AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उल्हासनगरात वालधुनी नदीत अज्ञात मृतदेह, परिसरात खळबळ, हत्या की आत्महत्या, गूढ कसं उलगडणार?

उल्हासनगरातून वाहणाऱ्या वालधुनी नदीत एक अज्ञात मृतदेह आढळला आहे. नदीत गुरुवारी (30 सप्टेंबर) रात्री उशिरा हा मृतदेह सापडला. त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

उल्हासनगरात वालधुनी नदीत अज्ञात मृतदेह, परिसरात खळबळ, हत्या की आत्महत्या, गूढ कसं उलगडणार?
उल्हासनगरात वालधुनी नदीत अज्ञात मृतदेह, परिसरात खळबळ, हत्या की आत्महत्या, गूढ कसं उलगडणार?
| Edited By: | Updated on: Oct 01, 2021 | 2:31 PM
Share

उल्हासनगर (ठाणे) : उल्हासनगरातून वाहणाऱ्या वालधुनी नदीत एक अज्ञात मृतदेह आढळला आहे. नदीत गुरुवारी (30 सप्टेंबर) रात्री उशिरा हा मृतदेह सापडला. त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. संबंधित मृतदेह नेमका कुणाचा आहे? त्याचा तपास अद्याप लागलेला नाही. पोलीस या प्रकरणाचा शोध घेत आहेत.

नेमकं काय घडलं?

उल्हासनगर शहरातून वालधुनी नदी वाहते. सध्या या नदीचं नाल्यात रूपांतर झालंय. या नदीत उल्हासनगर रेल्वे स्थानकाच्या बाजूला असलेल्या संजय गांधी नगर परिसरात गुरुवारी रात्री एका अज्ञात इसमाचा मृतदेह स्थानिकांना आढळला. याबाबत स्थानिकांनी पोलिसांना कळवल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. मध्यवर्ती जिल्हा रुग्णालयात पाठवला. हा मृतदेह कुणाचा आहे? तो या नाल्यात कसा आला? या सगळ्याचा तपास आता मध्यवर्ती पोलीस करत आहेत.

बुलडाण्यात डोंगर पायथ्याशी तरुणाचा मृतदेह

दरम्यान, बुलडाण्यात डोंगराच्या पायथ्याशी एका तरुणाचा मृतदेह गेल्या आठवड्यात संशयास्पदरित्या आढळला होता. बुलडाणा जिल्ह्यातील खामगांव तालुक्यातील गारडगाव शिवारातील डोंगराच्या पायथ्याशी 32 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह गावातील नागरिकांना आढळून आला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. संतोष टवरे (रा. एकलारा बानोदा, तालुका संग्रामपूर) असे मृत तरुणाचे नाव असल्याचे त्याच्याजवळ मिळालेल्या आधार कार्डावरुन समजले होते. मृतदेहाजवळ दारुची छोटी बॉटल, एक गुलाबाचे फूल, ब्लाऊज आणि एक अगरबत्तीचा पुडाही आढळून आल्याने ही घटना घातपात असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

नंदुरबारमध्ये युवतीच्या मृतदेहाचे गूढ उकलले

दुसरीकडे, नंदुरबार परिसरातील बिलाडी शिवारात रेल्वे रुळाजवळ सापडलेल्या युवतीच्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. सीसीटीव्ही फूटेजच्या आधाराने हत्या प्रकरणातील आरोपीला गुजरात राज्यातून अटक करण्यात आली आहे. एका अनोळखी महिलेचा मृतदेह रेल्वे रुळाजवळ आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र लग्नाचा तगादा लावल्यानेच तरुणाने आपल्या प्रेयसीची हत्या केल्याचं समोर आलं आहे.

सीसीटीव्हीमध्ये प्रेमी युगुल कैद

कुठलाही पुरावा नसल्याने अनोळखी मृतदेहाचा तपास लावण्याचं एक मोठं आव्हान पोलिसांसमोर होतं. मात्र पोलिसांनी पाचोराबारी येथील रेल्वे फाटकाजवळ राहणारे कल्पेशभाई पटेल यांच्या घराबाहेरील सीसीटीव्ही कॅमेराची तपासणी केली. त्यावेळी एक तरुण आणि एक तरुणी सुरतच्या दिशेने येऊन नंदुरबारच्या दिशेने जाताना दिसली होती.

सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालेल्या तरुणीच्या अंगावर असलेले कपडे हे मृतदेहाच्या अंगावर आढळलेल्या कपड्याच्या वर्णनाशी जुळून आले. त्यासाठी पोलिसांच्या एक टीमने सुरतला जाऊन तपासणी केली असता, हत्या प्रकरणाचे सर्व धागेदोरे हाती लागले.

लग्नाचा तगादा लावल्याने हत्या

आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याने हत्येची कबुली दिली. आमचं फोनवरून प्रेम झालं होतं, मात्र ती वारंवार लग्नासाठी मागे लागत असल्यामुळे त्याच रागातून हत्या झाल्याचा दावा आरोपीने केला. मुलगी बिहारच्या छपरा येथील, तर आरोपी तरुण सिवनचा रहिवासी आहे.

हेही वाचा :

मुलाच्या काळजीमुळे अचानक यूटर्न, दोघांचा बळी घेणाऱ्या अपघातानंतर कार चालकाचा दावा

लग्नाच्या आमिषाने विवाहित पोलीस उपनिरीक्षकाकडून बलात्कार, कोथरुड पोलिसात तक्रार

दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.