Mumbai Crime : महिलेच्या नावे फेसबुकवर अकाऊंट उघडून ब्लॅकमेल, आरोपीला पोलिसांकडून अटक
आरोपीने शर्मा यांना मॅसेज आणि फोटो शेअर न करण्यासाठी 10 हजार रुपयांची मागणी केली. पोलीस आरोपीची कसून चौकशी करत असून, आरोपीने आतापर्यंत किती लोकांची फसवणूक केली आहे, याचाही तपास करत आहेत.
मुंबई : महिलेच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट (Fake Facebook Account) तयार करून लोकांना ब्लॅकमेल (Blackmail) करणाऱ्या आरोपीला कस्तुरबा मार्ग पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. बोरिवली पूर्व राजेंद्र नगर डिस्कव्हरी कंपनी आप हाऊसिंग सोसायटी बिल्डिंगमध्ये राहणारे मुकेश प्रकाश शर्मा यांनी कस्तुरबा मार्ग पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. सुशांत विजय तळसिरकर (19) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने शर्मा यांना मॅसेज आणि फोटो शेअर न करण्यासाठी 10 हजार रुपयांची मागणी केली. पोलीस आरोपीची कसून चौकशी करत असून, आरोपीने आतापर्यंत किती लोकांची फसवणूक केली आहे, याचाही तपास करत आहेत.
आधी रोमँटिक चॅट केले, मग अश्लील मॅसेज पाठवून ब्लॅकमेल
आरोपीने कलावती पाटील नावाने फेसबुकवर फेक अकाऊंट बनवले होते. या अकाऊंटवरुन त्याने मुकेश शर्मा यांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. त्यानंतर शर्मा यांनी रिक्वेस्ट स्वीकरली. शर्मा यांना 6 जुलैला मेसेज येऊ लागले. दोघांमध्ये काही दिवस रोमँटिक चॅटिंग सुरू होते. त्यानंतर अश्लील आणि रोमँटिक पिक्चर्स येऊ लागले. मग काही दिवसांनी शर्मा यांना धमकी मिळाली की, 10 हजार रुपये द्या. नाहीतर मी तुमच्या मॅसेजचा आणि फोटोचा स्क्रीनशॉट काढून तुमच्या सोसायटी आणि तुमच्या कुटुंबाला पाठवेन. त्यानंतर शर्मा यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस आणि फिर्यादी यांनी मिळून एक प्लॅन केला. त्यानुसार शर्मा यांनी आरोपीला पैसे देण्याची तयारी दर्शवली आणि पैसे देण्याचे ठिकाण ठरवले. आरोपीने त्याच सोसायटीच्या पार्किंगमध्ये एका कारचा नंबर सांगितला आणि पैसे टायरखाली ठेवण्यास सांगितले. पोलीस आधीच सोसायटीत सापळा लावून बसले होते. ठरल्याप्रमाणे आरोपी सांगितलेल्या ठिकाणी ठेवलेले पैसे घेण्यासाठी आला असता पोलिसांनी त्याला पकडले. (A youth was arrested for blackmailing through a fake Facebook account)