‘फरार’ परमबीर सिंग अखेर मुंबईत, कांदिवलीत गुन्हे शाखेकडून चौकशी

न्यायालयाच्या निकालाने माझी निर्दोष मुक्तता झालेल्या एका प्रकरणात मला नाहक 14 महिने तुरुंगवास भोगावा लागला’ असा आरोप करत पोलिस निरीक्षक भीमराज घाडगे यांनी परमबीर सिंग यांच्या विरोधात एफआयआर दाखल केला होता.

'फरार' परमबीर सिंग अखेर मुंबईत, कांदिवलीत गुन्हे शाखेकडून चौकशी
Parambir Singh
Follow us
| Updated on: Nov 25, 2021 | 12:05 PM

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) मुंबईत दाखल झाले आहेत. गोरेगावातील वसुली प्रकरणात अनेक वेळा समन्स पाठवल्यानंतरही हजर न झाल्यामुळे मुंबईच्या किल्ला कोर्टाने त्यांना फरार घोषित केले होते. अखेर आज सकाळी परमबीर सिंग यांनी कांदिवली गुन्हे शाखा युनिट 11 च्या कार्यालयात हजेरी लावली. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्ये डीसीपी आणि गुन्हे शाखेचे अधिकारी सिंग यांची चौकशी करत आहेत. परमबीर यांच्यासह त्यांचे वकीलही आहेत. क्राईम ब्रांचच्या ऑफिसबाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.

परमबीर यांच्यावर पाच गुन्हे दाखल

परमबीर सिंग यांच्यावर मुंबई आणि आणि ठाण्यात खंडणी आणि जातीवाचक शिवीगाळ तसेच इतर अनेक आरोपांखाली गुन्हे दाखल आहेत. सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंग यांना खंडणी आरोप प्रकरणात अटकेपासून संरक्षण दिले. त्याचवेळी न्यायलयाने त्यांना तपासात सहभागी होण्याचेही आदेश दिले.

काय आहे प्रकरण?

परमबीर सिंग यांच्याविरोधात एका पोलीस अधिकाऱ्यानेच तक्रार केली होती. खोट्या एफआयआरच्या माध्यमातून आपला छळ केल्याचा आरोप करत अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत पोलिस निरीक्षक भीमराज घाडगे यांनी एफआयआर दाखल केली होती.

काय होते आरोप?

‘परमबीर सिंग हे ठाण्याते पोलिस आयुक्त असताना कल्याण-डोंबिवली महापालिकेतील बिल्डरांच्या एका भ्रष्टाचार प्रकरणातील अनेक आरोपींची नावे वगळण्याच्या त्यांच्या दबावाला मी बळी पडलो नाही. म्हणून माझ्याच विरोधात अनेक खोटे एफआयआर दाखल करायला लावून त्यांनी माझी प्रचंड छळवणूक केली. शिवाय अंतिमत: न्यायालयाच्या निकालाने माझी निर्दोष मुक्तता झालेल्या एका प्रकरणात मला नाहक 14 महिने तुरुंगवास भोगावा लागला’ असा आरोप करत पोलिस निरीक्षक भीमराज घाडगे यांनी परमबीर सिंग यांच्या विरोधात एफआयआर दाखल केला होता.

सचिन वाझेच्या अटकेनंतर परमबीर सिंह अडचणीत

मनसुख हिरेन हत्या आणि अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं ठेवल्याच्या आरोपात सचिन वाझेला अटक झाल्यानंतर परमबीर सिंह यांची बदली करण्यात आली होती. त्यानंतर परमबीर सिंह आणि तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू झाले. परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी सचिन वाझेला 100 कोटींच्या खडणीचे टार्गेट दिल्याचा आरोप परमबीर सिंह यांच्याकडून करण्यात आला होता. त्यामुळे पुढील चौकशीत हे प्रकरण कोणते वळण घेत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

कोण आहेत परमबीर सिंग?

हरियाणामधील फरीदाबाद जिल्ह्यातील पावटा मोहबताबाद हे परमबीर सिंग यांचं मूळ गाव. त्यांचे वडील होशियार सिंग हरियाणा नागरी सेवेत अधिकारी होते. त्यांचा भाऊ मनवीर सिंग भडाना हरियाणा पब्लिक सर्विस कमिशनचे प्रमुख आहेत. परमबीर सिंग 1988 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी महाराष्ट्र पोलिस खात्यात अनेक पदांवर काम केलं. ते महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाचे उपप्रमुख देखील होते. त्यांनी सुरुवातीला ठाण्याचे पोलिस उपायुक्त म्हणून देखील काम केलं. यानंतर 2015 मध्ये त्यांची ठाण्याच्या पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात झाली. या काळात त्यांनी ठाण्यातील अनेक मोठ्या प्रकरणांचा छडा लावला. त्यांच्या काळात ठाण्यातील गुन्ह्यांमध्ये जवळपास 10 टक्क्यांची घट झाली. तसेच विविध गुन्ह्यांमधील दोषी सिद्ध होण्याचं प्रमाण 8 टक्क्यावरुन 45 टक्के झाले.

परमबीर सिंग यांच्या नेतृत्वाखील ठाणे पोलिसांनी देशभरात गाजलेल्या प्रकरणांचा तपास केला. ठाणे पोलिसांनी मीरा रोड कॉल सेंटर प्रकरणी इक्बाल कासकरला अटक केली. ठाणे पोलिसांनी परमबीर सिंह यांच्या नेतृत्वात सैन्य भरती प्रकरण, अमेरिकेच्या ड्रगविरोधी पथकाने लक्ष घातलेल्या 2000 कोटींचं ड्रग प्रकरण, बेकायदेशीर कॉल रेकॉर्डींग प्रकरण यांचा तपास केला. परमबीर सिंह यांनी चंद्रपूर आणि भंडऱ्याचे पोलीस अधीक्षक म्हणूनही काम केलं आहे.

संबंधित बातम्या :

अखेर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग फरार घोषित

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.