आईच्या प्रियकराचा मुलींवर अनेकदा बलात्कार, दुसरीकडे बाप मुलींना विकायला निघाला, गुंतागुंतीचं किळसवाणं कृत्य अखेर उघड
आई-वडील प्रत्येकासाठी किती महत्त्वाचे असतात हे शब्दांमध्ये सांगता येणं अवघड आहे. पण काही आई-वडील आपल्या पोटच्या मुलांचा खरंच विचार करत नाही हे काही घटनांमधून समोर येतं (Mother lover rape on two minor girls from last six years)
जयपूर : आई-वडील प्रत्येकासाठी किती महत्त्वाचे असतात हे शब्दांमध्ये सांगता येणं अवघड आहे. पण काही आई-वडील आपल्या पोटच्या मुलांचा खरंच विचार करत नाही हे काही घटनांमधून समोर येतं. राजस्थानच्या चितौडगढ येथे देखील असाच काहिसा प्रकार समोर आला आहे. संबंधित घटना ही प्रचंड गुंतागुंतीची आहे. एक महिला काही वर्षांपूर्वी आपल्या पतीपासून वेगळी होते. तिला त्यावेळी तीन मुली असतात. त्या मुलींसह ती प्रियकरासोबत राहू लागते. पण तो प्रियकर महिला कामावर गेली असताना तिच्या दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार करायचा, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी विरोधात पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे (Mother lover rape on two minor girls from last six years).
मुलींनी आईकडे तक्रार करुनही आईचं दुर्लक्ष
पीडित मुली या सध्या एका निवासी केंद्रात वास्तव्यास आहेत. त्याआधी त्या मुली आपल्या आईसोबत राहायच्या. मुलींचा वडील हा भीलवाडा येथे राहतो. तर महिला ही देखील त्याच शहरात आपल्या प्रियकरासोबत राहते. महिला ही आपल्या पतीपासून अनेक वर्षांपासून वेगळी झालीय. त्यानंतर ती आपल्या मुलींसह प्रियकरासोबत राहते. संबंधित महिला ही मजुरीचं काम करायची. ती जेव्हा कामावर जायची तेव्हा तिचा प्रियकर दोन मुलींवर सारखा लैंगिक अत्याचार करायचा. मुलींनी याबाबत आपल्या आईकडेही तक्रार केली. मात्र, तिने याकडे दुर्लक्ष केलं. आरोपीने मुलींवर जवळपास सहा वर्ष बलात्कार केला (Mother lover rape on two minor girls from last six years).
मुलींची वडिलांकडे तक्रार, नराधम बाप मुलींना विकायला निघाला
अखेर याबाबत मुलींनी आपल्या वडिलांकडे तक्रार केली. त्यानंतर त्यांचा वडील त्यांना भीलवाडा येथे घेऊन गेला. मात्र, त्यांचा बापही विकृत निघाला. त्याने दोघी मुलींना प्रत्येकी 60 रुपयात विकण्याचा निर्णय घेतला. याबाबत मुलींना माहिती मिळाली तेव्हा त्या पुन्हा आपल्या आईजवळ आल्या. त्यानंतर अखेर त्यांच्या आईने मुलींना त्यांच्या शिक्षणासाठी आणि काळजीसाठी एका निवास केंद्रात पाठवलं. या निवास केंद्रात आल्यानंतर बाल कल्याण समितीच्या समुपदेशनानंतर संबंधित सर्व प्रकार उघड झाला आहे.
आरोपी विरोधात गुन्हा दाखल
बाल कल्याण समितीद्वारे निवारा केंद्रात वास्तव्यास असलेल्या मुलींचं समुपदेशन केलं जात होतं. मात्र, या समुपदेशादरम्यान त्या मोकळेपणाने बोलत नव्हत्या. अखेर वारंवार समुपदेशन केल्यानंतर मुलींनी आपली सर्व कहाणी सांगितली. या प्रकरणी बाल कल्याण समितीने पोलिसात तक्रार केली. पण पोलिसांनी घटनेला तातडीने गांभीर्याने घेतलं नाही, असा आरोप करण्यात आला आहे. तक्रारीनंतर पोलिसांनी आठ दिवसांनी मुलींचा जबाब नोंद केला. यावेळी त्यांच्या मोठ्या बहिणीने सर्व प्रकार सांगितला. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी विरोधात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. मात्र, अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नाही.
हेही वाचा :
तृतीयपंथीयाकडे लैंगिक संबंधांची मागणी, मुंबईत तरुणाची हत्या, आरोपी एकाच कुटुंबातील चौघे
सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात 35 वी अटक, डॅशिंग अधिकारी समीर वानखेडेंवर कौतुकाचा वर्षाव