यात, अशी मागणी पीडित महिलेने केले आहे. पोलिसांनी 24 तासात आरोपीला अटक केली नाही तर आत्महत्या करणार, असा इशारा महिलेने दिला आहे (married woman accused her ex boyfriend of blackmailing and sexual exploitation).

हेही वाचा : तीन वेळा लँडिंगचा प्रयत्न निष्फळ, विमान तासभर हवेतच, प्रवासी अक्षरक्ष: रडले, अहमदाबाद-जैसलमेर फ्लाईटच्या प्रवाशांना भयानक अनुभव

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.