2 वर्षांचं बाळ घरात आल्याचा शेजारणीला राग! चिमुरड्याला केलेल्या अमानुष मारहाणीत बाळाचे हातपाय फ्रॅक्चर

दोन वर्षांचा चिमुरडा घरात आल्याचा राग मनात धरत झरीना या शेजारी राहणाऱ्या महिलेनं त्याला जबर मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.

2 वर्षांचं बाळ घरात आल्याचा शेजारणीला राग! चिमुरड्याला केलेल्या अमानुष मारहाणीत बाळाचे हातपाय फ्रॅक्चर
काटोलमध्ये कुत्र्यांचा पाच वर्षीय मुलावर हल्ला.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 31, 2022 | 10:44 AM

भिवंडी : भिवंडीत (Bhiwandi Crime News) एक धक्कादायक घटना घडली. शेजारील राहणाऱ्या महिलेला एका दोन वर्षांच्या चिमुरड्याला बेदम मारहाण केली आहे. अमानुष मारहाणीमध्ये दोन वर्षांचा चिमुरडा गंभीर जखमी झालाय. भिवंडीतील (Bhiwandi News) एका गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या महिलेनं केलेल्या मारहाणमध्ये दोन वर्षांच्या चिमुरड्याचे हातपाय फ्रॅक्चर झाले आहे. गुरुवारी घडलेली ही घटना आता उघडकीस आली आहे. मारहाणीत जखमी झालेल्या मुलाचे दोन्ही हात फ्रॅक्चर (Fracture) झाले असून एक पायही मोडलाय. मात्र या घटनेप्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नसल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय. या चिमुरड्याची मोलमजुरी करणारी आई या मुलाला सोडून काम करण्यासाठी गेली होती. मात्र या महिलेनं अमानुष मारहाण करत चिमुरड्याला गंभीर जखमी केल्यानं संताप व्यक्त केला जातोय.

नेमकी कुठची घटना?

भिवंडीच्या शेलार ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या मीठपाडा इथं ही घटना घडली. हातपाय फ्रॅक्चर झालेल्या मुलाचं नाव मोहम्मद कैफ सोनू शेख असं आहे. त्याचं वय अवघ दोन वर्ष होतं. जायबंदी झालेल्या आणि तापानं फणफणाऱ्या या मुलाच्या उपचारासाठीदेखील तिच्या आईकडे पैसे नव्हते. अखेर सोमवारी कळव्याच्या सरकारी रुग्णालयात या मुलाची आई त्याला उपचारासाठी घेऊन आली.

चिमुरडा तापानं फणफणला

दोन वर्षांच्या चिमुरड्याची आई असलेल्या मुमताज शेखनं याबाबतची माहिती उघडकीस आणल्यानंतर ही खळबळजनक घटना समोर आली. तापाने फणफणलेल्या आपल्या मुलाच्या उपचारावरील औषधासाठी मुमताज कडे पैसेही नव्हते. त्यामुळे ती उपचारासाठी मुलाला घेऊन अखेर कळव्याला आली होती.

हे सुद्धा वाचा

पाहा व्हिडीओ :

अमानुष मारहाण

गुरुवारी जेव्हा मुमताज मोलमजुरी करुन घरी परतली, तेव्हा तिला आपल्या मुलाला शेजारणीने मारहाण केल्याचं कळलं. आपल्या बारा आणि सात वर्षांच्या मुलांच्या हाती दोन वर्षांच्या आणि दहा महिन्याच्या बाळाला सोपवून गेली होती. दरम्यान, दोन वर्षांचा चिमुरडा घरात आल्याचा राग मनात धरत झरीना या शेजारी राहणाऱ्या महिलेनं त्याला जबर मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.