Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकावरील गोळीबाराचा थरारक व्हिडीओ समोर

दहीसरमध्ये माजी नगरसेवकाच्या गोळीबाराचा भयानक थरार समोर आला आहे. ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. मॉरिसभाई नावाच्या व्यक्तीने हा गोळीबार केला आहे.

VIDEO | ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकावरील गोळीबाराचा थरारक व्हिडीओ समोर
ठाकरे गटाचे दहिसरचे माजी नगरसेवक Abhishekh Ghosalkar यांच्यावर गोळीबार, Exclusive Video tv9 वर..
ठाकरे गटाचे दहिसरचे माजी नगरसेवक Abhishekh Ghosalkar यांच्यावर गोळीबार, Exclusive Video tv9 वर..
0 seconds of 6 minutes, 13 secondsVolume 0%
Press shift question mark to access a list of keyboard shortcuts
00:00
06:13
06:13
 
Follow us
| Updated on: Feb 09, 2024 | 1:35 AM

मुंबई | 8 फेब्रुवारी 2024 : दहीसरमध्ये माजी नगरसेवकाच्या गोळीबाराचा भयानक थरार समोर आला आहे. ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. मॉरिसभाई नावाच्या व्यक्तीने हा गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे या गोळीबाराचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. गोळीबाराची घटना जसीच्या तशी कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या व्हिडीओत अभिषेक घोसाळकर हे बोलत आहेत. त्यांचं बोलणं पूर्ण झाल्यानंतर ते जागेवरुन उठतात. याचवेळी त्यांच्यावर बेछूट गोळीबार करण्यात आलाय. आता या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. विशेष म्हणजे हा मॉरीस भाई आणि अभिषेक घोसाळकर फेसबुक लाईव्ह करतात. त्यानंतर घोसाळकर आपलं बोलणं पूर्ण केल्यानंतर अचानक ते जागेवरुन उठल्यावर त्यांच्यावर गोळीबार केला जातो. या घटनेमुळे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या मॉरिसभाईने घोसाळकर यांना गोळ्या झाडल्यानंतर स्वत:ला गोळ्या झाडल्या. पैशांच्या वादातून ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.

मॉरीस भाई आणि अभिषेक बाजूबाजूलाच

या व्हिडिओत त्यांच्याबाजूला मॉरीस भाई बसला होता. यावेळी मॉरीस भाई बोलताना दिसत आहे. “अनेक लोकांना आश्चर्य वाटेल. जी गोष्ट युनिटीसाठी होते. आयसी कॉलनीच्यासाठी होत आहे. आपण एकत्र आलो पाहिजे. चांगलं काम केलं पाहिजे. आज आम्ही ठरवलंय की साडी वाटायची, राशन वाटायचं, अभिषेकभाई आणि आम्ही नाशिक ट्रिपच्या बसेस करायचं ठरवलं आहे”, असं मॉरीसभाई म्हणतो.

अभिषेक काय म्हणाले?

त्यानंतर अभिषेक घोसाळकर बोलताना दिसत आहेत. आता कसं आहे की, आताच आपण सांगितलं की आपण एकत्र येणार आहोत. त्यामुळे चांगला दृष्टीकोण ठेवून आणि एकत्रित रित्या राहून एक चांगलं काम करायचं आहे. ( मॉरीस भाई उठून जातो) मला वाटतं आपण चांगल्या कारणाने पुढे गेलं पाहिजे. लोकांचं भलं पाहिलं पाहिजे. लोकांचा फायदा कोणत्या गोष्टीत आहे हे आपण पाहिलं पाहिजे. मला वाटतं आज एक चांगला निर्णय मॉरीस भाईने घेतला आहे. आज साडी, फळ आणि धान्य वाटण्याचं काम करण्यात येणार आहे, असं अभिषेक घोसाळकर म्हणतात. तेवढ्यात मॉरीस भाई येतो. आणि आम्ही दोघं हे एकत्रितपणे करणार असल्याचं म्हणतो. त्यावर अभिषेक स्मित हास्य करताना दिसत आहेत. त्यानंतर अभिषेक घोसाळकर उभं राहायला उठतात. तेव्हा अचानक…

अन् गोळ्या घातल्या…

अभिषेक घोसाळकर उठत असताना त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आणि आनंद दिसतो. मोबाइलकडे पाहत असतानाच त्यांना अत्यंत जवळून चार गोळ्या मारण्यात आल्या. त्यांच्या पोटावर गोळ्या लागल्या. गोळी लागताच त्यांनी पोटाला हात लावला आणि मोबाइल खुर्चीवर ठेवून त्यांनी पळण्याचा प्रयत्न केला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मन विचलित करणारा हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला असून एकच खळबळ उडाली आहे.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.