कोव्हिशिल्डची लस घेतल्यामुळे मुलीचा मृत्यू; पित्याने सिरमकडे मागितली ‘एवढ्या’ कोटींची भरपाई

26 ऑगस्ट रोजी न्यायमूर्ती एसव्ही गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठाने याचिकेवर सर्व प्रतिवादींना नोटिसा बजावल्या. 17 नोव्हेंबरला या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

कोव्हिशिल्डची लस घेतल्यामुळे मुलीचा मृत्यू; पित्याने सिरमकडे मागितली 'एवढ्या' कोटींची भरपाई
कोव्हिशिल्डची लस घेतल्यामुळे मुलीचा मृत्यूImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Sep 02, 2022 | 7:48 PM

मुंबई : कोरोना प्रतिबंधक लस एका मुलीच्या जिवावर बेतली. तिच्या पित्याने मुलीच्या मृत्यूप्रकरणी पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) विरोधात मुंबई उच्च न्यायालयात खटला दाखल केला आहे. त्यांनी तब्बल 1 हजार कोटींच्या भरपाई (Compensation)ची मागणी केली आहे. त्यांच्या याचिकेची गंभीर दखल घेत मुंबई उच्च न्यायालया (Bombay High Court)ने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया तसेच लस उत्पादनासाठी सिरमसोबत भागिदारी करणार्‍या मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक बिल गेट्स आणि केंद्र व महाराष्ट्र सरकार, ड्रग्ज कंट्रोलर ऑफ इंडिया व इतर पक्षकारांकडून उत्तर मागवले आहे. आपल्या मुलीच्या मृत्यूसाठी कोविड-19 लस जबाबदार ठरल्याचा दावा याचिकाकर्त्या पित्याने केला आहे.

आपल्या मुलीच्या मृत्यूसाठी दोषी असलेल्या कोविशील्ड लसीविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) आणि इतरांकडून उत्तर मागितले आहे आणि लस कंपनीकडून 1,000 कोटी रुपयांची भरपाई मागितली आहे.

याचिकेत चौघांना केले पक्षकार

याचिकाकर्ते दिलीप लुणावत यांनी मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक बिल गेट्स, केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार आणि ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया यांना पक्षकार बनवले आहे. गेट्स फाउंडेशनने SII कंपनीसोबत भागीदारी केली होती.

हे सुद्धा वाचा

पुढील सुनावणी 17 नोव्हेंबर रोजी

26 ऑगस्ट रोजी न्यायमूर्ती एसव्ही गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठाने याचिकेवर सर्व प्रतिवादींना नोटिसा बजावल्या. 17 नोव्हेंबरला या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

याचिकाकर्त्याने दावा केला आहे की, त्यांची मुलगी स्नेहल लुणावत ही वैद्यकीय विद्यार्थिनी होती. स्नेहलला 28 जानेवारी 2021 रोजी नाशिकमधील तिच्या महाविद्यालयात SII ने तयार केलेली कोविड लस कोविशील्ड घेण्यास भाग पाडण्यात आले होते.

लस घेतल्यानंतर डोकेदुखी आणि उलट्या झाल्या

लस घेतल्यानंतर तिला डोकेदुखी आणि उलट्या होत होत्या. तिला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात नेले असता तिच्या मेंदूतून रक्तस्त्राव होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यानंतर स्नेहलचा 1 मार्च 2021 रोजी मृत्यू झाला. मृत्यूचे कारण लसीचा दुष्परिणाम असल्याचा दावा करण्यात आला आहे.

केंद्र सरकारच्या समितीच्या अहवालावर याचिका आधारित

ही याचिका 2 ऑक्टोबर, 2021 रोजी लसीकरणानंतरच्या प्रतिकूल घटनांवरील केंद्र सरकारच्या समितीने (AEFI) सादर केलेल्या अहवालावर आधारित आहे. यात कथितपणे कबूल केले आहे की, याचिकाकर्त्याच्या मुलीचा मृत्यू कोविशील्ड लसीच्या दुष्परिणामांमुळे झाला आहे. याचिकेत SII कडून 1,000 कोटी रुपयांची भरपाई मागितली आहे. (Daughter death due to Covishield vaccine, father demands Rs 1000 crore compensation)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.