Dahisar Firing Video | अभिषेक घोसाळकर आणि मॉरिसभाई दोघांचा मृत्यू, सूत्रांची माहिती

दहीसरमधील गोळीबाराच्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. दहीसरमधील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या घटनेत अभिषेक घोसाळकर आणि गोळ्या झाडणारा आरोपी मॉरिसभाई दोघांचा मृत्यू झालाय.

Dahisar Firing Video | अभिषेक घोसाळकर आणि मॉरिसभाई दोघांचा मृत्यू, सूत्रांची माहिती
abhishek ghosalkar
Follow us
| Updated on: Feb 08, 2024 | 9:51 PM

मुंबई | 8 फेब्रुवारी 2024 :  दहीसरमधील गोळीबाराच्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. दहीसरमधील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला. त्यांच्यावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या. त्यांना तातडीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण या गोळीबारात अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडणारा आरोपी मॉरिस भाई याने स्वत:ला देखील गोळ्या झाडल्या. त्याने स्वत:वर चार गोळ्या झाडून घेतल्या. त्यामुळे त्याचाही मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे आरोपी मॉरिस भाईने आधी त्याच्या अधिकृत फेसबुक अकाउंटवर फेसबुक लाईव्ह केलं. त्यांनी समाजासाठी आम्ही एकत्र आल्याचं म्हटलं. त्यानंतर अभिषेक घोसाळकर आपली भूमिका मांडतात. त्यानंतर घोसाळकर यांचं बोलणं संपल्यानंतर ते जागेवरुन उठतात आणि त्यांच्यावर अतिशय जवळून गोळीबार केला जातो.

कोण आहेत अभिषेक घोसाळकर?

माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे अभिषेक घोसाळकर हे चिरंजीव आहेत. वडिलांप्रमाणेच अभिषेक घोसाळकर यांनी सुरुवातीला समाजकार्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी महापालिकेची निवडणूक लढवली. अभिषेक घोसाळकर हे दोनदा मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. दहिसरमधील तरुण आणि तडफदार नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. अभ्यासू आणि तळमळीने काम करणारा नगरसेवक म्हणून त्यांची प्रतिमा आहे. घोसाळकर हे दहिसर कांदरपाडा वॉर्ड नंबर 7 चे नगरसेवक होते. सध्या हा वॉर्ड शितल म्हात्रे यांच्याकडे आहे. सध्या घोसाळकर यांची पत्नी वॉर्ड नंबर 1 ची नगरसेविका होती.

गोळ्या झाडणारा मॉरिसभाई कोण आहे??

गुंड मॉरिस हा बोरिवली पश्चिमेच्या आयसी कॉलनीत राहत असल्याचं सांगितलं जातं. समाजसेवक मॉरिस नरोना ऊर्फ मॉरिस भाई म्हणून तो प्रसिद्ध आहे. त्याच्यावर बलात्कार, खंडणी आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. एका महिलेची 88 लाखाची फसवणूक केली आणि तिच्यावर बलात्कार केल्याचा त्याच्या आरोप असल्याचं सांगितलं जातं. या महिलेला त्याने धमकीही दिली होती. धमकीचा कथित व्हिडीओही व्हायरल झाला होता. एवढेच नव्हे तर कोर्टात जात असताना त्याने पत्रकारांनाही धमकावल्याचं सांगितलं जात आहे. तसेच मॉरिसभाईने वॉर्ड नंबर 1 मधून महापालिकेची निवडणूक लढवल्याचं सांगितलं जातं.

फेसबुक लाईव्हत मॉरीस भाई आणि अभिषेक बाजूबाजूलाच

या व्हिडिओत त्यांच्याबाजूला मॉरीस भाई बसला होता. यावेळी मॉरीस भाई बोलताना दिसत आहे. अनेक लोकांना आश्चर्य वाटेल. जी गोष्ट युनिटीसाठी होते. आयसी कॉलनीच्यासाठी होत आहे. आपण एकत्र आलो पाहिजे. चांगलं काम केलं पाहिजे. आज आम्ही ठरवलंय की साडी वाटायची, राशन वाटायचं, अभिषेकभाई आणि आम्ही नाशिक ट्रिपच्या बसेस करायचं ठरवलं आहे, असं मॉरीसभाई म्हणतो.

अभिषेक काय म्हणाले?

त्यानंतर अभिषेक घोसाळकर बोलताना दिसत आहेत. आता कसं आहे की, आताच आपण सांगितलं की आपण एकत्र येणार आहोत. त्यामुळे चांगला दृष्टीकोण ठेवून आणि एकत्रित रित्या राहून एक चांगलं काम करायचं आहे. ( मॉरीस भाई उठून जातो) मला वाटतं आपण चांगल्या कारणाने पुढे गेलं पाहिजे. लोकांचं भलं पाहिलं पाहिजे. लोकांचा फायदा कोणत्या गोष्टीत आहे हे आपण पाहिलं पाहिजे. मला वाटतं आज एक चांगला निर्णय मॉरीस भाईने घेतला आहे. आज साडी, फळ आणि धान्य वाटण्याचं काम करण्यात येणार आहे, असं अभिषेक घोसाळकर म्हणतात. तेवढ्यात मॉरीस भाई येतो. आणि आम्ही दोघं हे एकत्रितपणे करणार असल्याचं म्हणतो. त्यावर अभिषेक स्मित हास्य करताना दिसत आहेत. त्यानंतर अभिषेक घोसाळकर उभं राहायला उठतात. तेव्हा अचानक…

अन् गोळ्या घातल्या…

अभिषेक घोसाळकर उठत असताना त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आणि आनंद दिसतो. मोबाइलकडे पाहत असतानाच त्यांना अत्यंत जवळून चार गोळ्या मारण्यात आल्या. त्यांच्या पोटावर गोळ्या लागल्या. गोळी लागताच त्यांनी पोटाला हात लावला आणि मोबाइल खुर्चीवर ठेवून त्यांनी पळण्याचा प्रयत्न केला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मन विचलित करणारा हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला असून एकच खळबळ उडाली आहे.

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.