Mumbai Accused Arrest : विरार लोकलमध्ये टॉय गन दाखवून महिलेला लुटणाऱ्या ट्रान्सजेंडरला अटक, बोरीवली जीआरपीची कारवाई

21 एप्रिल रोजी सायंकाळी 6:15 वाजता दादर रेल्वे स्थानकावरून विरारला जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये एक महिला बसली होती. अंधेरी स्थानकावर आरोपी किन्नर देखील त्याच ट्रेनमध्ये चढला आणि महिलेकडे पैसे मागू लागला. महिलेने त्याला पैसे दिले. मात्र आरोपीला हे पैसे कमी वाटले. त्यानंतर आरोपीने आपल्या बॅगेतून टॉय गन बाहेर काढली आणि महिलेवर रोखत आणखी पैशाची मागणी केली.

Mumbai Accused Arrest : विरार लोकलमध्ये टॉय गन दाखवून महिलेला लुटणाऱ्या ट्रान्सजेंडरला अटक, बोरीवली जीआरपीची कारवाई
विरार लोकलमध्ये टॉय गन दाखवून महिलेला लुटणाऱ्या ट्रान्सजेंडरला अटकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 25, 2022 | 5:32 PM

मुंबई : कधी टॉय गन पॉईंटवर तर कधी चाकूचा धाक दाखवून महिलांना लुटणाऱ्या आणि मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये पळून जाणाऱ्या एका ट्रान्सजेंडर (Transgender)ला मुंबईच्या बोरिवली जीआरपी पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. प्रफुल्ल उर्फ ​​सानिया पांचाळ (22) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी ट्रान्सजेंडरचे नाव आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर बोरिवली रेल्वे पोलिसांनी आरोपी किन्नरला खार परिसरातून अटक केली आहे. आरोपीने आतापर्यंत किती लोकांना बंदुक आणि चाकूचा धाक दाखवत लुटले, किती पैसे लुबाडले हे पोलिस चौकशीनंतर स्पष्ट होईल. सध्या पोलिसांनी आरोपी अटक करत चौकशी सुरु केली आहे. (Borivali GRP arrests transgender for robbing woman by showing toy gun in Virar local)

टॉय गन दाखवून 4 हजार रुपये लुटले

21 एप्रिल रोजी सायंकाळी 6:15 वाजता दादर रेल्वे स्थानकावरून विरारला जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये एक महिला बसली होती. अंधेरी स्थानकावर आरोपी किन्नर देखील त्याच ट्रेनमध्ये चढला आणि महिलेकडे पैसे मागू लागला. महिलेने त्याला पैसे दिले. मात्र आरोपीला हे पैसे कमी वाटले. त्यानंतर आरोपीने आपल्या बॅगेतून टॉय गन बाहेर काढली आणि महिलेवर रोखत आणखी पैशाची मागणी केली. महिलेने भीतीने बॅगेत ठेवलेले 4 हजार रुपये काढून घेतले. ट्रेन बोरिवली स्थानकावर येताच आरोपीने खाली उतरत पळ काढला. यानंतर महिलेने बोरीवली जीआरपी पोलिसात याबाबत तक्रार दिली. तपासादरम्यान आरोपीविरुद्ध अंधेरी येथे चाकूचा धाक दाखवून लुटल्याचाही गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांना कळले. त्यानंतर पोलिसांनी आरोपी कसून शोध घेत त्याला खार परिसरातून अटक केली आहे. (Borivali GRP arrests transgender for robbing woman by showing toy gun in Virar local)

इतर बातम्या

Dombivali Crime : डोंबिवलीत गुरू शिष्याच्या नात्याला काळिमा, प्रेमसंबंधातून स्पोर्ट्स कोचकडून विद्यार्थिनीला अमानुष मारहाण

Dombivli Crime : डोंबिवलीत किरकोळ कारणावरून युवकाला मारहाण, सीसीटीव्ही बघाल तर थक्क व्हाल

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.