बारबालांना लपवण्यासाठी तयखाना बनवला, लॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्या बारवर थेट बुलडोझर फिरवला

मीरा भाईंदर पालिका आणि शहर पोलिसांनी कडक लॉकडाऊनमध्ये चोरीछुपे लेडीज बार सुरु ठेवणाऱ्या बारवर चक्क बुलडोझर फिरवला आहे (Mira Bhayander Police strict action against ladies bar).

बारबालांना लपवण्यासाठी तयखाना बनवला, लॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्या बारवर थेट बुलडोझर फिरवला
मुली लपवण्यासाठी तयखाना, लॉकडाऊनमध्ये मध्यरात्री डान्सबार सुरु, पोलिसांनी बारवर थेट बुलडोझर फिरवला
Follow us
| Updated on: May 21, 2021 | 11:54 AM

मीरा भाईंदर (ठाणे) : राज्यासह देशभरात कोरोनाचा प्रचंड धुमाकूळ सुरु आहे. राज्यात कोरोनाचा संसर्ग कमी व्हावा यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या लॉकडाऊन काळात जीवनाश्यक वस्तूंचे दुकाने हे फक्त सकाळी 11 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आलीय. तर इतर सर्व दुकानं बंदी ठेवण्याचे आदेश देण्यात आला आहे. मात्र, राज्य सरकार आणि प्रशासनाच्या या आदेशांचं उल्लंघन करुन काही बारचालक अजूनही सर्सासपणे मद्यविक्री आणि डान्सबार सुरु ठेवत असल्याचं समोर आलं आहे. मात्र, अशाच एका डान्सबारवर मीरा भाईंदर महापालिका आणि पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी थेट बारवर बुलडोझर चालवला आहे. त्यामुळे नियमांचं उल्लंघन करणाऱ्या बारचालकाला आपल्या कृत्याची शिक्षाच मिळाली आहे (Mira Bhayander Police strict action against ladies bar).

नेमकं प्रकरण काय?

मीरा भाईंदर पालिका आणि शहर पोलिसांनी कडक लॉकडाऊनमध्ये चोरीछुपे लेडीज बार सुरु ठेवणाऱ्या बारवर चक्क बुलडोझर फिरवला आहे. सध्या राज्यभर कडक लॉकडाउन सुरु आहे. असं असताना काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मानसी बार हा रात्री चोरीछुपे सुरु ठेवला जात होता. या बारमध्ये मुली लपवण्यासाठी तळघरही तयार करण्यात आला होता. प्रशासन आणि पोलिसांनी याबाबतची गंभीर दखल घेत कारवाई केली (Mira Bhayander Police strict action against ladies bar).

मीरा भाईंदरमधील मानसी लेडीज बारवर कारवाई

गेल्या आठवड्यात काशिमीरा पोलिसांनी रात्री तीन वाजेच्या सुमारास मानसी लेडीज बारमध्ये धाड टाकून मोठी कारवाई केली होती. या कारवाईत 7 मुलींसह 2 तृतीयपंथीयांचे सुटका करण्यात आली. तर ग्राहक आणि स्टाफसहित 19 आरोपींना अटकही करण्यात आलं होतं. मानसी बार अनधिकृत असल्याने पोलिसांकडून पालिकेला मानसी बारवर तोडक कारवाई करण्याचे पत्र देण्यात आले होते. त्यावर आज मीरा भाईंदर पालिकेनं अनधिकृत बांधकाम पथकाच्या साहाय्याने मानसी लेडीज बार भुईसपाट करुन टाकलं. तसेच बारचालक श्याम रामदास कोरडे आणि रवी शेट्टी हे सध्या फरार आहेत. त्यांचाही पोलीस शोध घेत आहेत.

संबंधित कारवाई ही पोलीस आयुक्त सदानंद दाते, पोलीस उपायुक्त अमित काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त विलास सानप, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे आणि पालिकेचे आयुक्त दिलीप ढोले व उपायुक्त अजित मुठे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आळी. अतिक्रमण विभाग प्रमुख नरेंद्र चव्हाण, स्वप्नील सावंत प्रभाग अधिकारी, पालिकेच्या अतिक्रमण पोलीस पथकाचे माणिक पाटील, कनिष्ठ अभियंता योगेश भोईर व शुभम पाटील यांनी तोडक कारवाई केली.

हेही वाचा : हिप्नोटाईज करुन 50 हजार लंपास, अभिनेता योगेश सोहोनीला लुटणारा दोन दिवसात गजाआड

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.