Video : मुलांची चोरी करुन त्यांना भीक मागायला लावणारी हीच ती उलट्या काळजाची महिला, अखेर अटक!

Borivali crime News : रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर खबऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी आरोपी महिलेचा शोध घ्यायला सुरुवात केली होती. अखेर दादर रेल्वे स्थानकातून महिलेला अटक करण्यात आली आहे.

Video : मुलांची चोरी करुन त्यांना भीक मागायला लावणारी हीच ती उलट्या काळजाची महिला, अखेर अटक!
बाळाची चोरी करणारी महिला अटकेतImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Sep 11, 2022 | 11:17 AM

मुंबई : मुंबईतून एका दिल्लीकर (Dadar Railway Station) महिलेला अटक करण्यात आली आहे. लहान मुलांची चोरी (Kids Theft) करुन त्यांना भीक मागायला लावल्याचा आरोप या महिलेवर आहे. दादर रेल्वे स्थानकातून आरोपी महिलेला अटक करण्यात आली. या महिलेच्या चौकशीतून धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. बोरीवली जीआरपी पोलिसांनी (Borivali GRP Police) घडलेल्या प्रकाराबाबत खळबळजनक माहिती उघडकीस आणली आहे.

…म्हणून चिमुरड्याची चोरी!

8 सप्टेंबरला बोरीवलीतून एका बाळाची चोरी झालेली. बाळाचं अपहरण झाल्याप्रकरणाची तक्रार पोलिसांकडे दाखल झाली होती. तीन वर्षांचं बाळ रेल्वे स्टेशन परिसरातून गायब झाल्यानंतर पोलिसांनी तपास करण्यास सुरुवात केली. रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर खबऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी आरोपी महिलेचा शोध घ्यायला सुरुवात केली होती. अखेर दादर रेल्वे स्थानकातून महिलेला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या महिलेच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आलीय.

LIVE घडामोडी : पाहा व्हिडीओ

हे सुद्धा वाचा

त्याआधीच अटक!

अटक करण्यात आलेली आरोपी महिला तीन दिवसांपूर्वी मुंबईत आली होती. आरोपी महिला मूळची दिल्लीत राहणारी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. बोरीवली जीआरपीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला आपल्या अल्पवयीन मुली आणि मुलासह मुंबईत आली होती.

लहान मुलामुळे भीक मिळेल, या इराद्याने तिने 3 वर्षांच्या मुलाचं अपहरण केलं होतं. या मुलाच्या मदतीने भीक मागण्याचा तिला प्लान होता. मुंबईतून ही आरोपी महिला चोरी केलेल्या मुलाला घेऊन दिल्लीला जाणार होती. पण त्याआधीच पोलिसांनी या आरोपी महिलेला आणि तिच्या दोन अल्पवयीन मुलांना अटक केली आहे.

एका सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांना या महिलेचा सुगावा लागला. दादर रेल्वे स्थानकात आरोपी महिला हरवलेल्या मुलासोबत सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. तर त्याआधी तीन वर्षांच्या मुलाला उचलून धावत जात असतानाचंही एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं होतं. या दोन्ही सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपी महिलेचा शोध घेण्यात आला. अखेर पोलिसांनी हरवलेल्या बाळाचीही सुटका केली. तसंच आरोपी महिलेच्याही मुसक्या आवळल्यात. आरोपी महिलेला एका 17 वर्षांचा मुलगा आणि एक 10 वर्षांची मुलगी असल्याचं पोलिसांनी सांगितलंय.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.