Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे, मुंबई पाठोपाठ उल्हासनगर हादरलं, रेल्वे स्थानकाजवळ अल्पवयीन मुलीवर बलात्कार, महाराष्ट्रात नेमकं काय चाललंय?

मुंबई, पुणे, अमरावती पाठोपाठ आता ठाणे जिल्हा देखील बलात्काराच्या घटनेने हादरला आहे. ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर शहरात संतापजनक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे.

पुणे, मुंबई पाठोपाठ उल्हासनगर हादरलं, रेल्वे स्थानकाजवळ अल्पवयीन मुलीवर बलात्कार, महाराष्ट्रात नेमकं काय चाललंय?
पुणे, मुंबई पाठोपाठ उल्हासनगरात भीषण घटना, रेल्वे स्थानक परिसरात अल्पवयीन मुलीवर बलात्कार
Follow us
| Updated on: Sep 11, 2021 | 11:03 PM

उल्हासनगर (ठाणे) : मुंबई, पुणे, अमरावती पाठोपाठ आता ठाणे जिल्हा देखील बलात्काराच्या घटनेने हादरला आहे. ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर शहरात संतापजनक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे रेल्वे स्थानक परिसरात हा सगळा प्रकार घडला आहे. उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसरात एका नराधमाने 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी आरोपी दादा उर्फ श्रीकांत गायकवाड याला अटक केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

मुंबई पाठोपाठ उल्हासनगरमध्येही धक्कादायक प्रकार घडला आहे. उल्हासनगर स्थानकास लागून असलेल्या स्कायवॉकवर 14 वर्षाची मुलगी उभी असताना एक तरुण तिच्या जवळ आला. तो तिला जबरदस्ती एका निर्जन स्थळी घेऊन गेला. त्या ठिकाणी मुलीला बेदम मारहाण केली. नंतर तिच्यावर बलात्कार केला. बलात्कार केल्यानंतर आरोपी मुलीला घटनास्थळी सोडून पळून गेला.

रेल्वे पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या

संबंधित घटनेची माहिती मिळताच कल्याण जीआरपीचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक वाल्मीक शादरुल यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु झाला. पोलिसांनी या प्रकरणी नराधम आरोपी दादा उर्फ श्रीकांत गायकवाड याला अटक केली आहे. त्याने गुन्हा कबूल केला आहे. तसेच या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

पिंपरीत शिक्षिकेवर बलात्कार

दुसरीकडे पिंपरीत निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त असल्याचे सांगत एका नराधमाने शिक्षिकेवर बलात्कार केला. संबंधित शिक्षिकेला पैशाची आर्थिक अडचण असल्याने त्यांनी ओळखीने आरोपी विकास अवस्थी यांच्याकडे पैशाची मागणी केली. आरोपी विकास अवस्थीने दहा टक्के व्याजाने पैसे देतो असे सांगून पीडित महिलेला घरी बोलावून त्यांच्याकडून दोन कोऱ्या चेकवर ,कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या. त्यानंतर पीडित महिलेला सॉफ्टड्रिंक देऊन दुष्कृत्य केले. तसेच पीडित महिलेचे विवस्त्र अवस्थेतील फोटो काढून, ते सर्वांना दाखवून बदनामी करेल अशी धमकी दिल्याचा आरोप आहे.

पुणे शहरात सहा वर्षीय चिमुकलीवर बलात्कार

पुण्यात आठ दिवसांपूर्वी एका 13 वर्षाच्या चिमुकलीवर सामूहिक बलात्काराची घटना ताजी असताना आज पुन्हा एकदा अशीच एक घटना समोर आली आहे. रेल्वे स्टेशन परिसरात झोपलेल्या अवघ्या सहा वर्षाच्या चिमुकलीवर एका नराधमाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आलेली आहे. विशेष म्हणजे या घटनेतही अत्याचार करणारा हा एक रिक्षाचालक असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. तर पीडित तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पीडितेला फुटपाथवरुन उचलून नेत अपहरण

पीडित सहा वर्षीय चिमुकली ही रात्रीच्या वेळी फुटपाथवर झोपली होती. आरोपीने तिला फुटपाथवरुन उचलून नेत तिचं अपहरण केलं होतं. त्यानंतर आरोपीने चिमुकलीवर बलात्कार केला. या संतापजनक प्रकाराची माहिती पीडितेच्या आई-वडिलांना मिळाल्यानंतर त्यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार केली. तसेच पीडितेला त्रास होत असल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पीडितेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

संबंधित व्हिडीओ  :

हेही वाचा :

वर्षभर सामूहिक बलात्कार, पीडितेच्या घरात शिरुन कुटुंबियांनाही मारहाण, पुण्यातल्या नण्या वाघमारे गँगचं भयानक कृत्य

तरुणीसोबत आधी दोस्ती केली, नंतर नोकरीचं आमिष, कारमध्येच सामूहिक बलात्कार, पीडितेला हायवेवर फेकून दिलं

जळगावात दोन गटात तूफान राडा
जळगावात दोन गटात तूफान राडा.
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख.
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला.
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया.
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय...
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय....
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?.
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली...
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली....
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी.
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'.
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन.