व्यावसायिकाला लोकलमधील चुंबन महागात पडले; कोर्टाने दिली सक्तमजुरीची शिक्षा

महिलांमध्ये गैरमौखिक इशारे समजण्याची जन्मजात क्षमता असते. ती अगदी लहान तपशीलसुद्धा पटकन वाचते. त्यामुळे महिलेने अनावधानाने घडलेल्या चुकीविरोधात तक्रार केली, असे म्हणता येणार नसल्याचे मत न्यायालयाने निकाल देताना व्यक्त केले.

व्यावसायिकाला लोकलमधील चुंबन महागात पडले; कोर्टाने दिली सक्तमजुरीची शिक्षा
महिला पोलीस कॉन्स्टेबलला थप्पड मारणारी महिला निर्दोषमुक्तImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Apr 04, 2022 | 12:30 AM

मुंबई : हार्बर लाईनवरील लोकल प्रवासात महिलेचा किस घेणे एका व्यावसायिकाला चांगलेच महागात पडले आहे. प्रवासात तोल जाऊन चुकून किस (Kiss) घेण्याचा प्रसंग घडल्याचा दावा करणार्‍या व्यावसायिकाला महानगर न्यायदंडाधिकार्‍यांनी एक वर्षाच्या सश्रम कारावासा (Imprisonment)सह 10 हजारांचा दंडही ठोठावला. 2015 मध्ये घडलेल्या घटनेत न्यायदंडाधिकारी व्ही. पी. केदार यांनी 37 वर्षीय आरोपी व्यावसायिक किरण होनावर याला दोषी ठरवले. हार्बर मार्गावरील लोकलच्या जनरल डब्यात त्याने महिलेचे चुंबन घेतले होते. त्याने हा आरोप फेटाळून लावला होता. लोकलमधून प्रवास करताना महिलेला धक्का लागला आणि तोल जाऊन चुकून महिलेच्या गालाला माझ्या ओठाचा स्पर्श झाला, असा युक्तीवाद आरोपी किरण होनावारतर्फे करण्यात आला होता. (A businessman has been sentenced to one year imprisonment for kissing a woman on a local train)

मात्र तक्रारदार महिलेने आरोपी तिच्यासमोरील सीटवर बसला होता व सातत्याने तिच्याकडे पाहत होता, असे म्हणणे तक्रारीतून मांडले होते. त्याची दखल घेत न्यायालयाने आरोपीला दिलासा देण्यास स्पष्ट नकार दिला. पुरुषांच्या तुलनेत महिलांना समोरच्या व्यक्तीचा हेतू चटकन लक्षात येतो. याला सामान्यतः महिलांचे अंतर्ज्ञान म्हटले जाते. महिलांमध्ये गैरमौखिक इशारे समजण्याची जन्मजात क्षमता असते. ती अगदी लहान तपशीलसुद्धा पटकन वाचते. त्यामुळे महिलेने अनावधानाने घडलेल्या चुकीविरोधात तक्रार केली, असे म्हणता येणार नसल्याचे मत न्यायालयाने निकाल देताना व्यक्त केले.

पीडित महिलेला 5 हजारांची भरपाई

या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार बनलेला महिलेचा मित्र तसेच पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले. या गुन्ह्यात कमाल पाच वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. मात्र आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्यामुळे न्यायालयाने त्याला एक वर्षाची सक्तमजुरी व 10 हजारांचा दंड ठोठावला. यातील 5 हजारांची रक्कम पीडित महिलेला भरपाई म्हणून दिली जाणार आहे. (A businessman has been sentenced to one year imprisonment for kissing a woman on a local train)

इतर बातम्या

Hyderabad Drug Raid : मुलगी निहारिका कोनिडेलाला पबमध्ये ताब्यात घेतल्यानंतर नागा बाबूची प्रतिक्रिया

Nalasopara Crime : पाकिट चोरल्याच्या संशयातून नालासोपाऱ्यात भर रस्त्यात जमावाकडून महिलेला मारहाण

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.