12 वर्षांच्या अक्षला बाबा सायकल चालवायला घेऊन गेले, ट्रकनं चिरडलं! बापासमोरच पोरानं जीव सोडला

Mumbai JVLR Accident : अक्ष हा मालू यांचं सगळ्यात मोठा मुलगा होता. वडिलांच्या देखतच काही मीटरच्या अंतरावर हा भीषण अपघात झाला. दर रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी मधुरेंद्र आपल्या मुलाला सायकल चालवण्यासाठी घेऊन जात असत.

12 वर्षांच्या अक्षला बाबा सायकल चालवायला घेऊन गेले, ट्रकनं चिरडलं! बापासमोरच पोरानं जीव सोडला
अक्षनं वडिलांच्या देखतच जीव सोडला!
Follow us
| Updated on: Feb 08, 2022 | 11:10 AM

मुंबई : एका बारा वर्षांच्या मुलाचा जोगेश्वरी विक्रोळी लिंक (JVRL) रोडवर झालेल्या अपघातात दुर्दैवी अंत झाला आहे. एका भरधाव ट्रकनं या मुलाला चिरडलं आहे. रविवारी ही दुर्दैवी घटना घडली. टाईम्स ऑफ इंडियानं याबाबतचं वृत्त दिलंय. धक्कादायक बाब (Shocking incident of accident) म्हणजे ही काळीज पिळवटून टाकणारी घटना या मुलाच्या वडिलांच्या देखतच घडली आहे. आठवीत शिकणाऱ्या या दुर्दैवी मुलांच्या बापाच्या डोळ्यांदेखतच ही काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली. 12 वर्षांचा अक्ष मालू या आठवीत शिकणाऱ्या अक्ष मालू या विद्यार्थ्यानं रविवारी सायकल चालवण्यासाठी (Accident while cycle riding) आपल्या वडिलांसोबत घराबाहेर निघाला होती. जेव्हीएलआर वर असताना एक भरधाव ट्रकनं अक्ष याला मागून जोरदार धडक दिली. या धडकेनंतर भरधाव ट्रकचालक फरार झाला. या अपघातप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्थानकात तक्रारदेखील दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संशयित आरोपी असलेल्या ट्रक चालकालाही बेड्या ठोकल्या आहेत.

वडिलांसमोरच पोरानं जीव सोडला!

अक्ष वडिलांसोबत रविवारी पहाटेच सायकल चालवण्यासाठी निघाला होता. यावेळी अक्षसोबत इतकही सायकलस्वार त्यांच्यासोबत होते. दरम्यान, पवईजवळ असताना एका भरधाव ट्रक चालकानं अक्षला जोरदार धडक दिली आणि तो घटनास्थळाहून पळाला. पहाटे 5 वाजून 10 मिनिटांची ही धक्कादायक घडना घडली. अक्षचे वडील मधुरेंद्र मालू यांनी याबाबतची हकीकत सांगितली आहे. मधुरेंद्र मालू हे 42 वर्षांचे असून मुलाच्या अपघाती मृत्यूनं त्यांचं अख्ख कुटुंब हादरून गेलंय. मधुरेंद्र हे एका कार तयार करणाऱ्या एका खासगी कंपनीत जनरल मॅनेजर म्हणून काम करतात. दरम्यान, आज या भीषण अपघात प्रकरणातील आरोपी प्रेमलाल वर्मा याला कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे.

36 तासांच्या आत पकडलं

मजास डेपोजवळ असणाऱ्या ओबेरॉय स्पेंडर इथं परतत होते. अक्ष हा त्याचे मित्र आलोक आणि मितेशसह घरी परतत होता. तेव्हा पवईजवळ ट्रकनं त्याला मागून धडक दिली, असं अक्ष याच्या वडिलांनी म्हटलंय. 36 तासांच्या आत पोलिसांनी फरार ट्रक चालकाला ताब्यात घेत त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

थरारक घटना!

अक्ष हा मालू यांचं सगळ्यात मोठा मुलगा होता. वडिलांच्या देखतच काही मीटरच्या अंतरावर हा भीषण अपघात झाला. दर रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी मधुरेंद्र आपल्या मुलाला सायकल चालवण्यासाठी घेऊन जात असत. नेहमीप्रमाणेच ते याही रविवारी आपल्या मुलाला घेऊन सायकल चालवायला गेले खरे. पण त्या दिवशी पहाटे जे घडलं, त्यानं संपूर्ण मालू कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय.

ट्रकनं धडक दिल्यानंतर बारा वर्षांचा अक्षहा रस्त्यावर डिव्हायडरच्या दिशेनं फेकला गेला. यात त्याच्या सायकलचा तर चक्काचूर झाला होता. तर त्यांच्या डोक्याला जबर मार लागला होता. त्याला तातडीनं रुग्णालयातही नेण्यात आलं. पण तिथं डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलंय. याप्रकरणी आता कलम 304अ अन्वये भरधाव वेगानं ट्रक चालवणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

एक दिवसाच्या बाळासह काकू कोवळ्या उन्हात बसली, मिनिटभर दुसऱ्या बाईकडे सोपवलं, आणि…

बाळाला दूध पाजत असतानाच भरधाव कारने चिरडलं, मुंबईत कुठे घडलं पुन्हा हिट एन्ड रन?

दहा रुपयांच्या सिगारेटवरुन वाद, टोळक्याचा दुकानावर हल्ला, दुकानदाराच्या वडिलांची हत्या

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.