Video | हा पिक्चरचा सीन नाही, पण पिक्चरच्या सीनपेक्षा कमीही नाही! कांदिवलीत प्लॅटफॉर्मवरच चोर-पोलिसाचा थरार
CCTV Video of Kandivali Police & Theft : सीसीटीव्हीमध्ये आरोपी एका प्रवाशाचा मोबाईल हिसकावून रेल्वे ट्रॅक ओलांडताना मागे मागे पळताना दिसतोय. त्याच्या मागे मुंबई पोलीस कर्मचारीही पाठलाग करताना दिसलेत.
मुंबई : मुंबई रेल्वे स्थानकात लोकलखाली येताना अनेकांना वाचवणारे सीसीटीव्ही व्हिडीओ तुम्ही पाहिले असतीलच. पण आता रेल्वे स्थानकातला चोर-पोलिस हा फिल्मीस्टाईल थरारही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV Video of Kandivali Police & Theft) कैद झाला आहे. मुंबईच्या कांदिवली रेल्वे (Kandivali Railway Station ) स्थानकातली ही घटना असून मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) प्लॅटफॉर्मवर आरोपीचा पाठलाग केल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून आलं आहे. एका प्रवाशाचा मोबाईल हिसकावून पळ काढणारा एक चोर प्लॅटफॉर्मवरुन पळाला. यानंतर कांदिलवील पोलिस ठाण्यातील दोन शिपायांनी प्लॅटफॉर्मवरच चोराला पकडण्यासाठी धाव घेतली. आरोपीला फिल्मी स्टाईल पकडून अखेर रेल्वे पोलिसांच्या ताब्यातही दिलंय. कांदिवली रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर हा सगळा थरार लोकल प्रवाशांनीही अनुभवला. या थरारक घटनेत मुंबई पोलिसांनी केलेल्या कामगिरीचं सगळ्यांनीच कौतुक केलं असून मोबाईल चोराट्याच्या मुसक्याही आवळल्यात.
सीसीटीव्हीमध्ये काय दिसलं?
सीसीटीव्हीमध्ये आरोपी एका प्रवाशाचा मोबाईल हिसकावून रेल्वे ट्रॅक ओलांडताना मागे मागे पळताना दिसतोय. त्याच्या मागे मुंबई पोलीस कर्मचारीही पाठलाग करताना दिसलेत. मोबाईल चोरलेला आरोपी प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर चढताच या पोलिसांनी त्याला मागून पकडून रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले.
मोबाईल हिसकावल्यानंतर चोरानं थेट रेल्वे प्लॅटफॉर्मवरुन रेल्वे रुळावर उडी मारली. रेल्वे ट्रॅक ओलांडून चोरट्यानं पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोघांनी चोरट्याला अडवण्याचा प्रयत्नही केला. पण त्यांनाही हुसकावून लावत चोरटा पळ काढण्यात यशस्वी झाला. पण पोलिसांनी मात्र कशाचीही पर्वा न करता रेल्वे ट्रॅकवरुनही उडी टाकत या चोरट्याला थरारक पाठलाग केला. पोलिसासमोर चोरट्याची धाव कमी पडली आणि अखेर पोलिसानं मोबाईल चोरट्याला अद्दलही घडवली.
मोबाईल चोरट्याला पकडणारे धाडसी पोलिस
राजेश गावकर आणि योगेश हिरेमठ अशी या दोन धाडसी पोलिसांची नावे असून, हे दोघेही कांदिवली पोलिस ठाण्यात कर्तव्य बजावत असतात.ताहिर मुस्तफा सय्यद असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याचे वय 25 वर्षे आहे. या आरोपीविरुद्ध आणखी अनेक गुन्हे दाखल असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे. जीवाची बाजी लावत मोबाईल चोरट्याला पकडण्याऱ्या मुंबई पोलिसांच्या या कामगिरीचं सर्वच स्तरातून कौतुक होतंय.
पाहा थरारक व्हिडीओ –
Camera Angle 01 : मुंबई पोलिसांचा नादच नाही करायचा.. बघा कसा मोबाईल चोरट्याला पकडला!
video – गोविंद ठाकूर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी pic.twitter.com/trLztvSHWm
— Siddhesh Sawant (@ssidsawant) February 4, 2022
पाहा चोराला पकडल्यानंतरचा आणखी एक व्हिडीओ :
Camera Angle 02 : मोबाईल चोरट्याच्या कांदिवली स्टेशनवर मुसक्या आवळल्या! video – गोविंद ठाकूर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी pic.twitter.com/2XAWze3dN5
— Siddhesh Sawant (@ssidsawant) February 4, 2022
थराक पाठलागाचा आणखी एक एन्गल पाहा व्हिडीओ –
Camera Angle 03 : मोबाईल चोराला अद्दल घडवली. मुंबई पोलिसांचा थरारक पाठलाग video – गोविंद ठाकूर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी pic.twitter.com/MDK9IFkDPi
— Siddhesh Sawant (@ssidsawant) February 4, 2022
संबंधित बातम्या :
पिस्तुलाच्या धाकाने पाच दरोडेखोर शिरले, मुलुंडमध्ये व्यावसायिकाच्या कार्यालयात 76 लाखांची लूट
कोंबड्या नेणाऱ्या टेम्पोची बाईकला समोरासमोर धडक, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
महिलेकडे पाहून अश्लील हावभाव, प्रायव्हेट पार्ट्सही दाखवले, लोअर परेल स्टेशनवर संतापजनक प्रकार