काही लग्नांच्या गाठी स्वर्गात नाही, नरकात बांधल्या जातात, दाम्पत्यातील वादावर हायकोर्टही संतापलं

पती-पत्नीमध्ये किरकोळ वाद, भांडणं होतातच, मात्र काही विवाहित जोडप्यांमध्ये नेहमी होणाऱ्या वादामुळे त्यांचे संसार तुटून ते विभक्त होतात, म्हणून काही लग्नांच्या गाठी या स्वर्गात नाही तर नरकात बांधल्या जातात, असं मत हायकोर्टाने व्यक्त केलं.

काही लग्नांच्या गाठी स्वर्गात नाही, नरकात बांधल्या जातात, दाम्पत्यातील वादावर हायकोर्टही संतापलं
'स्किन टू स्किन टच'चा निकाल देणाऱ्या न्यायमूर्तींचा राजीनामा मंजूर
Follow us
| Updated on: Feb 01, 2022 | 7:09 AM

मुंबई : लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, असं आपण सर्रास ऐकतो. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) यापेक्षा वेगळं मत व्यक्त केलं आहे. विशेष म्हणजे काही विवाह गाठी स्वर्गात नाही तर नरकात बांधल्या जातात, अशी प्रतिक्रिया हायकोर्टाने दिली आहे. त्याला कारण ठरलं आहे न्यायालयात दाखल झालेलं कौटुंबिक हिंसाचाराचं (Domestic Violence) प्रकरण. आरोपी पतीला अटकपूर्व जामीन मंजूर करत असताना न्यायालयाने ही संतप्त प्रतिक्रिया दिली. पतीला पोलिसांच्या ताब्यात ठेवूनही प्रश्न सुटणार नाही, म्हणून इथे कोठडीची आवश्यकता नाही, असं कोर्टाने सांगितलं. 2017 मध्ये विवाहबंधनात अडकलेल्या नवी मुंबईतील एका जोडप्यात वाद सुरु होता. पतीसह सासरच्या मंडळींनी हुंडा मागितल्याचा आरोप पीडित विवाहित महिलेने केला आहे.

काय आहे प्रकरण?

पती-पत्नीमध्ये किरकोळ वाद, भांडणं होतातच, मात्र काही विवाहित जोडप्यांमध्ये नेहमी होणाऱ्या वादामुळे त्यांचे संसार तुटून ते विभक्त होतात, म्हणून काही लग्नांच्या गाठी या स्वर्गात नाही तर नरकात बांधल्या जातात, असं मत हायकोर्टाने व्यक्त केलं.

हुंडा न दिल्याने सुनेला शिवीगाळ

2017 मध्ये लग्न झालेल्या पती पत्नीमध्ये कौटुंबिक हिंसाचाराचा वाद सुरु आहे. नवी मुंबईत राहणाऱ्या या जोडप्याला तीन वर्षांचा मुलगा आहे. पतीने लग्नाच्या वेळी सोन्याच्या नाण्यांची मागणी केली होती, मात्र मुलीच्या कुटुंबीयांनी हुंडा देण्यास नकार दिला होता. यावरुन सतत विवाहितेला सासरच्या मंडळींनी त्रास देण्यास सुरुवात केली, तसंच पती वारंवार शिवीगाळ करत असल्याचाही आरोप आहे.

अटकपूर्व जामिनासाठी पती हायकोर्टात

पत्नीने 2019 मध्ये वाशीत घर खरेदी करण्यासाठी पतीला 13 लाख 50 हजार रुपये दिले होते, तरी देखील पतीकडून पैशांची सातत्याने मागणी केली जात होती. त्यामुळे पत्नीने पती विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर भारतीय दंड संहितेअंतर्गत 498 (अ) (पती आणि सासरच्यांकडून त्रास) हुंडा प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या विरोधात पतीने मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.

न्यायालयाचा संताप

पतीला पोलिसांच्या ताब्यात ठेवूनही प्रश्न सुटणार नाही, म्हणून इथे कोठडीची आवश्यकता नाही. पतीला तपासात सहकार्य करण्याचा आदेश देत न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. यावेळी काही विवाह गाठी स्वर्गात नाही तर नरकात बांधल्या जातात, अशी संतप्त प्रतिक्रिया हायकोर्टाने व्यक्त केली.

संबंधित बातम्या :

माझी बायको विडी ओढते, मला घटस्फोट मिळवून द्या, नवरा थेट पोलिसात; बायकोने सांगितलं चक्रावणारं कारण

गर्लफ्रेण्डचीही ‘गर्लफ्रेण्ड’ निघाली, बॉयफ्रेण्ड चवताळला, समलिंगी संबंधातून 29 वर्षीय तरुणीची हत्या

नियतीही तोडू शकली नाही 65 वर्षांची संसारगाठ, पती निधनानंतर दीड तासात पत्नीचाही अखेरचा श्वास

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.