प्रेमासाठी वाट्टेल ते…, आवडलेली मुलगी आपलीच व्हावी म्हणून जिवलग मित्राचा मित्रावर जीवघेणा हल्ला

जयेश आणि आयुषचे आपल्या महाविद्यालयात शिकणाऱ्या एका मुलीवर प्रेम जडले. याच प्रेमाच्या त्रिकोणातून आपली आवडती मुलगी कायमची आपली व्हावी यासाठी दोघांची धडपड सुरु होती.

प्रेमासाठी वाट्टेल ते..., आवडलेली मुलगी आपलीच व्हावी म्हणून जिवलग मित्राचा मित्रावर जीवघेणा हल्ला
तब्बल 12 वर्षांनंतर पत्नी जिवंत सापडलीImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jan 09, 2023 | 2:09 PM

मुंबई : प्रेमप्रकरणातून मुंबईत एक भयानक घटना उघडकीस आली आहे. प्रेमप्रकरणातून जिवलग मित्रानेच मित्रावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक मुंबईतील मालाड पोलीस ठाणे अंतर्गत गोरेगाव परिसरात घडली आहे. या हल्ल्यात 20 वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला आहे. जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जयेश सावंत असे जखमी विद्यार्थ्याचे नाव आहे. याप्रकरणी मालाड पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे. आयुष खेडकर असे अटक करण्यात आलेल्या 20 वर्षीय तरुणाचे नाव आहे.

दोघा मित्रांचे एकाच मुलीवर होते प्रेम

मुंबई उपनगरातील गोरेगाव परिसरातील पाटकर महाविद्यालयात ही धक्कादाक घटना घडली आहे. जयेश सावंत आणि आयुष खेडकर हे दोघे जीवलग मित्र होते. दोघेही एकाच वेळी एकाच तरुणीच्या प्रेमात पडले आणि नेमके याच कारणातून दोघांच्या जीवलग मैत्रीचा करुण अंत झाला.

जयेश आणि आयुषचे आपल्या महाविद्यालयात शिकणाऱ्या एका मुलीवर प्रेम जडले. याच प्रेमाच्या त्रिकोणातून आपली आवडती मुलगी कायमची आपली व्हावी यासाठी दोघांची धडपड सुरु होती.

हे सुद्धा वाचा

प्रेमातील अडथळा दूर करण्यासाठी मित्राचा मित्रावर हल्ला

याच कारणातून जयेशला आपल्या प्रेमाच्या मार्गातून दूर करण्यासाठी आयुषने कोयत्याने त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात जयेश गंभीर जखमी झाला आहे. जखमी अवस्थेत जयेशला नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

मालाड पोलिसांकडून आरोपीला अटक

घटनेची माहिती मिळताच मालाड पोलिसांनी तात्काळ कारवाई करत हल्ला करणाऱ्या आयुष खेडकरला अटक केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.