ED Raid : ते प्रकरण नेमकं काय ज्याच्यामुळे रश्मी ठाकरेंच्या भावाची ठाण्यातली संपत्ती जप्त करण्यात आलीय?
नंदकिशोर चतुर्वेदींनी श्रीधर पाटणकर यांच्या साईबाबा गृहनिर्माण संस्थेला 30 कोटी रुपये बेकायदेशीर कर्ज दिले होते. या पैशातून पाटणकरांनी ठाण्यात निलांबरी नावाचा रहिवाशी इमारतीचा प्रकल्प उभा केला. नंदकिशोर चतुर्वेदी, महेश पटेल आणि चंद्रकांत पटेल यांचे मनी लाँड्रिंगचे पैसे या माध्यमातून पाटणकरांकडे गेल्यामुळे ईडीने त्यांची मालमत्ता जप्त केली आहे.
मुंबई : अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ई़डीने आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackarey) यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांच्यावर कारवाई केली आहे. पुष्पक बुलियन या कंपनीची संबंधित एका प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. जप्त केलेली ही मालमत्ता तब्बल 6.45 कोटी रुपयांची आहे. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तामध्ये नीलांबरी प्रोजेक्ट्समधील 11 सदनिकांचा समावेश आहे. या सदनिका साईबाबा गृहनिर्मिती कंपनीच्या नावावर आहेत. साईबाबा गृहनिर्मिती ही कंपनी श्रीधर माधव पाटणकर यांच्या मालकीची आहे. श्रीधर पाटणकर हे रश्मी ठाकरेंचे भाऊ आहेत. (ED action against Rashmi Thackeray’s brother, property confiscated in Thane)
ED provisionally attached immovable properties worth Rs 6.45 Cr in case of M/s Pushpak Bullion, one of the Group companies of Pushpak Group. The attachment includes 11 residential flats in Neelambari project, Thane belonging to Shree Saibaba Grihanirmiti Pvt Ltd. Probe underway.
— ANI (@ANI) March 22, 2022
काय आहे नेमके प्रकरण ?
वर्ष 2017 साली पुष्पक बुलियन कंपनीविरोधात ईडीने मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. पुष्पक बुलियन्सची तब्बल 21 कोटी रुपयांची मालमत्ता यापूर्वीच जप्त करण्यात आली आहे. ही मालमत्ता महेश आणि चंद्रकांत पटेल यांच्या मालकीची होती. या तपासादरम्यान महेश पटेल आणि चंद्रकांत पटेल यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांच्या सदस्यांनी मनी लाँड्रिंग केल्याचा आरोप करत ईडीने कारवाई केली होती. याच दरम्यान नंदकिशोर चतुर्वेदी नावाच्या इसमाने बनावट कंपन्यांच्या माध्यमातून करोडो रुपयांची उलाढाल केल्याचे ईडी तपासात समोर आले होते. नंदकिशोर चतुर्वेदींनी श्रीधर पाटणकर यांच्या साईबाबा गृहनिर्माण संस्थेला 30 कोटी रुपये बेकायदेशीर कर्ज दिले होते. या पैशातून पाटणकरांनी ठाण्यात निलांबरी नावाचा रहिवाशी इमारतीचा प्रकल्प उभा केला. नंदकिशोर चतुर्वेदी, महेश पटेल आणि चंद्रकांत पटेल यांचे मनी लाँड्रिंगचे पैसे या माध्यमातून पाटणकरांकडे गेल्यामुळे ईडीने त्यांची मालमत्ता जप्त केली आहे. महेश पटेल, चंद्राकांत पटेल आणि कुटुंबाच्या सदस्यांची याआधी 1 कोटी 47 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केलेली आहे.
सोमय्यांनी देवस्थानाची जमिन लाटल्याचा केला होता आरोप
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी श्रीधर पाटणकर यांनी कर्जत येथील वैजनाथ महादेव या – 300 वर्षापूर्वीच्या देवस्थानची जमिन लाटल्याचा आरोप केला होता. ती जमीन आधी सलीमच्या नावे ट्रान्सफर झाली. हिंदू देवस्थानाची जमीन आणि मुस्लिमाच्या नावे आणि मग पाटणकरांच्या नावावर झाली, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं होतं. त्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत पाटणकर यांच्यावरील सर्व आरोप खोडून काढले होते. पाटणकर यांनी देवस्थानची जमीन कशी लाटली व कधी घेतली ते दाखवा, असं आव्हान राऊत यांनी दिलं होतं. जी जमीन दाखवली जाते. ती जमीन त्यांनी ज्यांच्याकडून घेतलीय त्यांचा व देवस्थानाचा काहीच संबंध नाही. त्यांनी 2014 मध्ये जमीन कोणत्या व्यक्तींकडून घेतली त्यांच्या नावाची यादीच राऊत यांनी सादर केली होती. या यादीतील बाराव्या क्रमांकाच्या व्यक्तीकडून जमीन घेतल्याचेही त्यांनी सांगितले होते. (ED action against Rashmi Thackeray’s brother, property confiscated in Thane)
संबंधित बातम्या