आधी चर्चा, नंतर फूल प्लॅनिंग, मगच अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल केलं जायचं; धक्कादायक खुलाश्याने पोलीसही चक्रावले

या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सुरू आहे. तर आपल्यावरील गुन्हे चुकीचे असल्याचं सांगत खटला मागे घेण्यासाठी अनिल जयसिंघानी यांनी कोर्टात याचिका दाखल केली आहे.

आधी चर्चा, नंतर फूल प्लॅनिंग, मगच अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल केलं जायचं; धक्कादायक खुलाश्याने पोलीसही चक्रावले
aniksha jaisinghaniImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 24, 2023 | 10:19 AM

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करण्यात आल्याच्या प्रकरणात सट्टेबाज अनिल जयसिंघानी आणि त्याची मुलगी अनिक्षा जयसिंघानी हिला पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांकडून पोलिसांना धक्कादायक माहितीही मिळाली आहे. अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करण्यापूर्वी हे दोन्ही बापलेक प्रॉपर चर्चा करायचे. अनिक्षा ही वडील अनिल जयसिंघानी यांच्याशी चर्चा करायची. कशा पद्धतीने ब्लॅकमेल करायचं हे ठरलं जायचं. मेसेज कसे पाठवायचे? त्यात काय लिहायचं? कोणत्या नंबरहून पाठवायचे? त्यानंतर काय करायचं हे सर्व ठरलं जायचं. ही प्लॅनिंग झाल्यानंतरच अमृता फडणवीस यांना मेसेज पाठवून ब्लॅकमेल केलं जायचं असं पोलीस सूत्रांनी सांगितलं.

अमृता फडणवीस यांना व्हॉट्सअपवर व्हिडीओ किंवा मेसेज पाठवण्यापूर्वी अनिक्षा ही अनिल जयसिंघानी याच्याशी चर्चा करायची. चर्चेतून मजकूर ठरायचा. त्यानंतरच अमृता फडणवीस यांना मेसेज केला जायचा, असं पोलीस सूत्रांनी सांगितलं. पोलिसांनी अनिल आणि अनिक्षा यांची कसून चौकशी केली. त्यात या दोघांनी ही कबुली दिल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांना एका मोबाईलमध्ये अमृता फडणवीस यांना पाठवण्यात येणाऱ्या मेसेजचे स्क्रिनशॉट मिळाले आहेत. या दरम्यान दोघांची खूप चर्चा झाल्याचं दिसून येतं. अमृता फडणवीस यांना फसवण्याच्या उद्देशानेच हे कृत्य केल्याचं स्पष्ट होत असल्याचं पोलीस सूत्रांचं म्हणणं आहे.

हे सुद्धा वाचा

एक कोटीच्या लाचेची ऑफर

अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल केल्याचा अनिक्षावर आरोप आहे. 16 मार्च रोजी अमृता फडणवीस यांनी या प्रकरणी तक्रार केल्यानंतर अनिक्षाला अटक करण्यात आली. त्यानंतर तिच्या वडिलांनाही पोलिसांनी गुजरामधून अटक केली. अनिक्षाने अमृता यांना एक कोटीची लाच देण्याची ऑफर दिली होती. त्याबदल्यात आपल्या वडिलांवरील केसेस मागे घेण्याची विनंती तिने केली होती. मात्र, अमृता फडणवीस यांनी त्यास नकार दिल्याने तिने अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.

पोलिसांना खोटं सांगितलं

अमृता यांनी अनिक्षाचा नंबर ब्लॉक केला होता. त्यानंतर अनिल जयसिंघानी यांनी अमृता यांना धमकावणारे कथित मेसेज पाठवले होते. या मेसेजमधून त्यांनी अमृता यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्नही केला होता. सुरुवातीला अनिक्षाने या प्रकरणात फक्त दोन लोकांची नावे घेतली होती. नंतर चौकशी केली असता ती पोलिसांची दिशाभूल करत असल्याचं उघड झालं. अमृता फडणवीस यांना तिने आपण फॅशन डिझायनर असल्याचं म्हटलं होतं. आता मात्र, कायद्याची विद्यार्थी असल्याचं ती म्हणत असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

चौकशी सुरू

सहानुभूती मिळवण्यासाठी आपल्या व्यवसायाच्याबाबत अनिक्षा खोटं बोलत असावी, असं पोलिसांना वाटतंय. पोलिसांनी अनिक्षाच्या घरातून डिझायनिंगचे कपडे आणि दागिन्यासहीत इतर सामान जप्त केलं आहे. तिने या वस्तू कुठून घेतल्या याची पोलीस चौकशी करत आहे. अनिक्षाचे नातेवाईक निर्मल जयसिंघानी हे सुद्धा या प्रकरणात आरोपी आहेत. त्यांचे रेडीमेड कपड्यांचे दुकान आहे. मात्र, ते डिझायनर कपडे विकत नाहीत.

लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.