Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aditya Pancholi : आदित्य पांचोलीकडून चित्रपट निर्मात्याला मारहाण, जुहू पोलिसात परस्परांविरोधात तक्रार दाखल

सॅम फर्नांडिस यांना आदित्य पांचोलीचा मुलगा सूरज पांचोलीला घेऊन एक चित्रपट बनवायचा होता. या चित्रपटासाठी सॅम फर्नांडिस यांनी 2 कोटी रुपये गुंतवले होते तर आदित्य पांचोलीनेही 50 लाख रुपये गुंतवले होते. मात्र हा चित्रपट केवळ अडीच कोटीत बनणार नव्हता. यासाठी निर्माता सॅम फर्नांडिसला कुणीही फायनान्सर मिळत नव्हता. कुणीही या चित्रपटात पैसे गुंतवण्यासाठी तयार नव्हता. ही बाब फर्नांडिसने आदित्यला सांगितली.

Aditya Pancholi : आदित्य पांचोलीकडून चित्रपट निर्मात्याला मारहाण, जुहू पोलिसात परस्परांविरोधात तक्रार दाखल
आदित्य पांचोलीकडून चित्रपट निर्मात्याला मारहाण
Follow us
| Updated on: Feb 08, 2022 | 10:35 PM

मुंबई : नेहमी कोणत्या ना कारणाने चर्चेत असणारा बॉलिवूड अभिनेता आदित्य पंचोली (Aditya Pancholi) आता पुन्हा एकदा वादात सापडला आहे. एका फिल्म निर्मात्याने आदित्य पांचोली विरोधात शिवीगाळ करणे, धमकावणे आणि मारहाण केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात परस्परविरोधात क्रॉस तक्रार दाखल करण्यात आली आहे. आदित्य पांचोलीने दारुच्या नशेत असे कृत्य केल्याचे निर्मात्याने सांगितले. सॅम फर्नांडिस (Sam Farnandis) असे या चित्रपटाच्या निर्मात्याचे नाव आहे. चित्रपट निर्मितीवरुन आदित्य पांचोली आणि सॅम फर्नांडिस यांच्यात वाद झाला. याच वादातून दारुच्या नशेत असलेल्या आदित्य पांचोलीने शिवीगाळ आणि मारहाण केली. (Aditya Pancholi beats up filmmaker, files complaint against each other with Juhu police)

काय आहे प्रकरण ?

सॅम फर्नांडिस यांना आदित्य पांचोलीचा मुलगा सूरज पांचोलीला घेऊन एक चित्रपट बनवायचा होता. या चित्रपटासाठी सॅम फर्नांडिस यांनी 2 कोटी रुपये गुंतवले होते तर आदित्य पांचोलीनेही 50 लाख रुपये गुंतवले होते. मात्र हा चित्रपट केवळ अडीच कोटीत बनणार नव्हता. त्यासाठी 60-70 कोटी फायनान्सची आवश्यकता आहे. यासाठी निर्माता सॅम फर्नांडिसला कुणीही फायनान्सर मिळत नव्हता. कुणीही या चित्रपटात पैसे गुंतवण्यासाठी तयार नव्हता. ही बाब फर्नांडिसने आदित्यला सांगितली. त्यानंतर 27 जानेवारी रोजी आदित्य पांचोलीने चित्रपट निर्माता सॅमला जुहू येथील सन अँड सन हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावले. याचदरम्यान आदित्य पांचोलीने सॅमला धमकी दिली की, तुला माझ्या मुलासोबत चित्रपट बनवावा लागेल, नाहीतर मी तुला संपवून टाकेन. तसेच शिवीगाळ आणि मारहाणही केली.

याप्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात आदित्य पांचोली आणि निर्माता सॅम फर्नांडिस यांच्या विरोधात परस्पर क्रॉस तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी दोन्ही बाजूंकडून क्रॉस एनसी नोंदवून तपास सुरू आहे, असे डीसीपी मंजुनाथ शिंगे यांनी सांगितले. याबाबत आदित्य पांचोली याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्याच्याकडून कोणताही प्रतिसाद आला नाही. (Aditya Pancholi beats up filmmaker, files complaint against each other with Juhu police)

इतर बातम्या

Mumbai Crime : मालाडमध्ये बोगस डॉक्टरला अटक, मयत डॉक्टरच्या नावाने चालवत होता क्लिनिक

Sangli Crime : सांगलीत दोघी मायलेकींचा विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू, शेताच्या कडेला लघुशंंकेसाठी गेल्या असता घडली दुर्घटना

'मी मंत्री झालो हे पवारांना मान्यच नाही', जयकुमार गोरेंचा खरमरीत टोला
'मी मंत्री झालो हे पवारांना मान्यच नाही', जयकुमार गोरेंचा खरमरीत टोला.
कराडला मारणारा महादेव गीते कोण?
कराडला मारणारा महादेव गीते कोण?.
तोच राग मनात म्हणून बेदम मारहाण, 'हे' दोघे कराडच्या अंगावर धावले अन्..
तोच राग मनात म्हणून बेदम मारहाण, 'हे' दोघे कराडच्या अंगावर धावले अन्...
कराड, घुले मारहाण प्रकरणात धसांची मोठी मागणी, म्हणाले त्यांना,...
कराड, घुले मारहाण प्रकरणात धसांची मोठी मागणी, म्हणाले त्यांना,....
कराडला मारहाण? दमानियांची पहिली प्रतिक्रिया; या टोळ्यांमध्ये दुश्मनी..
कराडला मारहाण? दमानियांची पहिली प्रतिक्रिया; या टोळ्यांमध्ये दुश्मनी...
कराडला तुरुंगात बेदम मारहाण? बीडच्या तुरूंगात कोणी घातला राडा?
कराडला तुरुंगात बेदम मारहाण? बीडच्या तुरूंगात कोणी घातला राडा?.
देशमुख हत्या प्रकरणी राज ठाकरेंचं मोठं विधान
देशमुख हत्या प्रकरणी राज ठाकरेंचं मोठं विधान.
जे पी नड्डा यांच्यानंतर भाजपा नवा अध्यक्ष कोण? 'ही' नावं आघाडीवर
जे पी नड्डा यांच्यानंतर भाजपा नवा अध्यक्ष कोण? 'ही' नावं आघाडीवर.
'.. मग कोणाच्या कानाखाली काढणार?' राऊतांची ठाकरेंवर टोलेबाजी
'.. मग कोणाच्या कानाखाली काढणार?' राऊतांची ठाकरेंवर टोलेबाजी.
आता मुंबईतच सिंगापूर... निसर्गाच्या सान्निध्यातील पहिलाच 'उन्नत मार्ग'
आता मुंबईतच सिंगापूर... निसर्गाच्या सान्निध्यातील पहिलाच 'उन्नत मार्ग'.