मंत्रालयातील अधिकाऱ्याचे व्हॉट्सअॅप खाते हॅक, आरोपी करत होते पैशांची मागणी, पोलिसांनी ‘अशा’ आवळल्या मुसक्या
दिल्ली पोलिसांनी व्हॉट्सअॅप हॅक करून पैसे मागणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात दोन नायजेरियन नागरिकांना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी परिवहन मंत्रालयाती एका उच्चपदस्त अधिकाऱ्याचे व्हॉट्सअॅप अकाउंट हॅक केले होते.
नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी व्हॉट्सअॅप हॅक करून पैसे मागणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात दोन नायजेरियन नागरिकांना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी परिवहन मंत्रालयाती एका उच्चपदस्त अधिकाऱ्याचे व्हॉट्सअॅप अकाउंट हॅक केले होते. या अकाउंटचा वापर करून ते पैशांची मागणी करत होते. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांने पोलिसात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तात्रिक बाबींचा अभ्यास करून आरोपींना बेड्या ठोकल्या.
असा काढला आरोपींचा माग
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, परिवहन मंत्रालयातील एका उच्चपदस्त अधिकाऱ्याने पोलिसात आपले व्हॉट्सअॅप अकाउंट हॅक झाल्यची तक्रार केली होती. आरोपी मेडिकल इमरजेंसीचे कारण सांगून या व्हॉट्सअॅप अकाउंटच्या माध्यमातून अनेकांना पैशांची मागणी करत होते. तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी फोन लोकेशनच्या मदतीने आरोपींचा माग काढला. त्यानंतर त्यांना दिल्लीच्या उत्तम नगर परिसरातून अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून चार मोबाईल, लॅपटॉप आणि अनेक सीमकार्ड जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
गेल्याच आठवड्याती तीन नायजेरियन नागरिकांना अटक
दरम्यान गेल्याच आठवड्यात उत्तरप्रदेशमधून तीन नायजेरियन नागरिकांना अटक करण्यात आली होती. हे आरोपी तरुणांना महागड्या गिफ्टचे अमिष दाखून लूटत होते. त्यांनी यामाध्यमातून जवळपास दहा कोटी रुपये जमा केल्याचा अंदाज आहे. आरोपींनी एका शिक्षिकेला देखील चाळीस लाखांचा गंडा घातला होता. या प्रकरणात संबंधित शिक्षिकेने तक्रार दाखल केल्यानंतर या आरोपींना अटक करण्यात आली.
संबंधित बातम्या
CCTV | निवांतपणे चालत होता, अचानक सळी कोसळली, डोक्यात घुसली, पुढचं सगळंच सुन्न करणारं..
अंबरनाथमधील ‘त्या’ तरुणाच्या हत्येचे गूढ अखेर उलगडले; मित्रानेच केली मित्राची हत्या, आरोपीला अटक
Video | ‘दुसऱ्याच्या इज्जतीचा तुम्हाला काही फरक पडत नाय म्हणजे काय?’ भाजप आमदार भडकले!