कल्याणमध्ये गुन्हेगारीचा हैदोस, नामांकित शाळेत डान्स टीचरकडून अतिशय विकृत कृत्य

कल्याणमध्ये एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. एका डान्स टीचरने आपल्या पाच वर्षाच्या विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना उघडकीस आलीय. कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसांनी याप्रकरणी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

कल्याणमध्ये गुन्हेगारीचा हैदोस, नामांकित शाळेत डान्स टीचरकडून अतिशय विकृत कृत्य
अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांना अटक
Follow us
| Updated on: Aug 21, 2023 | 10:08 PM

कल्याण | 21 ऑगस्ट 2023 : कल्याण पूर्व परिसरात गुन्हेगारांनी अक्षरश: हैदोस घातला आहे. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिलेला आहे की नाही? असा प्रश्न आता उपस्थित होतोय. कल्याण पूर्वेत सातत्याने गुन्हेगारीच्या घटना घडताना दिसत आहेत. दोन आठवड्यांपूर्वी एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना ताजी होती. या घटनेनंतर लगेच आठवड्याभरात एका अल्पवयीन मुलीची तिच्या आईसमोर धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. ही घटना ताजी असताना लगेच तीन दिवसात टोळक्याकडून एका तरुणाची हत्या करण्यात आली. त्यामुळे कल्याणमध्ये सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. असं असताना आज तर हद्दच झालीय. एका नामांकित शाळेत पाच वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचाराच्या प्रयत्नाचा प्रकार समोर आलाय.

कल्याण पूर्व परिसरातील एका नामांकित शाळेत पाच वर्षाच्या अल्पवयीन मुलावर डान्स शिकवणाऱ्या डान्स टीचरने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. तसेच पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून डान्स टिचरला बेड्या ठोकल्या आहेत. समीर कदम असे आरोपी डान्स टीचरचे नाव आहे. याप्रकरणी पुढील तपास कोळशेवाडी पोलीस करत आहेत.

नेमकं प्रकरण काय?

गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचा हॉटस्पॉट बनलेल्या कोळशेवाडीमध्ये पुन्हा एकदा एका पाच वर्षाच्या अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कल्याण पूर्वेतील एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या एका पाच वर्षीय मुलाकडून त्याची व्यथा ऐकून त्याचे आई-वडील चिंतेत पडले. मुलगा सांगत होता की, त्याच्यासोबत काही तरी अनैतिक प्रकार घडला आहे.

याबाबत आई वडिलांनी शाळेत जाऊन विचारपूस करण्याचे ठरविले. मात्र ही घटना शुक्रवारी घडली होती. शनिवार, रविवारी शाळा बंद होती. मुलाचे आई-वडील सोमवारी शाळेत पोहोचले. त्यांनी शाळेला भेटल्यानंतर दिल्यानंतर धक्कादायक प्रकार समोर आला. मुलासोबत शाळेच्या शौचालयात लैगिंक अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

हे कृत्य दुसरं-तिसरं कोणी नाही तर त्याच शाळेत डान्स शिकविणाऱ्या समीर कदम याने केला होता. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करत आरोपी डान्स टीचर समीर कदमला बेड्या ठोकत पुढील तपास सुरु केला आहे. मात्र या घटनेमुळे परिसरात पुन्हा एकच खळबळ उडाली आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.