मुंबई पोलिसांची धडक कारवाई, दिवसाढवळ्या चोरी करणाऱ्या दरोडेखोरांना चालत्या ट्रेनमध्येच बेड्या ठोकल्या !

मालाड पश्चिमेतील लिबर्टी गार्डन परिसरात 11 जानेवारी रोजी दुपारी एका घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी चोरी केली. याप्रकरणी मालाड पोलिसात चोरीची तक्रार दाखल करण्यात आली होती. तक्रार मिळताच पोलिसांनी चोरी प्रकरणाचा तपास सुरु केला.

मुंबई पोलिसांची धडक कारवाई, दिवसाढवळ्या चोरी करणाऱ्या दरोडेखोरांना चालत्या ट्रेनमध्येच बेड्या ठोकल्या !
मालाडमध्ये चोरी करणाऱ्या आरोपींना अटकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jan 17, 2023 | 3:17 PM

मुंबई : मुंबईत घरफोडी करत दिल्लीला पळून जात असलेल्या लुटारु टोळीला मालाड पोलिसांनी धडक कारवाई करत चालत्या ट्रेनमधून अटक केली आहे. आंतरराज्य लुटारू टोळीच्या तिघांना अटक केली आहे. निजाम निसार शेख, समहुन शेख आणि अन्वर समहुन शेख अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. निजाम निसार शेख या आरोपीवर 100 हून अधिक चोरीचे गुन्हे दाखल आहेत. हे सर्व आरोपी पश्चिम बंगालचे रहिवासी असून, त्यांच्यावर दिल्ली, पश्चिम बंगाल, गुजरात, महाराष्ट्रासह अनेक राज्यांत गुन्हे दाखल आहेत. मालाड पश्चिमेतील लिबर्टी परिसरात चोरी करुन आरोपी पळून जात असतानाच पोलिसांनी राजधानी एक्स्प्रेसमधून त्यांना अटक केली.

मालाडमध्ये चोरी करुन पळून चालले होते

मालाड पश्चिमेतील लिबर्टी गार्डन परिसरात 11 जानेवारी रोजी दुपारी एका घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी चोरी केली. याप्रकरणी मालाड पोलिसात चोरीची तक्रार दाखल करण्यात आली होती. तक्रार मिळताच पोलिसांनी चोरी प्रकरणाचा तपास सुरु केला.

आरोपी दिल्लीला पळून जात असल्याची पोलिसांना मिळाली

अधिक तपास केला असता पोलिसांना आरोपींची माहिती मिळाली. तसेच आरोपी राजधानी एक्स्प्रेस पकडून दिल्लीला पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे कळाले. त्यानुसार पोलिसांनी एक पथक तयार केले आणि आरोपींना पकडण्यासाठी रवाना केले.

हे सुद्धा वाचा

रतलाम स्थानकात आरोपींना अटक केली

पोलिसांनी रतलाम स्थानकात आरोपींना गाठत चालत्या ट्रेनमधून तिघा आरोपींना अटक करत मुंबईत आणले. आरोपींकडून 10 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात बहुतांश सोन्या-चांदीचे दागिने आहेत.

ही टोळी दिवसाढवळ्या घरफोडी करून पळून जाते. ही एक आंतरराज्यीय टोळी आहे. आधी बंद घरांची रेकी करते. नंतर 5 ते 10 मिनिटांत त्याच्या टोळीसह लुटमार करून पळून जाते.

ही टोळी दिल्लीत चोऱ्या करायची. आता या टोळक्याने मुंबईकडे आपला मोर्चा वळवला होता. दोन ते तीन दिवसात त्यांनी मुंबईत 7 ठिकाणी चोऱ्या केल्या होत्या. ही टोळी मुंबईत प्रथमच पकडली गेली आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.