पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्या महिलेसोबत लेडीज डब्ब्यात दादर रेल्वे स्थानकावर अतिशय संतापजन कृत्य

दादर रेल्वे स्थानकाजवळ रविवारी रात्री धक्कादायक घटना समोर आली. एका इसमाने चालत्या ट्रेनमधून महिलेला खाली फेकले. सुदैवाने पीडित महिला बचावली आहे. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पण दादर रेल्वे स्थानक सारख्या ठिकाणी अशा घटना घडत असतील तर महिला कितपत सुरक्षित आहेत? असा प्रश्न आता उपस्थित होतोय.

पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्या महिलेसोबत लेडीज डब्ब्यात दादर रेल्वे स्थानकावर अतिशय संतापजन कृत्य
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Aug 07, 2023 | 11:19 PM

मुंबई | 7 ऑगस्ट 2023 : दादर रेल्वे स्थानकाजवळ रविवारी रात्री धक्कादायक घटना समोर आली. एका इसमाने चालत्या ट्रेनमधून महिलेला खाली फेकले. सुदैवाने पीडित महिला बचावली आहे. संबंधित घटना ही पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या उद्यान एक्सप्रेसमधल्या लेडीज डब्यात घडली. आरोपीने 29 वर्षीय महिलेवर हल्ला केला होता. पीडितेने त्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. पण आरोपीने तिला चालत्या ट्रेनमधून फेकून दिले. संबंधित घटना ही रविवारी (6 ऑगस्ट) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे आता रेल्वेतून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय.

दादर स्टेशनच्या प्लॅटफॅार्मवर गाडी आल्यानंतर जनरल लेडीज डब्यातील सर्व महिला उतरल्यानंतर संबंधित महिला एकटीच डब्यात असल्याचे पाहून हल्लेखोर डब्यात चढला. यावेळी महिलेने त्याला प्रतिकार केला. झटापटीत हल्लेखोराने चालत्या ट्रेनमधून तिला फेकून दिले. सुदैवाने ती प्लॅटफॅार्मवर पडली आणि जखमी होवून बेशुद्ध पडली. पोलिसांनी हल्लेखोराला सीसीटीव्हीच्या सहाय्याने अटक केली आहे. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी हा तरुणीची बॅग खेचण्याचा प्रयत्न करत होता.

नेमकं काय घडलं?

पीडित महिला रविवारी संध्याकाळी चार वाजता पुणे रेल्वे स्थानकहून उद्यान एक्सप्रेसमध्ये महिलांच्या जनरल बोगीत बसली होती. महिला मुंबईच्या सीएसएमटी स्थानकाला उतरणार होती. ही उद्यान एक्सप्रेस रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास दादर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 6 वर आली. यावेळी महिला डब्ब्यातील जवळपास सर्वच महिला खाली उतरल्या. फक्त पीडित महिला डब्ब्यात होती.

महिला डब्ब्यात एकटी असल्याचा फायदा घेऊन आरोपी डब्ब्यात शिरला. त्याने महिलेकडे असलेली सॅकबॅक ओढून घेण्याचा प्रयत्न केला. आरोपीने महिलेचा विनयभंग केला. महिलेने आरोपीचा प्रतिकार केला. यावेळी आरोपीने महिलेला रागाने जीवे ठार मारण्याचे उद्देशाने डब्याच्या दरवाज्यातून बाहेर ढकलून दिले.

गुन्हा दाखल होण्यापूर्वीच पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या

दादर रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी या गुन्ह्यातील जखमी फिर्यादी महिला प्रवाशी यांच्याकडे चौकशी करून तसेच दादर रेल्वे स्टेशनचे व सीएसएमटी रेल्वे स्टेशनचे सीसीटीव्ही फूटेज पाहून सदर घटनेतील संशयीत आरोपीस बुध्दीकौशल्याने तपास करून त्यास गुन्हा दाखल होण्यापूर्वीच ताब्यात घेतले आहे.

पीडितेच्या तक्रारीनुसार दादर रेल्वे पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. क्रमांक ८४७ /२०२३ कलम ३०७, ३९४, ३५४ भादंवि सह कलम १५० (१) (ई), १५३, १३७, १४७, १६२ भा.रे.का. दाखल करण्यात येउन आरोपीस तात्काळ अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास दादर रेल्वे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे करीत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचं वय अंदाजे ३० ते ३२ वर्षे, उंची अंदाजे ५ फुट, अंगाने मध्यम, रंगाने सावळा, चेहरा उभट, केस काळे समोरून टक्कल असलेला, अंगात लाल, काळ्या सफेद रंगाचा चेक्सचा फुलबाह्याचा शर्ट आणि नेसणीस काळ्या रंगाची पॅन्ट घातलेला होता.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.