Kurla Balcony Collapsed : कुर्ल्यात शॉपिंग सेंटरचा छज्जा कोसळून पाच वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू

सदर इमारत म्हाडाची असून, शॉपिग सेंटरच्या पहिल्या माळ्याच्या छज्जाचा भाग तळमजल्यावर असलेल्या उपहार गृहावर पडला. यात चार जण जखमी झाले. जखमींपैकी एकाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. अफान खान (5) असे मयत बालकाचे नाव आहे.

Kurla Balcony Collapsed : कुर्ल्यात शॉपिंग सेंटरचा छज्जा कोसळून पाच वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू
कुर्ल्यात शॉपिंग सेंटरचा छज्जा कोसळून पाच वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू
Follow us
| Updated on: Feb 28, 2022 | 5:39 PM

मुंबई : मुंबईतील अपघाताच्या घटना थांबण्याचे नावच घेत नाहीत. कांजुरमार्ग येथे इमारतीला आग लागल्याची घटना ताजी असतानाच कुर्ला येथे शॉपिंग सेंटर (Shopping Center)च्या छताचा छज्जा कोसळून एका 5 वर्षाच्या बालका (Child)चा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी (Injured) आहेत. जखमींवर घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी विनोबा भावे पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. कुर्ला पश्चिमेतील राम मनोहर लोहीया मार्ग येथे दुपारी 2.40 वाजण्याच्या सुमारास सदर अपघात घडला. अग्नीशमन दल आणि पोलिसांकडून बचाव कार्य सुरु आहे. (A five-year-old boy has died after the balcony of a shopping center balcony collapsed in Kurla)

अपघातात 5 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

सदर इमारत म्हाडाची असून, शॉपिग सेंटरच्या पहिल्या माळ्याच्या छज्जाचा भाग तळमजल्यावर असलेल्या उपहार गृहावर पडला. यात चार जण जखमी झाले. जखमींपैकी एकाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. अफान खान (5) असे मयत बालकाचे नाव आहे. तर रफीक शेख (46), इरफान खान (33), मोहम्मद जिकरान (6) अशी जखमींची नावे आहेत. यापैकी रफीक शेख आणि इरफान खान यांच्यावर राजावाडी रुग्णालयात तर मोहम्मद जिकरान याच्यावर कुर्ल्यातील भाभा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

कांजुरमार्ग येथे निवासी इमारतीला भीषण आग

कांजुरमार्ग येथील एनजी रॉयल अपार्टमेंट या इमारतीच्या नवव्या आणि दहाव्या मजल्याला भीषण आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती कळते. सुदैवाने यात अद्याप कोणत्याही जीवितहानीचे वृत्त नाही. दुपारी 1.42 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. अग्निशामक दलाच्या 14 गाडी घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. (A five-year-old boy has died after the balcony of a shopping center balcony collapsed in Kurla)

इतर बातम्या

Solapur Kidnapping : पळून जाऊन लग्न केल्याने तरुणाचे अपहरण, टेभुर्णी पोलिसांकडून तरुणांची सुटका, 8 जण ताब्यात

AP Youth Death : युट्युब पाहून दोन विद्यार्थ्यांनी केला लिंगबदलाच्या शस्त्रक्रियेचा प्रयत्न; तरुणाचा दुदैवी मृत्यू

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.