अल्पवयीन मुले मौजमजेसाठी चोरायचे बाईक, ‘असे’ अडकले पोलिसांच्या जाळ्यात, सात गाड्या चोरल्याची कबुली

पिंपरी-चिंचवड शहरामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वाकड पोलिसांनी बाईक चोरी करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून तब्बल चार लाख चाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अल्पवयीन मुले मौजमजेसाठी चोरायचे बाईक, 'असे' अडकले पोलिसांच्या जाळ्यात, सात गाड्या चोरल्याची कबुली
Follow us
| Updated on: Feb 01, 2022 | 10:41 PM

पिंपरी चिंचवड : शहरामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वाकड पोलिसांनी (Wakad police) बाईक चोरी (Bike theftकरणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून तब्बल चार लाख चाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या दोघांनी आतापर्यंत सात दुचाकी चोरल्या असल्याचे पोलीस चौकशीतून समोर आले आहे. ही मुले मौजमजेसाठी दुचाकी चोरत होती. ते चोरलेल्या दुचाकी बाजारात विकत असत, मिळालेल्या पैशांमधून ते मौजमजा करत होते. दरम्यान वाकडसह शहरातील विविध भागांमध्ये दुचाकी चोरी होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. पोलीस या चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत होते. याचदरम्यान दोन अल्पवयीन मुले (Minors)   बाईक विकण्यासाठी काळेवाडी परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचला. बाईक विकण्यासाठी ही मुले काळेवाडी परिसरात येताच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणात अधिक चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून शहरातून दुचाकी चोरी होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. तशा तक्रारी प्राप्त होत होत्या. वाहनचोरी प्रकरणातील आरोपींचा शोध सुरू होता. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच दोन अल्पवयीन मुले ही दुचाकी विकण्यासाठी काळेवाडी परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून ही मुले काळेवाडी परिसरात आले असता त्यांना ताब्यात घेण्यात आले. घटनेचा अधिक तपास सुरू आहे.

4 लाख 40 हजारांचा मुद्देमाल जप्त

ताब्यात घेण्यात आलेल्या मुलांकडून तब्बल चार लाख चाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या मुलांनी आतापर्यंत सात दुचाकी चोरल्याची माहिती पोलीस चौकशीतून समोर आली आहे. ही मुले केवळ मौज मजेसाठी दुचाकी चोरायचे. चोरलेली दुचाकी विकून आलेल्या पैशांमधून मौज मजा करत होते असे देखील पोलिसांनी म्हलटे आहे.

संबंधित बातम्या

Twitter : ट्विटरला भारतातून गाशा गुंडाळावा लागणार; आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने घेतली कठोर भूमिका

Pimpri chinchawad crime | आता बोला ! पिंपरीत क्रिप्टोकरन्सी नादापायी पोलिस कर्मचाऱ्याने केलं तरुणाच अपहरण…

Hindusthani Bhau : हिंदुस्थानी भाऊच्या सुटकेसाठी मुलांना एकत्रित जमण्याचे आवाहन, ऑडिओ क्लिप व्हायरल

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.