Mumbai Crime : मालाडमध्ये बोगस डॉक्टरला अटक, मयत डॉक्टरच्या नावाने चालवत होता क्लिनिक

कुरार पोलीस ठाण्याच्या अधिकारी ऐश्वर्या ऐतल यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोखंडवाला म्हाडा येथील सत्यप्रकाश रामपुरण मिश्रा (45) हा कुरार व्हिलेज गांधी नगर येथील त्याचे सासरे आर.आर. पांडे यांच्या क्लिनिकमध्ये कंपाउंडर म्हणून काम करत होता. मात्र 3 वर्षांपूर्वी त्याच्या सासऱ्याचे निधन झाल्यानंतर सत्यप्रकाश मिश्राने स्वत: डॉक्टर असल्याचे भासवून क्लिनिक चालवण्यास सुरुवात केली.

Mumbai Crime : मालाडमध्ये बोगस डॉक्टरला अटक, मयत डॉक्टरच्या नावाने चालवत होता क्लिनिक
मालाडमध्ये बोगस डॉक्टरला अटक
Follow us
| Updated on: Feb 08, 2022 | 9:35 PM

मुंबई : मयत सासऱ्याच्या नावाने दवाखाना चालवणाऱ्या एका बोगस डॉक्टर(Bogus Doctor)वर कारवाई करीत त्याला अटक केल्याची घटना मालाडमध्ये उघडकीस आली आहे. मुंबई क्राईम ब्रँच(Mumbai Crime Branch) युनिट 12 ने कुरार गावातील गांधी नगर परिसरातून या बोगस डॉक्टरला अटक केली आहे. सत्यप्रकाश रामपुरण मिश्रा (45) असे अटक करण्यात आलेल्या बोगस डॉक्टरचे नाव आहे. मिश्रा हा मयत डॉ. आरआर पांडे यांच्या नावाने वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय क्लिनिक चालवत होता. आर.आर.पांडे हे आरोपीचे सासरे असून त्यांचा 3 वर्षांपूर्वी मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स अॅक्ट 1961 अन्वये पोलिसांनी बोगस डॉक्टरवर कारवाई केली आहे. आरोपीला कुरार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी सदर दवाखाना सील करून आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने आरोपीला 8 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. (Bogus doctor arrested in Malad, running clinic in the name of deceased doctor)

डॉक्टर सासऱ्याच्या दवाखान्यात कंपाऊंडरचे काम करायचा आरोपी

कुरार पोलीस ठाण्याच्या अधिकारी ऐश्वर्या ऐतल यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोखंडवाला म्हाडा येथील सत्यप्रकाश रामपुरण मिश्रा (45) हा कुरार व्हिलेज गांधी नगर येथील त्याचे सासरे आर.आर. पांडे यांच्या क्लिनिकमध्ये कंपाउंडर म्हणून काम करत होता. मात्र 3 वर्षांपूर्वी त्याच्या सासऱ्याचे निधन झाल्यानंतर सत्यप्रकाश मिश्राने स्वत: डॉक्टर असल्याचे भासवून क्लिनिक चालवण्यास सुरुवात केली.

आजूबाजूच्या लोकांच्या तक्रारीनंतर बोगस डॉक्टरवर कारवाई

आजूबाजूच्या लोकांच्या तक्रारीनंतर महापालिका आणि पोलिसांनी कारवाई केली. शुक्रवारी सहाय्यक वैद्यकीय आरोग्य अधिकारी हृषिकेश मधुकर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 12 ने आरोपी सत्यप्रकाश मिश्रा याला क्लिनिकमधून पकडून कुरार पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांच्या तपासात मिश्रा याच्याकडे महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलसह कोणतीही वैद्यकीय पदवी नसतानाही तो वेगवेगळ्या आजारांवर लोकांवर उपचार करत असल्याचे आढळून आले. आरोपी सत्यप्रकाश मिश्रा विरुद्ध कलम 419, 420, कलम 33 आणि 36 महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम 1961 अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास करण्यात येत आहे. (Bogus doctor arrested in Malad, running clinic in the name of deceased doctor)

इतर बातम्या

Sangli Crime : सांगलीत दोघी मायलेकींचा विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू, शेताच्या कडेला लघुशंंकेसाठी गेल्या असता घडली दुर्घटना

Namdev Sasane : उमरखेड नगरपरिषदेत 65 लाखांचा कचरा घोटाळा, भाजपा तत्कालीन नगराध्यक्ष नामदेव ससाने यांच्याविरोधात गुन्हा दाखल

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.