कल्याण पत्रीपूल परिसरातील खळबळजनक घटना, भयानक अवस्थेत आढळला पुरुषाचा मृतदेह

कल्याणच्या पत्रीपूल परिसरात एका पुरुषाचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेतली आहे. पत्रीपूल परिसरात सापडलेला मृतदेह नेमका कुणाचा आहे? याबाबत पोलिसांकडून युद्ध पातळीवर शोध सुरु आहे.

कल्याण पत्रीपूल परिसरातील खळबळजनक घटना, भयानक अवस्थेत आढळला पुरुषाचा मृतदेह
Follow us
| Updated on: Nov 18, 2023 | 8:18 PM

सुनील जाधव, Tv9 मराठी, कल्याण | 18 नोव्हेंबर 2023 : कल्याण पूर्वेतील पत्रीपूल परिसरात रेल्वे रुळालगत अर्धवट जळालेल्या अवस्थेत एका पुरुषाचा मृतदेह आढळून आलाय. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या इसमाची जाळून हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. मृताची ओळख अद्याप पटलेली नाही. या संदर्भात टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. ही व्यक्ती कोण आहे? ही घटना कशी घडली? या प्रश्नांची उत्तरे टिळक नगर पोलीस शोधत आहेत.

कल्याण पूर्वेकडे पत्रीपूल परिसरातील अशोक सिंगल उद्यानाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या रेल्वे ट्रॅक परिसरात लोहमार्ग सुरक्षा बलाचे पेट्रोलिंग सुरू होते. रूळालगत असलेल्या झुडपात काहीतरी जळत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. संशय आल्याने पोलिसांनी झुडपात जाऊन पाहिले असता एक मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आला. लोहमार्ग पोलिसांनी टिळकनगर पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली.

पोलिसांना नेमका संशय कुणावर?

टिळकनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यानंतर हा मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी मुंबईतील सर जे. जे. हॉस्पिटलला पाठवून दिला. अहवाल प्राप्त झाल्यानंतर या इसमाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? हे स्पष्ट होणार आहे.

बहुदा पूर्ववैमनस्यातून किंवा अनैतिक संबंधातून या इसमाची हत्या करून त्याला जाळून पुरावा नष्ट करण्याचा मारेकऱ्यांनी प्रयत्न केला असावा, असा पोलिसांचा कयास आहे. पोलिसांना सापडलेला मृतदेह हा 35 ते 40 वर्षाच्या इसमाचा आहे. त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. या इसमाला जाळून त्याची हत्या करण्यात आल्याचा संशय आहे. या प्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात तूर्त आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.