घटस्फोटित पत्नीला मिठी मारुन बॉम्बने उडवलं, आत्मघाती हल्ल्यात नवऱ्याचाही मृत्यू

पु रोहिंग्लियाना याने आपल्या घटस्फोटित पत्नीला सिगारेट ओढण्याची विनंती केली. सिगारेट पेटवल्यानंतर पु रोहिंग्लियाना तापामुळे चक्कर आल्याचं भासवलं आणि अचानक पै ललथियांगहलिमी यांना मिठी मारली, त्यानंतर जोरदार धमाका झाला.

घटस्फोटित पत्नीला मिठी मारुन बॉम्बने उडवलं, आत्मघाती हल्ल्यात नवऱ्याचाही मृत्यू
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Oct 07, 2021 | 10:20 AM

आईजोल : मिझोरममध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मिझोरामच्या लुंगलेई जिल्ह्यात एका 62 वर्षीय व्यक्तीने आपल्या घटस्फोटित पत्नीची आत्मघाती बॉम्बस्फोटात हत्या केली. लुंगलेई जिल्हा उच्चाधिकार समिती (लुंगलेई जिल्हा नियोजन मंडळ) कार्यालयासमोर चनमारी वेंग परिसरात मंगळवारी ही घटना घडली.

काय आहे प्रकरण?

61 वर्षीय भाजी विक्रेती पै ललथियांगहलिमी त्याच्या 40 वर्षांच्या मुलीसह भाजी विकत होती, त्यांचा एक छोटा स्टॉलही होता. पै ललथियांगहलिमीच्या 40 वर्षांच्या मुलीच्या मते, 62 वर्षीय आरोपी पु रोहिंग्लियाना तिथे आला आणि आपल्या घटस्फोटित पत्नीच्या शेजारी बसला.

तापामुळे चक्कर आल्याचं भासवलं

पु रोहिंग्लियाना याने आपल्या घटस्फोटित पत्नीला सिगारेट ओढण्याची विनंती केली. सिगारेट पेटवल्यानंतर पु रोहिंग्लियाना तापामुळे चक्कर आल्याचं भासवलं आणि अचानक पै ललथियांगहलिमी यांना मिठी मारली, त्यानंतर जोरदार धमाका झाला.

दोघांचाही मृत्यू

61 वर्षीय पै ललथियांगहलिमी आणि पु रोहिंग्लियाना या दोघांनाही रुग्णालयात नेण्यात आले, तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. स्फोटात मृत महिलेच्या मुलीला कोणतीही इजा झाली नाही. लुंगलेई जिल्हा पोलिसांच्या अधिकाऱ्याने सांगितले की, स्फोटात जिलेटिनचा वापर करण्यात आल्याचा संशय आहे. आरोपीने जिलेटिन आपल्या कपड्यांच्या आत लपवल्याची शक्यता आहे.

पश्चिम बंगालमध्ये पतीकडून पत्नीची हत्या

दुसरीकडे, पश्चिम बंगालमधील एका जोडप्यामध्ये फेसबुक चॅटिंगवरुन झालेला वाद इतका वाढला, की पतीने आपल्या पत्नीचा जीव घेतला. पतीला संशय होता की पत्नी चॅटिंगद्वारे इतर पुरुषांशी मैत्री करत आहे. यामुळे त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला. अखेर वाद इतका विकोपाला गेला, की पतीने पत्नीचा गळा दाबून खून केला. ही खळबळजनक घटना पश्चिम बंगालमधील हुगली जिल्ह्यातील आहे.

नेमकं काय घडलं?

हुगळी जिल्ह्यातील चंदननगर पोलीस स्टेशन परिसरात पती रिंटू दासने पत्नी पल्लवी दासचा (23 वर्ष) गळा दाबून खून केला. याचं कारण म्हणजे पत्नी सतत फेसबुक चॅटिंगमध्ये बिझी असायची. आरोपी पती रिंटू दासला संशय होता, की त्याची पत्नी पल्लवी फेसबुक चॅटद्वारे इतर पुरुषांशी मैत्री करत आहे. यामुळे त्याला त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर शंका होती.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमॉर्टमसाठी श्रीरामपूर गिरवळ येथून रुग्णालयात पाठवला.

भाऊ संशयी, वहिनीला मारहाण

आरोपी रिंटू दासचा भाऊ सिंटू दास याने सांगितले की वहिनी चांगल्या स्वभावाची होती पण आपला भाऊ नेहमी तिच्यावर संशय घ्यायचा आणि नेहमी तिला मारहाण करायचा.

पोलीस तपास सुरु

आरोपीची आई माना दास यांनी सांगितले की तिची सून पल्लवी दासला फेसबुक चॅटिंगची आवड होती, त्यामुळे पती-पत्नीमध्ये नेहमी भांडणे होत असत. या हत्येविषयी माहिती देताना चंदननगर आयुक्तालयाचे डीसीपी मुख्यालय प्रवीण प्रकाश म्हणाले की, आरोपी पती रिंटू दासला पोलिसांनी भादंविच्या कलम 302 आणि 498 ए अंतर्गत अटक केली आहे. या प्रकरणी पुढील कारवाई केली जात आहे.

संबंधित बातम्या :

वहिनीची चाकूने भोसकून हत्या, दीराला अटक

दिरासोबत राहण्यासाठी आधी पतीची हत्या, आता वहिनीने त्याच दिराचाही जीव घेतला

वहिनीला ‘मधलं बोट’ दाखवलं, दीराला तीन वर्षांचा कारावास

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.