प्रधानपदाची निवडणूक लढवण्यासाठी मुख्यमंत्र्यांपासून बिल्डरांची घरे लुटणाऱ्याला अटक

निवडणूक लढवण्यासाठी आरोपी पंजाब, हरियाणा, गुडगाव, दिल्ली आणि मुंबई यांसारख्या मोठ्या शहरात राहणाऱ्या हायप्रोफाईल लोकांच्या घरी नोकरीच्या बहाण्याने घुसखोरी करुन चोरी करायचा आणि फरार व्हायचा. आरोपींनी 2016 मध्ये पंजाबच्या एका माजी मुख्यमंत्र्याच्या घरीही चोरी केली होती.

प्रधानपदाची निवडणूक लढवण्यासाठी मुख्यमंत्र्यांपासून बिल्डरांची घरे लुटणाऱ्याला अटक
प्रधानपदाची निवडणूक लढवण्यासाठी मुख्यमंत्र्यांपासून बिल्डरांची घरे लुटणाऱ्याला अटक
Follow us
| Updated on: Mar 22, 2022 | 8:56 PM

मुंबई : उत्तर प्रदेशात प्रधानपदाची निवडणूक (Election) लढवण्यासाठी मुख्यमंत्र्यांपासून बिल्डरांच्या घरात काम करण्याच्या बहाण्याने घरावर दरोडा टाकणाऱ्या एका अट्टल गुन्हेगारा (Criminal)ला मुंबईच्या कांदिवली पोलिसांनी उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातून अटक केली आहे. जवाहर मंगरू प्रसाद पांडे (38) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. कांदिवली पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्याकडील 13 लाखांचे चोरीचे दागिने जप्त केले आहेत. अनेक राज्याचे पोलिस या चोरट्याच्या मागावर होते. (Arrested for looting high profile houses to contest election)

एका चोरीच्या प्रकरणी अटक केल्यानंतर चोरट्याचे प्रताप उघडकीस

आरोपी कांदिवलीतील एका बांधकाम व्यावसायिकाच्या घरी नोकरीच्या बहाण्याने गेला होता. नोकरीसाठी त्याने मालकाला डुप्लिकेट आधार कार्ड दिले आणि काम करू लागला. 1 जानेवारी ते 23 जानेवारी 2022 या कालावधीत तब्बल 23 दिवस काम करून आरोपीने 23 जानेवारी 2022 रोजी त्याच्या दोन साथीदारांसह मलिक यांच्या घरातून सोन्या-चांदीचे व हिऱ्यांचे दागिने असा 17 लाखांचा ऐवज चोरून पलायन केले.

हायप्रोफाईल लोकांकडे कामाच्या बहाण्याने जात चोरी करायचा

पोलिसांच्या चौकशीत आरोपीने सांगितले की, त्याचे गावातील प्रधानाची भांडण झाले होते, त्यानंतर त्याला स्वतः गावातील प्रधानपदाची निवडणूक लढवून प्रधान बनायचे होते. निवडणूक लढवण्यासाठी आरोपी पंजाब, हरियाणा, गुडगाव, दिल्ली आणि मुंबई यांसारख्या मोठ्या शहरात राहणाऱ्या हायप्रोफाईल लोकांच्या घरी नोकरीच्या बहाण्याने घुसखोरी करुन चोरी करायचा आणि फरार व्हायचा. आरोपींनी 2016 मध्ये पंजाबच्या एका माजी मुख्यमंत्र्याच्या घरीही चोरी केली होती. मुंबईसह अनेक राज्यांचे पोलीस आरोपीच्या शोधात होते. सध्या कांदिवली पोलिसांनी आरोपीला अटक केले आहे.

मुंबईतील रिक्षा सोलापुरात विकणारी टोळी जेरबंद

मुंबईतून रिक्षा चोरून सोलापूरमध्ये विकणाऱ्या गँगमधील दोघांच्या मुसक्या आवळण्यास मालवणी पोलिसांना यश आले आहे. मोहम्मद आसिफ शेख आणि लक्ष्मीकांत राजू खेत्री अशी अटक करण्यात आली आहे. ही टोळी रिक्षा चोरून त्यांची नंबर प्लेट बदलून अक्कलकोट सोलापूर येथे विकत असत. पोलिसांनी गेल्या तीन महिन्यात चोरट्यांनी चोरी केलेल्या 14 रिक्षा जप्त केल्या आहेत. सोलापुरात नवीन सीएनजी पेट्रोल पंप सुरू झाला आहे, त्यामुळे ते मुंबईतून सीएनजी ऑटो रिक्षा चोरतात. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत. (Arrested for looting high profile houses to contest election)

इतर बातम्या

नाशिकमध्ये प्रेम संबंधांतून तरुणावर धारदार शस्त्रानं सपासप वार! हल्ल्यात तरुण गंभीर जखमी, तिघांना अटक

ED Raid : ते प्रकरण नेमकं काय ज्याच्यामुळे रश्मी ठाकरेंच्या भावाची ठाण्यातली संपत्ती जप्त करण्यात आलीय?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.